बाजारात अनेक फेसपॅक आपण पाहतो. पण नेमके कोणते पॅक वापरावे याची माहिती बऱ्याचवेळा असते असे नाही. पण आज आम्ही तुम्हालाऑलिव्ह ऑईल पासून फेसपॅक कसा बनवावा. आणि त्याचे फायदे काय याची माहिती देणार आहोत. ऑलिव्ह ऑईल हे आपण खाण्यासाठी वापरतो हे सर्वांनाच माहित आहे. मात्र ऑलिव्ह ऑईल आपण चेहऱ्यासाठी सुद्धा लावू शकतो. त्यामुळे शरीरासोबत, चेहऱ्यासाठीसुध्दा ते अत्यंत लाभदायी ठरते.
ऑलिव्ह ऑइल त्याचबरोबर कॅस्टर ऑइल हे नैसर्गिक रित्या आपल्या त्वचेला चमकदार बनवत असतात. त्वचेला ओलसरपणा येऊन त्यामुळे वेगळा लुक येतो. त्याचबरोबर या तेलाच्या वापरामुळे आपली त्वचा अधिक सुंदर दिसू लागते. यामध्ये असलेले अँटीअक्सिडेंट हे त्वचेवरील रॅडिकल्सला वाचवण्यासाठी मदत करतात. तज्ञांचा सल्ला आहे की, त्वचेला वापरण्यासाठी एक्स्ट्रा व्हर्जिन ऑईलचा वापर करणे आवश्यक आहे. स्टॅंडर्ड वर्जिन ऑलिव्ह ऑइल तयार करताना त्यातील विटामिन्स आणि मिनरल्स हे नष्ट होतात. त्याचबरोबर त्यामध्ये केमिकल्सचा वापर ही केलेला असतो. त्यामुळे आपल्या त्वचेला नुकसान पोहचते.आज बाजारामध्ये नॉर्मल ऑईल हे एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह पेक्षा कमी दरात मिळते. मात्र आपण एक्स्ट्रा व्हर्जिन ऑलिव्ह ऑइलचा वापर करावा त्यामुळे आपली त्वचा अधिक खुलून दिसते.
स्किनसाठी नेहमी एक्सट्रा वर्जिन ऑलिव ऑयलचा वापर करा. या तेलाने तुमची स्किन उठावदार दिसेल.
ऑलिव्ह ऑइल आणि काकडी
या पॅकचा वापर तुम्ही आॅल टाईप स्किनसाठी करू शकता. हा पॅक तयार करण्यासाठी अर्धी काकडी मिक्सरमध्ये बारीक करून घ्या. त्यामध्ये एक मोठा चमचा ऑलीव्ह ऑईल तेल आणि दूध घालून त्याची पेस्ट बनवा. चेहरा स्वच्छ पाण्याने धुऊन घ्या आणि त्यानंतर तयार झालेला हा फेस पॅक 20 मिनिटापर्यंत त्वचेवर ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ धुऊन घ्या. यामुळे आपल्या चेहऱ्याला एक वेगळा गारवा मिळेल. त्याचबरोबर त्वचा अधिक खुलून दिसेल. ऑलिव ऑइल तेलामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीअक्सिडेंट घटक आसतात, जे चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात. या फेस पॅकचा वापर आपण आठवड्यातून एक वेळा करू शकतो.
मध आणि ऑलिव्ह ऑईल तेल
या फेस पॅकचा वापर आपण सर्व प्रकारच्या स्किनसाठी करू शकता. हे फेस पॅक तयार करण्यासाठी एक अंड्याचे बल्क, एक मोठा चमचा ऑलीव्ह ऑईल आणि एक मोठा चमचा मध घ्या. हे सर्व चांगल्या पद्धतीने एकत्र करून चेहऱ्यावर आणि मानेवर लावा. हे फेस पॅक 20 मिनिटे कोरडे होईपर्यंत वाट पहा. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुऊन घ्या. मधामुळे आपल्या त्वचेला नैसर्गिकरीत्या एक चमक येते. त्याचबरोबर ऑलिव्ह ऑइल त्वचेला मॉइश्चरायझर बनवते. अंड्यातील घटक आपली त्वच्या अधिक टाइट होण्यासाठी मदत करते.
ऑलिव्ह ऑइल तेल आणि दही
यापासून तयार केलेला फेस पॅक सर्व त्वचेसाठी उपयुक्त ठरतो. हा फेस पॅक तयार करण्यासाठी एक मोठा चमचा ऑलीव्ह ऑईल तेल आणि दोन मोठे चमचे दही घ्या. हे घटक चांगल्या पद्धतीने मिक्स करून त्याची पेस्ट बनवा. चेहऱ्याला ही पेस्ट लावून दोन मिनिटापर्यंत मसाज करा आणि त्यानंतर चेहरा पाण्याने धुऊन घ्या. हा फेस पॅक आठवड्यातून एक ते दोन वेळा आपण वापर करू शकतो. फेस पॅक आपल्या चेहऱ्यावरील निस्तेजपणा कमी करतो.
ऑलिव ऑइल आणि ओट्स
एक मोठा चमचा ऑलिव्ह ऑइल आणि एक मोठा चमचा दूध व एक मोठा चमचा ओट्स घ्या. यामध्ये एक चिमटभर रॉक सॉल्ट घाला. आणि याची स्मुथ पेस्ट बनवा. दोन ते पाच मिनिटांपर्यंत बोटाने चेहऱ्याला गोलाकार फिरवत या पेस्टने मसाज करा. २० मिनिट पर्यंत हे फेस पॅक सुखू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा स्वच्छ करा. हे फेसपॅक आपल्या त्वचेला स्क्रब करण्याचे काम करते. त्याच बरोबर चेहऱ्यावरील तेलकटपणा रोखण्यासाठी मदत करते. चेहऱ्यावरील मुरुमे वाचण्यासाठी हे फेसपॅक उपयुक्त ठरते. विशेषता तेलकट चेहरा असणाऱ्यांसाठी फेसपॅक अत्यंत उपयुक्त आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.