cheating girlfriend  
लाइफस्टाइल

Girlfriend : धोका देणाऱ्या गर्लफ्रेंडची 'ही' असतात लक्षणे; वेळीच सावध व्हा नाहीतर...

परस्पर प्रेम आणि विश्वासाच्या तारांनी बांधलेले नाते घट्ट असते आणि ते अधिक काळ टिकते.

सकाळ डिजिटल टीम

परस्पर प्रेम आणि विश्वासाच्या तारांनी बांधलेले नाते घट्ट असते आणि ते अधिक काळ टिकते.

कोणतेही नाते असो ते प्रामाणिक असणे आवश्यक असते. तुम्ही समोरच्या व्यक्तीला कसे ट्रीट करता यावर त्या नात्याचे सौंदर्य वाढत असते. परस्पर प्रेम आणि विश्वासाच्या तारांनी बांधलेले नाते घट्ट असते आणि ते अधिक काळ टिकते. ज्या नात्यात या दोन गोष्टी नसतात ती नाती फार काळ टिकत नाहीत. आणि यामुळे फसवणूक, भांडण, वाद या दरार पाडणाऱ्या गोष्टी तिथे जागा तयार करतात. (लाईफस्टाईल)

आजच्या सोशल मीडियाच्या जगात बहुतेक प्रेम हे खोटेपणा आणि फसवणुकीच्या पायावर अवलंबून असते. त्यामुळे अशा परिस्थितीत प्रामाणिक आणि जीवाला जीव देणारा जोडीदार मिळणे फार कठीण झाले आहे. दरम्यान, बऱ्याचवेळा काही गोष्टी लपवण्यासाठी खोट बोलावं लागंत, अशावेळी नात्यातला विश्वास कमी झाला आहे का असे वाटायला लागते.

जर का तुमची मैत्रिण तुमच्याशी खोट बोलत असेल किंवा काही लपवत असेल तर हे शोधण्यासाठी तुम्ही काही ट्रिक्स वापरू शकता. यामुळे तुमच्या मनातील शंकाही दूर होतील. कदाचित तुमची मैत्रिण तुम्हाला फसवत आहे, असे वाटतं असेल तर या काही गोष्टी तुमची मदत करतील...

ऑफिस, कॉलेजच्या गोष्टी लपवत असेल तर...

जेव्हा तुम्ही वेगवेगळ्या ऑफिसमध्ये किंवा कॉलेजमध्ये असता तेव्हा तिथे रोज नवीन लोक भेटत, बोलत असतात. दिवसभरात अनेक घटना घडत असतात, ज्याविषयी तुम्ही एकमेकांशी चर्चा करता. मात्र जर तुमच्या मैत्रिणीला तुमच्यासोबत ऑफिस किंवा कॉलेजबद्दल काहीही शेअर करायचे नसेल आणि तुमचे नाते फक्त हँगआउट आणि चित्रपट पाहण्यापुरते असू शकते. अशा तुम्हाला थोडे सावध राहण्याची गरज आहे.

फोनचा पासवर्ड शेअर करत नाही का?

नात्यात गोपनीयतेची काळजी घेणे ही प्रत्येक जोडप्याची जबाबदारी असते. परंतु याचा अर्थ असा होत नाही की, तुम्ही कधीही जोडीदाराचा फोन कधीही पाहू शकत नाही. मात्र कधी तुम्ही सहज डिमांड केली आणि तरीही तुमची मैत्रीण तिचा फोन दाखवण्यास नकार देत असेल किंवा फोनचा पासवर्ड लपवत असेल तर समजून जा की एखादी गोष्ट अशी आहे जी तुम्हाला सांगायची नाही. नेहमीच ती असे करत असेल तर तुम्ही सावध व्हा.

इतरांपासून तुमचे नाते लपवण्यास सांगत असेल तर...

जे लोक नात्यात आनंदी असतात ते आपल्या जोडीदाराबद्दल कोणतीही गोष्ट त्रयस्त व्यक्तीला सांगण्यास मागेपुढे पाहत नाहीत. मात्र काही नाती अशी असतात, जी फक्त टाइमपास म्हणून असतात. ज्यामध्ये व्यक्ती आपल्या जोडीदाराचे अस्तित्व लपवू लागते. जर तुमची मैत्रीण असे वारंवार करत असेल तर समजून घ्या, की या नात्यात काहीतरी चुकीचे आहे.

तुमच्या भावनांची काळजी करत नसेल तर..

जर तुमच्या मैत्रिणीला कठीण काळातही तुमचे ऐकण्यासाठी वेळ किंवा काही इंटरेस्ट नसेल, तर ती तुमच्याशी मनापासून जोडलेली नाही हे तुम्ही समजून घ्या. कोणत्याही कारणाने नंतर ती तुमच्यापासून दूर जाण्याची शक्यता असते. याशिवाय तुमच्या सुखाशी किंवा दु:खाशी काही देणघेण नाही असे वागत असेल तर तुम्ही थोडे सावध रहा.

तुमचे पैसे स्वतःवर खर्च करणारी असेल तर..

मुलींना खरेदी करणे आवडते. पण तुमच्या खिशाची काळजी न घेता, जर तुमची गर्लफ्रेंड जास्त डिमांड करत असेल तर मात्र तुम्ही विचार करा. विचार न करता पैसे खर्च करणे हे तुमच्या खिशाला परवडणारे नसते. त्यामुळे ती तुमच्याबद्दल अजिबात गंभीर नाही हे समजून घ्या आणि सावध व्हा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Election Result 2024: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? महाराष्ट्राचा कल काय सांगतोय? जाणून घ्या

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: पुन्हा निवडणुका घ्या, हा जनमताचा कौल नाही - संजय राऊत

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

SCROLL FOR NEXT