Adulteration in Jaggery google
लाइफस्टाइल

Adulteration in Jaggery: असा गुळ असतो शुद्ध; बाकीची सगळी भेसळ

शुध्द गुळाची ओळख म्हणजे तो गडद तपकिरी रंगाचा दिसतो. गुळ स्वच्छ करण्यासाठी अनेक प्रकारची रसायने मिसळली जातात जेणेकरून त्याला हलका तपकिरी रंग येतो.

नमिता धुरी

मुंबई : आपण अनेकदा जुन्या माणसांच्या तोंडी ऐकल असेल की माणूस घरी आला की त्याला गूळ पाणी द्यावं, किंवा जेवणाच्या ताटात एका बाजूला गुळाचा खडा ठेवावा. कारण, गूळ खाणं आरोग्यासाठी खूप चांगल आहे. हिवाळ्यात गुळाचा चहा प्यायल्याने अनेक आजारांचा धोकाही कमी होतो. वजन कमी करण्यासाठी देखील साखरेच्या जागी गुळाचा वापर करता येतो.

गुळापासून फक्त चहाच बनवता येत नाही तर अनेक गोड पदार्थ बनवण्यासाठी गुळाचा वापर केला जातो. यामुळे निरोगी राहण्यासोबतच वजन वाढण्याचा धोका उरत नाही. पण जर गूळ शुध्द असेल तेव्हाच हे फायदे मिळतात. नकली गूळ खाल्ल्याने तुमच्या आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात.

शुध्द गूळ ओळखण्याच्या कोणत्या पद्धती आहेत-

1. चवीवरून ओळखा

सर्व प्रथम गुळाला टेस्ट करा, जर गुळाची चव किंचित खारट किंवा कडू वाटली तर समजून घ्या की गूळ शुद्ध नाही. शुध्द गूळ चवीला गोड असतो.

2. गुळाचा रंग

शुध्द गुळाची ओळख म्हणजे तो गडद तपकिरी रंगाचा दिसतो. गुळ स्वच्छ करण्यासाठी अनेक प्रकारची रसायने मिसळली जातात जेणेकरून त्याला हलका तपकिरी रंग येतो. पण त्याचे वजन वाढवण्यासाठी त्याला पॉलिश करण्याबरोबरच इतर गोष्टींमध्येही भेसळ केली जाते.

3. पाण्याने ओळखा

बनावट गूळ गोड करण्यासाठी त्याच्यात साखरेचे स्फटिक टाकले जातात. ते ओळखण्यासाठी तुम्ही गूळ पाण्यात मिक्स करा, जर गूळ तरंगला तर समजा कि शुध्द गूळ आहे. जर गूळ पाण्यात खाली स्थिरावला तर त्यात अनेक प्रकारची भेसळ आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतांच्या मोजणीमध्ये अजित पवारांनी घेतली आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: विक्रोळीत सुनील राऊत आघाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

SCROLL FOR NEXT