Changes After Marriage
Changes After Marriage Sakal
लाइफस्टाइल

लग्नानंतर तुम्हाला पण 'ही' समस्या वाटते का?

ऋषिकेश साळवी (Rushikesh Salvi)

मी माझ्या मित्राच्या घरी गेलो हाेताे...कारण त्याच्या लग्नाचा पहिला वाढदिवस होता...तर मी सहज विचारले की काय रे कस चालू आहे तूमचं...तर माझा मित्र बाेलायला चालू झाला ताे "Complaint Box" चं बनला. ती आता पहिल्यासारखी नाही राहिली तीला माझं काहीच पटत नाही, आमचे सारखे खटके उडतात, ती आणि आई यामध्ये माझा 'भावनिक सॅडविच' हाेताेय.

‘‘आमचे पहिले दिवस प्रेमाच्या धुंदीत गेले, आम्ही दोघंही एकमेकांसाठी ‘अगदी स्पेशल’ होताे. पण नतंर सगळ बदलंल...तीला समजतचं नाहीये की मला तिला काय सांगायचे आहे. छान गप्पाही होत नाहीत आमच्या... मी माझ्या कामात असताे तेव्हाच तीला काहीतरी सूचतं तीचं वेगळचं आणि माझ भलतच... ‘मला तुला दडपण द्यायचं नाहीये रे, पण हल्ली माझ्या डोक्यात प्रश्नांचे भुंगे सारखे भुणभुण करत असतात,आधीची प्रेमळ प्रमिला कुठे आहे ? की ते पुरतं नाटक होतं? असं सारखं वाटत राहतं.

माझ्या चेहऱ्यावर सहज हसू आले कारण मी हे अनुभवलं होत...अरे गोविंद हे नॉर्मल आहे... अश्या गोष्टी होतात कारण लग्नाचे पहिले दिवस आपण एकमेकांसाठी देतो तेव्हा आपण स्वतःला बाजूला करून दुसऱ्यासाठी म्हणजे आपल्या आवडत्या व्यक्ती साठी बदलतो आणि नंतर एकत्र आलो कि आपल्या प्रायोरिटी बदलतात कारण आपल्याला आता खूप साऱ्या गोष्टी करायचंय असतात आणि यासाठी आपण जास्त काम करतो कारण आपल्याला त्यांना खूप खुश ठेवायचे असते सगळ्यांना आनंदात पाहायचे असते,

आणि या मुळे आपले थोडेसे आपल्या बायकोकडे आणि घरच्यांकडे दुर्लक्ष होते. तुला जर का सगळ्यांना आनंदात आणि तुलाही आनंदी राहायचं असेल तर तुला काम आणि घर यात बॅलन्स राखला पाहिजे. आपण पुरुष लोक ना आपल्या भावना कोणाशी बोलत नाही आपण आपलेच तो प्रॉब्लेम सोडवण्याचा प्रयत्न करत असतो खूप सारा विचार करून तो सोडवतो देखील पण यामध्ये आपण काही जणांना नकळत दुखावतो देखील, हे आपल्या लक्ष्यात येत नाही.

आणि वहिनी बाबत म्हणशील तर त्या सुद्धा सगळं सांभाळत आहेत तुझं ,घरच आणि काम देखील आता मला सांग एवढं सगळं तुम्ही करताय मग तुमच्या तक्रारी राहणारच पण यावर सोलुशन आहे. ते म्हणजे तू स्वतःला तोड बदल म्हणजे आईला आणि वहिनींना छोट्या छोट्या कामात मदत कर कामावरून घरी आलास तर ऑफिसच टेन्शन सोडून त्यांच्यासोबत थोडा वेळ घालव आई सोबत एखादी सिरीयल बग वडिलांसोबत सकाळी वॉकिंगला जा, बायकोसोबत फिरायला जा अश्या छोट्या-छोट्या गोष्टी तुमच्या नात्यातील दुरावा कमी करतील. आणि महत्वाचं म्हणजे एकमेकांना गृहीत धरू नका जे काही असेल ते एकमेकांनसाेबत बाेलून माेकळे व्हा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uday Samant : 'त्या' घटनेच्या मुळाशी जाणार; पालकमंत्री उदय सामंत यांचा इशारा, म्हणाले...

'...तर रस्त्यात गाड्या फोडणार, गोमातेसाठी प्रसंगी कायदा हातात घेऊ, शेवटचंच सांगतोय'; नीलेश राणेंचा थेट इशारा

Prashant Damle: नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत दामले यांनी पालकांना काय केले आवाहन? वाचा महत्वाची बातमी

Exam Hall Height: परीक्षा हॉलची उंची अधिक असल्यास परीक्षेत कमी गुण मिळतात! अभ्यासातील निष्कर्ष

Ambani Family Sangeet: राधिका-अनंतच्या संगीत सोहळ्याला धोनी, हार्दिकसह अनेक क्रिकेटपटूंही हजेरी, पाहा Video

SCROLL FOR NEXT