Bhumi Pednekar sakal
लाइफस्टाइल

Bhumi Pednekar Skin Care Secret: भूमीचं मॉर्निंग रूटीन आहे फारच खास, म्हणूनच दिसते इतकी सुंदर आणि हॉट

बॉलीवूड अभिनेत्रींप्रमाणे सुंदर दिसावे अशी बहुतेक महिलांची इच्छा असते.

Aishwarya Musale

बॉलीवूड अभिनेत्रींप्रमाणे सुंदर दिसावे अशी बहुतेक महिलांची इच्छा असते, परंतु अभिनेत्री फिट आणि सुंदर दिसण्यासाठी काय करतात हे त्यांना माहीत नसते? चला तर मग आम्‍ही तुम्‍हाला अभिनेत्री भूमी पेडणेकरच्‍या स्किन आणि हेल्‍थकेअर रुटीनची काही सिक्रेट सांगतो, जी स्‍वत: भूमीने शेअर केली आहेत.

ट्वीक इंडियाने यूट्यूबवर नुकत्याच पोस्ट केलेल्या एका व्हिडिओमध्ये भूमीने अनेक गोष्टींबद्दल तिचे मत मांडले आहे. सुंदर दिसण्यासाठी आणि निरोगी राहण्यासाठी भूमी कोणते रुटीन फॉलो करते ते जाणून घेऊया.

अशा प्रकारे त्वचेची घेते काळजी

भूमी पेडणेकर मॉर्निंग स्किन केअर रुटीनबद्दल सांगते की, तिच्या त्वचेची काळजी घेण्यासाठी ती सकाळी उठल्यानंतर सुमारे अर्धा लिटर पाणी पिते. त्याचे प्रमाणही कधी कधी कमी होते. भूमी म्हणते की मी शूटिंग करत नसेल तर मी सकाळी फेस वॉश देखील वापरत नाही. कारण मला असे वाटते की माझ्या त्वचेतून हेल्दी ऑइल निघत आहे.

इंटरनल आरोग्याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे

भूमी म्हणते की, पूर्वी मी माझ्या इंटरनल आरोग्याकडे फारसे लक्ष दिले नाही आणि फक्त बाह्य गोष्टींवर लक्ष केंद्रित केले. यासाठी मी वेगवेगळ्या प्रकारचे सीरम, क्रीम आणि सर्व प्रकारचे लेयर्ड उत्पादने वापरण्याचा प्रयत्न करायचे. पण नंतर माझ्या लक्षात आले की त्वचेचा थेट संबंध खाण्यापिण्याशी असतो कारण ते तुमच्या पोटाच्या आरोग्याशी जोडते ज्याला निरोगी ठेवायला हवे.

पचनसंस्थेची काळजी घेते

बॉलिवूड अभिनेत्री भूमी पेडणेकरने सांगितले की, मी माझ्या पचनसंस्थेची खूप काळजी घेते. तेव्हापासून माझे केस, नखं आणि त्वचा खूप सुधारली आहे. भूमी म्हणते की, आता माझी दिनचर्या खूप साधी आहे. जेव्हा स्किनकेअरचा विचार केला जातो तेव्हा मी सनस्क्रीनशिवाय राहू शकत नाही. माझ्यासाठी ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे.

भूमी अनेकदा नाश्ता करत नाही, पण जेव्हा ती करते तेव्हा तिला नाश्त्यात डोसे, पोहे, साबुदाणा खिचडी यांसारखे पदार्थ खायला आवडतात. भूमी म्हणते की मला दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आवडतात आणि मला वाटते की मराठी कांदा पोहे त्यापैकी सर्वोत्तम आहेत.

या गोष्टीही तिच्या रुटीनचा भाग आहेत

भूमी म्हणते की, सकाळी मेंदूला अ‍ॅक्टिव्ह ठेवण्यासाठी एक कप कॉफी चांगली भूमिका बजावते, त्यामुळे मी कॉफीशिवाय राहू शकत नाही. मी सकाळी प्रार्थना करते आणि मी 20 मिनिटांची प्रार्थना करते जी मला ऊर्जा देते. जर माझ्याकडे वेळ नसेल तर सकाळी फक्त 10 मिनिटे शिल्लक असतील, तर मी क्विक एक्सरसाइजमध्ये स्किपींग करते. तुम्ही करू शकता असा हा सर्वोत्तम कार्डिओ व्यायाम आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महाविकास आघाडी सरकार स्थापन करेल; शिवसेनेच्या (UBT) नेत्याचा दावा

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: शायना एन सी सिद्धिविनायकाच्या दर्शनाला पोहोचल्या

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT