Kids esakal
लाइफस्टाइल

घटस्फोटानंतर को-पॅरेन्टिंग करता येतं का?

दोघं वेगळे झाल्यावर कटुता आलेली असते

भक्ती सोमण-गोखले

आजकाल सर्रास घटस्फोट होतात. काहीना काही कारणामुळे नाते ताणले जाते. त्यात आता तर अगदी बारीक-सारिक गोष्टीही कारणीभूत ठरतात. घटस्फोट (Divorce) घेण्याचा निर्णय झाल्यावर खरा विचार सुरू होतो तो मुलांचा. ते मुलं(Kids) कुठे राहणार? मुलाची सर्वतोपरी काळजी घेण्यासाठी आई किंवा वडील सक्षम आहेत का? असे अनेकविध प्रश्न समोर येतात. नात्यात कटुता आलेली असते. ती नसली तर हा प्रश्न कदाचित पटकन सुटलाही जाऊ शकतो. पण कायद्यानुसार मुलांचा हक्क हा आईलाच मिळतो. आईची जर काळजी घेण्याची तयारी नसेल. ती सक्षम नसेल. किंवा इतर काही कारणं असतील तर तो हक्क वडिलांना मिळतो. पण यातही हा प्रश्न सामंजस्याने सोडवावा लागतो.

आता तर जोडपी त्रासातून सुटण्यासाठी सामंजस्याने लवकरात लवकर घटस्फोट मिळवण्याच्या प्रयत्नात असतात. पण शेवटी मुलांची काळजी हा खूप मोठा भाग असतो. कारण माणसं नवरा किंवा बायको म्हणून चांगली नसली तरीही बाबा किंवा आई म्हणून खूप चांगली असू शकतात. त्यामुळे दोघांनाही मुलांना भेटावं, त्यांना वेळ द्यावा असं वाटत असंत.

malaika arora

आपण बघतो कि मलायका अरोरा- अरबाझ खान, हृतिक रोशन- सुझान खान या जोडीचा घटस्फोट होऊनही ते मुलांसाठी एकत्र येत क्वालिटी टाईम घालवत असतात. गेल्या लॉकडाऊनमध्ये तर सुझान हृतिकच्या घरी जाऊन राहिली होती. हे सेलिब्रिटींसारखे कॉ पॅरेटिंग खरंच रोजच्या सर्वसामान्यांच्या आयुष्यात शक्य आहे का?

याविषयी घटस्फोट झालेला आणि मुलाची काळजी घेत असलेला सुशील व्यवहारे (नाव बदलले आहे) म्हणतो की आमच्या नात्यात खूप कटुता आलेली आहे. पण तिला विश्वास आहे की मी मुलाची जबाबदारी तिच्यापेक्षा उत्तम पार पाडेन. मुलगा तिच्याकडे राहायला जातो. त्याच्या प्रगतिची तिला मी कल्पना देतो. पण तिचे मत माझ्यादृष्टीने महत्वाचे नाही. नात्यातली कटुता खूपच खोलवर आहे. अशीच प्रतिक्रिया घटस्फोट झालेल्या मिनल शिंदेनीही(नाव बदलले आहे.) दिली.

मात्र तनुजा वागळे म्हणते की आमचे पटत नसले तरी मित्रत्वाचे नाते आहे. पटत नसल्याने घटस्फोट घ्यायचा विचार पण करतोय. पण घटस्फोट घेतल्यावर कॉ पेरेटिंग करायचं या विचारावर मात्र आम्ही ठाम आहोत. तशी कल्पना मुलालाही दिली आहे. पण अजून आम्ही हे कसं मॅनेज करायचं हाच विचार करत असल्याने घटस्फोटाची प्रोसेसही लांबली आहे.

husband bite his wife on her wrist gets divorce

प्रत्येक माणूस हा वेगळा असतो. त्याचे जगण्याचे आयाम वेगळे असतात. सेलिब्रिटींचं जगणं वेगळं,त्यांचे प्रश्न वेगळे, सामान्य माणसाचे जगणे वेगळे. त्याला सोशल प्रेशर असतातच. अशा प्रसंगी ही गुंतागुंत वाढवायची का हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे, असे मानसशास्त्रज्ञ सांगतात. अर्थात हे केस टु केस वेगळं असू शकतं. त्यामुळे तुमचा घटस्फोट कशा प्रकारे झालाय, त्याचे परिणाम तुमच्या नात्यावर पर्यायाने मुलावर कसे होणार आहेत त्यानुसार प्रत्येकाने कॉ पॅरेटिंग करावं की नाही हे ठरवावं, असेही मानसोपचार तज्ज्ञ सुचवितात. त्यामुळे व्यक्ती तितक्या प्रकृती या उक्तीनुसार ज्याने त्याने हा प्रश्न सोडवणे गरजेचे आहे.

kids

मात्र, मुलांचा विचार करता त्यांना तुमच्या नात्यात कटुता आल्याची जाणीव असते. पण तुम्ही त्यांच्यासाठी त्याचे आई-बाबा असता. अशावेळी मुलांचा विचार करता कॉ पॅरेंटिंग करायचे असेल तर काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे.

1. तुमच्या भावना मुलांवर लादू नका

तुमच्या मुलांबद्दल तुमच्या भावना व्यक्त करण्याचा योग्य मार्ग शोधणे गरजेचे आहे. त्यासाठी दोघांनीही योग्य प्रयत्न करा.

2. मुलांवर लक्ष केंद्रीत करा

जेव्हा जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीचा राग येतो किंवा त्या गोष्टीमुळे निराश होता तेव्हा तुम्ही हे तुमच्या मुलाच्या फायद्यासाठी करत आहात याची खात्री त्याला द्या.

3. मुलांना कायम भेटत राहा.

मुलांवर तुमचे प्रेम असून जेव्हा एकत्र भेटणे शक्य आहे तेव्हा भेटत राहा. त्याला त्याचा वाटचे परिपूर्ण प्रेम मिळेल याची काळजी घ्या.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT