Namita Thapar Healthy Lifestyle  esakal
लाइफस्टाइल

Namita Thapar : निरोगी अन् दीर्घायु आयुष्यासाठी शार्क टँक फेम नमिता थापर यांच्या ५ सवयी...

आपल्या लाइफस्टाईल मधले हे ५ बदल आपल्याला नेहमीच प्रगतीपथावर ठेवतील.

सकाळ डिजिटल टीम

Namita Thapar Healthy Lifestyle : एक हेल्थी आणि दीर्घायु आयुष्यासाठी या गोष्टी खूप गरजेच्या आहेत. शार्क टॅंकच्या जज नमिता थापर यांनी आपले रुटीन इंस्टाग्रामवरती एक पोस्ट शेयर करत सांगितले आहे. त्याच्या कॅप्शनमध्ये त्यांनी काही टिप्स शेयर केल्या आहेत आणि नक्कीच आपणही त्यांचा अवलंबन करु शकतो. आपल्या लाइफस्टाईल मधले हे ५ बदल आपल्याला नेहमीच प्रगतीपथावर ठेवतील.

१. उत्तम झोप

अनेकदा वेब सिरिज बघण्यासाठी, लेट नाइट पार्टीसाठी किंवा गप्पाच मारत बसलो अशा कारणांनी लोकं रात्री उशिरा झोपतात त्यात सकाळी कामावर जाण्यासाठी लवकर उठावही लागतं अशामुळे आपली झोप पूर्ण होत नाही. पुरेशी झोप, रोज रात्री ७ ते ८ तासांच्या दरम्यान असावी याने अकाली मृत्यूचा धोका १२% कमी होतो.

२. मेडिटेशन

संशोधनात असे दिसून आले आहे की अजिबात ध्यान न करणार्‍यांच्या तुलनेत दीर्घकाळ ध्यान करणार्‍यांमध्ये वृद्धत्वाची प्रक्रिया कमी असते. दीर्घायुष्य वाढवण्यास मदत करणारी एक यंत्रणा म्हणजे स्ट्रेस लेवेल नियंत्रित करणे. मेडिटेशन यासाठी आपल्याला मदत करते.

३. योगा

योगा किंवा बेसिक वर्कआउट मुळे आपले स्नायू बळकट होतात आणि आपण खूप एनर्जेटिक राहतो, शिवाय यामुळे आजारपण सुद्धा कमी येते आणि आपण फिट राहतो.

४. स्नॅक्स कमी खाणे

सतत काहीतरी खाणं चुकीच आहे आपलं शरीर काही भटारखाना नाहीये सतत काहीना काही खात राहायला, आपल्या जेवणाच एक प्लॅनिंग करा आणि तसंच खा, दोन जेवणात जरासा ब्रेक घ्या. कारण अशाने आपली पचनशक्ती कमी होते जे अजिबात चांगलं नाही.

५. मानसिक उत्तेजक क्रिया

अमेरिकन जेरियाट्रिक्स सोसायटीच्या जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की जे लोकं वाचन, गेम खेळणे, गाणी गाणे आणि नवीन स्किल्स किंवा भाषा शिकणे अशा एनर्जेटिक क्रियांमध्ये भाग घेतात त्यांचा मूड खूप चांगला राहतो आणि दिवसभारचा थकवा सुद्धा निघून जातो.

जेव्हा आपण अशा सवयी आपल्या रोजच्या रुटीनमध्ये सुरु करतो आपल्याला याचा नक्कीच खूप फायदा होईल... लक्षात ठेवा नियमित व्यायाम करणे, अल्कोहोल न पिणे अन् शांत झोप याने आपल्याला दीर्घायु आयुष्य मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

Kitchen Hacks : थंडीत भांडी घासायचं जीवावर येतंय? या सोप्या ट्रिक आजमवा, काम सोप्प होईल

Virat Kohli Video: कोहली चुकला, अन् कॅच सुटला! बुमराहसह टीम इंडियानं केलेली सेलिब्रेशनला सुरुवात, पण...

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

SCROLL FOR NEXT