3 skin care tips for face in monsoon healthy skin Sakal
लाइफस्टाइल

Monsoon Skin Care Tips : पावसाळ्यातही चेहऱ्यावर ग्लो हवा आहे? फाॅलाे करा 3 टिप्स

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi), सकाळ वृत्तसेवा

Healthy Skin In Monsoon : पावसाळ्यात आरोग्यासह त्वचेची काळजी घेणे गरजेचे असते. अनेकांना पावसाळा खूप आवडतो. पण या ऋतूमध्ये त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू लागतात. म्हणूनच या ऋतूत त्वचेची विशेष काळजी घेणे खूप गरजेचे आहे.

त्याचबरोबर तेलकट त्वचेमुळे पावसाळ्यात फोड आणि पिंपल्सची समस्याही वाढते. अशा परिस्थितीत त्वचेची विशेष काळजी न घेतल्यास ही समस्या आणखी गंभीर होऊ शकते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही पावसाळ्यात तुमच्या चेहऱ्याची चमक कायम ठेवू शकता.

त्वचेची ही अशी घ्या काळजी

बटाट्याचा रस

बटाट्याचा रस चमकदार त्वचेसाठी फायदेशीर असतो. पावसाळ्यात बटाट्याचा रस लावावा. कारण अनेक समस्या दुर होतात. यासाठी बटाटा किसून घ्या आणि नंतर त्याचा रस गाळून घ्या. यानंतर बटाट्याचा रस मुलतानी मातीमध्ये मिसळून २० मिनिटे चेहऱ्यावर लावा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा.

चंदन पावडर

पावसाळ्यात चेहऱ्यावर चंदन पावडर लावणे फायदेशीर ठरते. तुम्ही चंदनाचा पॅक बनवून चेहऱ्यावर लावू शकता. यामुळे त्वचा चांगली राहते. तसेच चंदन पावडरचा वापर केल्याने टॅनिंग दूर होते आणि सुरकुत्याही कमी होतात.

कोरफड जेल

कोरफड एक अशी गोष्ट आहे, जी प्रत्येक ऋतूमध्ये चेहऱ्यावर लावली पाहिजे. त्वचा, केस आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे. चेहऱ्यावर कारफड जेल लावल्याने मुरुमांपासून सुटका मिळते. तसेच अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्माने समृद्ध कोरफड वापरल्याने ग्लो कायम राहतो.

पावसाळ्यात आंघोळीच्या पाण्यामध्ये कडुलिंबाच्या पानांचा रस किंवा पाने घातली एकदम उत्तम असते. त्यामुळे शरीराला येणारी खाज ही कमी होते. आंघोळीपूर्वी हातापायांना जर आपण तेल लावले आणि त्यानंतर अर्ध्या तासाने जर आंघोळ केली तर अजून फायदेशीर ठरते.

— रेणूका देशपांडे - लोहगावकर, त्वचा शास्त्र अभ्यासक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT