26/11 Terror Attack  esakal
लाइफस्टाइल

26/11 Terror Attack : देशाला हादरवणारा दिवस, जाणून घ्या दहशतवादी हल्ल्याचा संपूर्ण घटनाक्रम

'दिसेल त्याला ठार करत जायचं एवढंच या दहशतवाद्यांना पढवण्यात आलं होतं'

Pooja Karande-Kadam

26/11 Terror Attack :

काही दिवस असे असतात जे आपल्या नेहमी लक्षात राहतात. त्यातील काही चांगले तर काही वाईट प्रसंगही असतात. पण खरंच काळादिवस ज्याला म्हणता येईल असा एक दिवस भारतातील प्रत्येकाच्या नशिबात आला. तो होता,२६ नोव्हेंबर २००८ होय.

१५ वर्षांपूर्वी नोव्हेंबरच्या २६ तारखेला मुंबईत अनेक ठिकाणी दहशतवादी हल्ले झाले. अजमल कसाब याच्यासह १० जणांचा या हल्ल्यात सहभाग होता. मुंबईतील पंचतारांकीत हॉटेल्स, कामा हॉस्पिटल, मुंबईचा श्वास असलेले छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस यांच्यावर दहशतवाद्यांनी हल्ले चढवले होते.

कोणावरही दया दाखवायची नाही, कोणालाही जात विचारायची नाही, दिसेल त्याला ठार करत जायचं एवढंच या दहशतवाद्यांना पढवण्यात आलं होतं. आणि त्यांनी हेच केलं. कसा होता तो दिवस, त्या दिवशी नक्की काय घडलं हे काही मुद्द्यांमधून जाणून घेऊयात.  

२६/११ च्या हल्ल्यात सहभागी झालेल्या दहशतवाद्यांना पाकिस्तानातून पाठवण्यात आले होते आणि त्यांना उच्च प्रशिक्षित करण्यात आले होते. हे सर्वजण भारतात प्रवेश करण्यासाठी सागरी मार्गाने आले होते. दहशत पसरवणे आणि नागरिकांचे अपहरण प्रकरणातून काही प्रमुख दहशतवाद्यांची सुटका करणे हा त्यांचा मुख्य उद्देश होता.

मुंबई दहशतवादी हल्ल्याची योजना अनेक महिने आधीच तयार करण्यात आली होती. या हल्ल्यात सहभागी असलेल्या दहशतवाद्यांनी भारत-बांगलादेश सीमेवरून खरेदी केलेले तीन सिमकार्ड वापरले होते. यापैकी एक सिमकार्ड अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्यात खरेदी केल्याचेही वृत्त होते.

त्यानंतर 21 नोव्हेंबर 2008 रोजी नियोजनबद्ध पद्धतीने दहा दहशतवादी पाकिस्तानातून गुजरातमार्गे बोटीतून भारतात आले. जाताना त्यांनी चार मच्छिमारांना ठार मारले.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी दहशतवाद्यांनी कॅप्टनची हत्या केली आणि स्पीडबोटीतून कुलाब्याच्या दिशेने निघाले. मुंबईत प्रवेश करण्यापूर्वी दहशतवादी एलएसजी, कोकेन आणि स्टेरॉईड्सचे सेवन करायचे जेणेकरून ते जास्त काळ ऍक्टिव्ह राहू शकतील.

यानंतर दहशतवाद्यांनी मुंबईत प्रवेश करताच ताज हॉटेल, ओबेरॉय ट्रायडंट आणि नरिमन हाऊसवर हल्ला केला. ताज हॉटेलमध्ये सुमारे सहा स्फोट झाले, ज्यात अनेक लोक ठार झाले. दहशतवाद्यांनी लोकांना ४ दिवस ओलीसही ठेवले होते आणि अंदाधुंद गोळीबारात अनेकांना ठार केले होते.

मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात सुमारे १९७ जणांचा मृत्यू झाला होता, तर ६०० हून अधिक लोक जखमी झाले होते. या हल्ल्यात सर्व दहशतवादी मारले गेले मात्र मोहम्मद अजमल आमिर कसाब जिवंत पकडला गेला. ज्याला २१ नोव्हेंबर २०१२ रोजी येरवडा तुरुंगात फाशी देण्यात आली होती.  

जिवंत पकडण्यात आलेला एकमेव दहशतवादी अजमल कसाब याच्यावर शस्त्रास्त्र कायदा, बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायदा, स्फोटक कायदा, सीमाशुल्क कायदा, देशाविरुद्ध युद्ध पुकारणे आणि रेल्वे कायद्याच्या विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या हल्ल्यात निवृत्त सैनिक तुकाराम ओंबळे आणि मुंबई पोलिसांचे सहाय्यक उपनिरीक्षक यांनी एकमेव जिवंत दहशतवादी अजमल कसाबला पकडण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. ओंबळे यांना कर्तव्याच्या ओळीत असामान्य शौर्य आणि पराक्रमासाठी अशोक चक्राने सन्मानित करण्यात आले.

या हल्ल्यांमध्ये कमीतकमी १९७ व्यक्ती ठार झाल्या. तर २९३ जण जखमी झाले होते. परदेशी नागरिकांपैकी चार ऑस्ट्रेलियन, चार अमेरिकन, तीन केनेडियन, तीन जर्मन, दोन इस्रायली-अमेरिकन, दोन इस्रायली, दोन फ्रेंच तर प्रत्येकी एक ब्रिटिश-सायप्रॉइट, चिनी, इटालियन, जपानी, जॉर्डनी, मलेशियन, मॉरिशयन, मेक्सिकन, सिंगापूरी, थाई आणि मेक्सिकन लोकांचा समावेश होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

SCROLL FOR NEXT