Mukesh Ambani esakal
लाइफस्टाइल

मुकेश अंबानीच्या बुकलिस्टमधील सर्वोत्तम पाच पुस्तके

२०२२ सालीही अंबानी यांना ही पुस्तके उपयुक्त ठरणार आहेत.

भक्ती सोमण-गोखले

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. मुकेश अंबानी (Mukesh Ambani) 022 मध्ये काहीतरी मोठे करण्याचा विचार करत आहेत, त्यासाठी ते काही पुस्तकांची (Books) मदत घेत आहेत. ब्लूमबर्ग न्यू इकॉनॉमीने नुकतेच त्यांना याविषयी विचारले, मुकेश यांना २०२१ साली कोणत्या पुस्तकांनी यशस्वी होण्यासाठी मदत केली. तसेच ती 2022 सालासाठी उपयुक्त ठरतील का? हा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर मुकेश अंबानी यांनी 5 पुस्तकांचा उल्लेख केला, जी पुस्तके मुकेश अंबानी वाचतात ती तुम्हीही वाचून यशस्वी होण्याचा प्रयत्न करणार का?

Ten Lessons for a Post-Pandemic World By Fareed Zakaria

टेन लेसन्स फॉर पोस्ट पॅन्डामिक वर्ल्ड बाय फरीद झकारीया ( Ten Lessons for a Post-Pandemic World By Fareed Zakaria)

कोरोना महामारी ( Covid-19 Pandemic) आणि अलीकडच्या काळात घडलेल्या काही विनाशकारी घटनांमध्ये समानता आहे. त्यातून जागतिक संकटे अनेकदा अस्थिर जीवनशैली पद्धत आणि कमकुवत शासन संरचनेमुळे उद्भवतात, हे दाखवले गेले आहे. या समस्या लवकरात लवकर सोडविणे अत्यंत गरजेचे आहे, असे तुम्हाला वाटले. पण, हे फक्त कार्यक्षम नेतृत्व, जीवनशैलीतील बदल आणि प्रभावी आंतरराष्ट्रीय सहयकार्याच्या मदतीनेच होऊ शकते. 'प्रकोप अपरिहार्य आहे, पण साथीचे रोग एच्छिक आहेत', हे पुस्तकातील वाक्य मनात कायम लक्षात राहील.

Principles For Dealing With The Changing World By Ray Dalio

प्रिंसिपल्स फॉर डीलिंग विथ द चेंजिंग वर्ल्ड ऑर्डर: व्हाई नेशंस सक्सीड एंड फेल बाय रे डेलियो ( Principles For Dealing With The Changing World By Ray Dalio)

हे एक मनोरंजक पुस्तक आहे. 500 वर्षांपेक्षा जास्त इतिहास असलेल्या प्रमुख देशांचे यश - अपयश सातत्याने ठरवत त्या डायनॅमिक्सचे स्पष्टीकरण देते . आपण आता अनुभवत आहोत त्यापेक्षा येणारा काळ आमूलाग्र का वेगळा असेल हे समजून घेण्यात पुस्तक आपल्याला मदत करते. हे पुस्तक धोरणकर्ते, उद्योजक, अधिकारी आणि मुख्य म्हणजे तरुणांनी आवर्जून वाचावे असे पुस्तक आहे.

The Raging 2020s: Companies, Countries, People And The Fight For Our Future By Alec Ross

द रेजिंग 2020: कंपनीज, कंट्रीज, पीपल एंड द फाइट फॉर अवर फ्यूचर बाय एलेक रॉस (The Raging 2020s: Companies, Countries, People And The Fight For Our Future By Alec Ross)

या पुस्तकात अनेक दशकांपासून सामाजिक सभ्यता टिकवून ठेवणारा सामाजिक करार, सरकार, व्यवसाय आणि लोकांमधील न बोललेले करार, डिडिटल युगात कसे मूलभूत बदल होत आहे त्यावर सखोल भाष्य तरते. पुस्तकात आपल्या काळातील काही महान विचारवंतांबरोबरच राजकीय आणि आर्थिक क्षेत्रातील मोठ्या व्यक्तींच्या मुलाखती आहेत. त्यांनी या बदलांमध्ये मोठे योगदान दिले आहे. तसेच आपल्या सभ्यतेसाठी पुढे काय आहे, यावरही काही लोकांनी आपली मते मांडली आहेत.

2030: How Today’s Biggest Trends Will Collide and Reshape the Future of Everything By Mauro Guillén

2030: हाउ टूडेज बिगेस्ट ट्रेंड्स विल कोलाइड एंड रिशेप द फ्यूचर ऑफ एव्हरीथिंग बाय मौरो गुइलेन (2030: How Today’s Biggest Trends Will Collide and Reshape the Future of Everything By Mauro Guillén)

हे पुस्तक २०३० साली जगाची स्थिती काय असेल त्याच्या व्यवहारिक अंदाजांवर आधारलेले आहे. विशेष म्हणजे, लोकसंख्याशास्त्रातील संभाव्य बदल आणि जागतिक आर्थिक गोष्टींवर होणार्‍या परिणामांबद्दल मुख्य माहिती देण्यात आली. हे शहरीकरण, तंत्रज्ञान, गिग इकॉनॉमी आणि ऑटोमेशनमधील ट्रेंड यावरही प्रकाश पाडते. हे ट्रेंड कोविड नंतरच्या जगाला आकार देण्यास बांधील आहेत, असे यात म्हटले आहे.

Big Little Breakthroughs: How Small, Everyday Innovations Drive Oversized Results By Josh Linker

बिग लिटिल ब्रेकथ्रेाज: हाउ स्मॉल, एव्हरीडे, इनोवेशंस ड्राइव ओवरसाइज्ड रिजल्ट्स बाय जोश लिंकर (Big Little Breakthroughs: How Small, Everyday Innovations Drive Oversized Results By Josh Linker)

हे उद्योजकांनी आवर्जून वाचावे असे पुस्तक आहे. छोटी सर्जनशील कृती आहे जी व्यवसायात मोठ्या प्रमाणात बक्षिसे मिळवते. दैनंदिन सूक्ष्म-नवकल्पना विकसित करून, व्यक्ती आणि संस्था कठीण आव्हानांचा प्रभावीपणे सामना करू शकतात. तसेच त्या कोविड-नंतरच्या जगात परिवर्तनाच्या संधी मिळवू शकतात, यावर हे पुस्तक आधारलेले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुणे जिल्ह्यात महायुती, महाविकास आघाडी यांच्यापैकी कोणाला मिळणार मतदारांचा कौल?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुंबईत नक्की कोण मारणार बाजी? वाचा एका क्लिकवर

Chopda Assembly Election 2024 Result Live: चोपडा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुतीत काटे की टक्कर..!

Islampur Assembly Election 2024 Results : जयंत पाटील विरुध्द निशिकांत पाटील

Erandol Parola Assembly Election 2024 result live : एरंडोल पारोळ्यात कोण मारणार बाजी?

SCROLL FOR NEXT