26/11 Terror Attack esakal
लाइफस्टाइल

26/11 Terror Attack : कसाब माझ्या नजरेसमोर होता, मी त्याच्या गोळीचा शिकार झालोच असतो, पण..

दवाखान्यातील नर्स बनल्या बालक अन् मातांच्या देवदूत

Pooja Karande-Kadam

26/11 Terror Attack :  

२६ नोव्हेंबर २००८ रोजी भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. देशाची शान असलेल्या ताज हॉटेलमध्ये असलेल्या परदेशी पर्यटकांना लक्ष्य करण्यात आलं होतं.  तसेच, मुंबईचा ऐतिहासिक ठेवा असलेलं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरही अंधाधुंद गोळीबार करण्यात आला होता. तिथे बॉमब्लास्टही घडवण्यात आला.

या घटनेचे अनेक साक्षीदार आहेत. ज्यांनी शस्त्रधारी दहशतवादी पाहीले, ज्यांनी त्या हल्ल्यात हात-पाय गमावले. तर अनेक लोकांनी आपला जीवही गमावला. पण आजही अनेकांना त्या आठवणी ऐकून, पाहून रात्ररात्रभर झोप लागत नाही. अनेकलोक आजही त्या घटनेच्या परिणामांचा सामना करत आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसजवळील 52 जणांची हत्या केल्यानंतर हे दहशतवादी कामा आणि अल्बलेस रुग्णालयात दाखल झाले होते. या रूग्णालयातील कैलाश सांगतात की, बंदुकीचा आवाज ऐकून त्याचा सहकारी बबन वालू याने तातडीने हॉस्पिटलचे दरवाजे बंद करण्याचे काम सुरू केले.

मात्र अंदाधुंद गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांनी बबनला लक्ष्य केले. त्यामुळे मी घाबरलो आणि झाडामागे लपून बसलो. अवघ्या दहा फूट अंतरावरून मी कसाबला हा नरसंहार करताना पाहिले.

त्याने सांगितले की, इमारतीचे मुख्य गेट उघडे होते आणि दहशतवाद्यांनी त्याकडे धाव घेतली. तिथे दुसरा गार्ड भानू नारकर यांच्यावर जोरदार गोळ्या झाडण्यात आल्या. सुरूवातीला मला वाटले की, हे  मुंबईत होणाऱ्या टोळीयुद्धसारखेच असावे. पण,जेव्हा माझ्या नजरेसमोर माझ्या बांधावांना मारले गेले. तेव्हा या घटनेचे गांभिर्य लक्षात आले.

हॉस्पिटलच्या आवारात घुसल्यानंतर कसाब आणि त्याच्या साथीदारांनी अंदाधुंद गोळीबार सुरू केला. त्यामुळे कर्मचारी, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक चांगलेच घाबरले. नंतर कैलासने धाडस दाखवले आणि पोलिसांच्या टीमला सहाव्या मजल्यावर नेले, जिथे त्यांची दहशतवाद्यांशी चकमक झाली.

ज्यात दोन पोलिस ठार झाले आणि ते आणि आयपीएस अधिकारी सदानंद दाते जखमी झाले. हॉस्पिटलच्या नर्सेस मीनाक्षी मुसळे आणि अस्मिता चौधरी यांनी सांगितले की, दहशतवादी तेथे प्रवेश करू नयेत यासाठी त्यांनी फ्रीज, एक्स-रे मशीन, औषधांची ट्रॉली आणि खुर्च्यांचा वापर दुसऱ्या मजल्यावर दरवाजा बंद केला होता.

नाईट पर्यवेक्षक सुनंदा चव्हाण म्हणाल्या, नुकत्याच प्रसुती झालेल्या मातांना आणि बालकांना सुरक्षित ठेवणे हे आमचे कर्तव्य होते. बालकांना दुखापत होण्यापासून वाचवण्यासाठी आम्ही सर्व पाळणे लपवून ठेवले.

रूग्णालयाच्या अधीक्षक अमिता जोशी यांनी सांगितले की, आता रुग्णालयात सशस्त्र सैनिक आहेत. पाळत ठेवण्यासाठी 67 सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT