lifestyle Esakal
लाइफस्टाइल

पश्चाताप होणाऱ्या सर्वात 7 मोठ्या चुका; तुम्ही तर करत नाही ना?

स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. आत्मविश्वास वाढेल

सकाळ डिजिटल टीम

तुम्ही कधी-कधी काही निर्णय घेतले आहेत आणि त्याचा नंतर पश्चाताप होतो. असं बरेच वेळेला होते. अस तुमच्या सोबत जर घडले असेल तर तुम्ही एकटे नाही आहात. अनेक वेळा व्यक्ती विचार न करता किंवा नकळत अशा काही गोष्टी करतात ज्यामुळे त्यांना नंतर पश्चात्ताप करावा लागतो. तर दुसरीकडे असे काही लोक असतात जे चुकीच्या गोष्टी करतात किंवा चुकीचे निर्णय घेतात मात्र, कोणीतरी सांगेपर्यंत त्याबद्दल त्या व्यक्तीला काहीच माहिती नसते. पण वेळेत जर समजले की तुम्ही चुकीच वागत आहात तर पुढील घडणाऱ्या वाईट गोष्टी टळतील आणि तुम्हाला पश्चाताप करावा लागणार नाही. आज तुम्हाला काही टिप्स देणार आहोत ज्याचा उपयोग तुम्हाला चुका कमी करण्यास मदत होईल.

आरोग्याची काळजी न घेणे

मला कोणताही आजार नाही मग मी कशाला व्यायाम करायचा, कशाला डायट करायचा,जीवनशैलीवर का लक्ष केंद्रित करू? जेव्हा वजन वाढेल तेव्हा बघू काय करायच असे विचार करणारे बरेच लोक असतात. पण जेव्हा शाररिक समस्या जाणवायला लागतात आणि खिशातले पैसे जायला लागतात तेव्हा लक्षात येते की उगाच दुर्लक्ष केलं. मात्र वेळ निघून गेलेली असते यासाठी आरोग्याकडे लक्ष द्या, जेणेकरून नंतर तुम्हाला पश्चात्ताप होणार नाही.

बालपणीच्या मित्रांपासून दूर जाणे

बालपणीचे किंवा शाळेतील मित्र आपल्यासाठी खूप खास असतात. सुरुवातीला एकत्र असणारे मित्र शिक्षणाच्या, करिअरच्या निमित्ताने एकमेकांपासून दूर जातात. आपण जरी मित्रांपासून दूर गेलो तरी नेहमीच मित्रांच्या संपर्कात राहा. कारण संकटात उभे राहणारे आपले जवळचे मित्र असतात. कितीही मोठ पद मिळाले किंवा तुम्ही कितीही पैसे मिळवत असाल तरी तुम्हाला संकटात मित्रच उपयोगी येतात.

खऱ्या प्रेमाला नाकारने

आपल्यापैकी बऱ्याचजणांचा ब्रेकअप झाला असेल. आपल्यावर जिवापाड प्रेम करणाऱ्या व्यक्तीला आपण सोडून दिले असेल. याला अनेक कारणे असतील. कदाचीत चुक दोघांची असेल.मात्र जोडीदार सोडून गेलाय याची खंत नेहमीच आपल्याला जाणवते. त्याचवेळी थोडं समजून घेतल असते तर आज पश्चाताप करण्याची वेळ आली नसती असा अनेकदा मनात विचार येऊन जातो. जर तुम्हाला पश्चातापाची वेळ आणायची नसेल तर नात्याला वेळ द्या आणि समजून घ्यायला शिका.

योग्य वेळी बचत करा

सुरुवातीला जेव्हा नोकरी मिळते म्हणजे आयुष्यातील पहिला जाॅब. तेव्हापासूनच थोडी-थोडी बचत केली पाहीजे. छोट्या बचतीपासून सुरुवात केली तर पुढे जाऊन त्या बचतीला मोठे स्वरुप येते. गरजा कमी ठेवून तुम्ही बचत केली पाहिजे.नाहीतर नंतर तुम्हाला पश्चात्ताप करण्याशिवाय दुसरा मार्ग राहत नाही.

स्वतःवर विश्वास नसणे

आपल्यापैकी बरेच जण असे असतात ज्यांचा स्वतःवर विश्वास नसतो. यामुळे आत्मविश्वास कमी होतो. आणि जे काम अगदी सहज करता येते ते काम असे लोक करू शकत नाहीत.काही काळानंतर असे लक्षात येते की, हे आपण करू शकलो असतो. उगाच वेळ घालवला. यासाठी स्वतःवर विश्वास ठेवायला शिका. आत्मविश्वास वाढेल आणि तुमची प्रगतीही होईल.

ड्रीम जॉब सोडणे

अनेकवेळा लोक काही कौटुंबिक समस्या किंवा इतर कारणांमुळे त्यांचा ड्रीम जॉब सोडतात. ज्याचा त्यांना आयुष्यभर पश्चाताप होतो. अनेकवेळा त्यांना नंतर हा विचार सतवतो की, त्यांनी परिस्थितीशी थोडीशी स्पर्धा केली असती, तर आज त्यांच्या स्वप्नातील नोकरी त्यांच्या हातात राहीली असती. यासाठी घाई-गडबडीत निर्णय घेऊ नका. वेळ द्यायला शिका.

शिक्षण मध्येच सोडणे

चांगल्या नोकऱ्यांमुळे बरेच लोक आपले शिक्षण मध्येच सोडतात. सुरुवातीला पैसे येतात म्हणून आपण खूप आनंदी राहतो मात्र कालांतराने आपली प्रगती थांबते. विचार करण्याची क्षमता कमी होते आणि आपण नैराश्यग्रस्त होत जातो. यासाठी अभ्यासालाही महत्त्व द्या, कारण अभ्यास कधीच वाया जात नाही, तो तुम्हाला आयुष्यात पुढे घेऊन जातो. त्यामुळे अभ्यास आणि नोकरी यात समतोल राखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT