Makeup Products: Sakal
लाइफस्टाइल

Makeup Products: महिलांना नटणं आणखी महाग! सौंदर्य प्रसाधनांच्या किमतीत २५ टक्क्यांची वाढ

सकाळ वृत्तसेवा

Makeup Products: जीवनावश्यक आणि इतर वस्तूंच्या बाबतीत महागाईचा भडका उडाला असून त्यात आता सौंदर्य प्रसाधनांची भर पडली आहे. महिलांसाठी महत्त्वाची गोष्ट असलेल्या सौंदर्य प्रसाधनांच्या किंमतीत तब्बल २० ते २५ टक्क्यांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता महिलांना नटणं आणखी महाग झाले आहे. यामध्ये लिपस्टिक, नेल पॉलिश, स्किन केअर क्रीम, बॉडी लोशन, टिकली, काजळ, पावडर आणि फाउंडेशनचा समावेश आहे.

कोणताही ऋतू असो की सण, महिला हमखास नटतात. परंतु त्यासाठी महिलांना आता सौंदर्य प्रसाधन खरेदीसाठी जादा पैसे मोजावे लागणार आहेत.

सौंदर्य प्रसाधनांच्या किंमतीत प्रचंड असली तरी महिला, तरूणींचा खरेदीकडे ओढा नेमहीच दिसून येतो. दिवसेंदिवस फॅशनचा ट्रेंड वाढत चालला आहे. त्यामुळे कंपन्यांकडूनही चांगली उत्पादने बाजारपेठेत आणली जात आहेत.

सौंदर्य प्रसाधने विकणाऱ्या कंपन्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी वेगवेगळ्या स्किमद्वारे आपले प्रॉडक्ट विकायचे. परंतु, आता कंपन्यांनी स्किमच बंद केली. त्यामुळे ग्राहकांचे नुकसान होत आहे.

सर्वच कंपन्यांनी सौंदर्य प्रसाधनांच्या किंमतीत वाढ केली आहे. प्रॉडक्ट महाग असले तरी ग्राहक खरेदी करतात. मार्केटमध्ये बऱ्याच कंपन्या आहेत. बरेच ग्राहक हे किंमतीला महत्व न देता ब्रँन्डेड वस्तूवरच भर देतात.

मजास पटेल, विक्रेता.

७० टक्के ग्राहकांना हव्या ब्रॅंन्डेड वस्तू

७० टक्के ग्राहक हे ब्रँन्डेड वस्तू खरेदी करतात. ब्रँन्डेड कंपन्यांची सौंदर्य प्रसाधने खरेदी करण्याकडेच त्यांचा कल असतो. काही ग्राहक कमी किंमतीच्या प्रॉडक्टची मागणी करतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayodhya Case: रामजन्मभूमी खटल्याचा निकाल देण्यापूर्वी सरन्यायाधीश देवासमोर बसून काय म्हणाले? चंद्रचूड यांनी सांगितलं त्यावेळी काय घडलं

Maharashtra Rain Alert : राज्यात आज पुन्हा जोरदार पाऊस! 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

Share Market Opening: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स 545 अंकांनी वाढला, निफ्टी 25,000च्या जवळ

MVA Seat Sharing: विधानसभेत रंगत! महाविकास आघाडीकडे मागितली स्वतंत्र लढण्याची परवानगी, कोणत्या पक्षाने केलं शक्ती प्रदर्शन?

हे लोक शाळेत काय शिकतात? दक्षिणेकडील राज्यांची नावंही नाही सांगू शकली कियारा अडवाणी, नेटकरी म्हणाले-

SCROLL FOR NEXT