Air Conditioner Height esakal
लाइफस्टाइल

Air Conditioner Height : घर ‘थंडा थंडा कुल कुल होण्यासाठी’ AC किती उंचीवर लावावा?

AC चा योग्य फायदा मिळवायचा असेल तर हा बदल कराच!

Pooja Karande-Kadam

Air Conditioner Height : उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. कामानिमित्त बाहेर पडल्यावर शरीराची लाही कमी करण्यासाठी कधी एकदा ऑफिसमध्ये पोहोचतो असं होतं आणि ऑफिसमधून निघालो की लवकरात लवकर घरी पोहोचण्याचे वेध लागतात. उन्हाळ्याच्या झळा कमी करण्यासाठी अनेकजण घरी एसीची थंड हवा खात बसतात. पण, त्याची हवा म्हणावी तशी थंड नसते. का ते जाणून घेऊयात.

लोक कडक उन्हापासून आराम मिळवण्यासाठी एसीचा वापर करू लागले आहेत. एअर कंडिशनरची थंड हवा आपल्याला उष्णतेपासून आराम देते. पण तुम्हाला माहिती आहे का की एसी लावताना त्याची उंची किती असावी?, जर तुम्ही एसीची उंची योग्य ठेवली नाही तर त्यामुळे तुम्हाला त्याचा योग्य तो फायदा होणार नाही.

एसी उन्हाळ्यात तुम्हाला गारवा देत असला. तरी तो चुकीच्या ठिकाणी बसवला गेला तर त्याचा हवा तसा फायदा तुम्हाला मिळणार नाही. एसी लावण्याची योग्य जागा कोणती? त्यामुळे आपल्याला काय फायदा होईल, याबद्दल आज माहिती घेऊयात.

एअर कंडिशनरमध्येही अनेक प्रकार आहेत. एखाद्याच्या वापरानुसार त्यातली उपकरणं आणि उपयोगात फरक असतो. उदाहरण द्यायचं झाल्यास घरासाठी वापरण्यात येणारा एसी आणि ऑफिसमध्ये वापरण्यात येणारा एसी यात फरक असतो. विंडो एसी, स्प्लिट एसी, कॅसेट आणि डकटेबल्स असे एसीच्या वापरानुसार अनेक प्रकार आहेत.

घरासाठी योग्य एसी कोणता?

विंडो एसी हा घरगुती वापरासाठी चांगला पर्याय असला तरी सध्या स्प्लिट एसी आणि कॅसेट एसीचा वापरही घरांमध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो. विंडोज एसीपेक्षा स्प्लिट एसीमुळे अधिक ऊर्जाबचत होते. त्यामुळे या महिन्यातलं विजेचं बिल कमी व्हावं असं वाटत असेल तर विंडो एसीपेक्षा स्प्लिट एसीची निवड करा.

एसीची परफेक्ट उंची आहे ही

किती उंचीवर असावा AC

तुम्हाला तुमची रूम काश्मिरमधील थंड वातावरणासारखी कुल बनवायची असेल. तर एअर कंडिशनर बसवताना त्याच्या उंचीकडे लक्ष द्या. जेव्हा तुम्ही खोलीत AC लावाल तेव्हा त्याची उंची 7 ते 8 फूट ठेवा. एसी कधीही अगदीच वर किंवा एकदम खाली लावू नका. तुम्हाला एसीचे युनिट आकार, छताची उंची आणि खोलीचा आकार देखील विचारात घेणे आवश्यक आहे.

तुम्हीही या सर्व गोष्टींकडे एकदा लक्ष देण्याची गरज आहे. समजा तुमच्या रूमची उंची 10 फूट आहे, तर 8 फूटावर एसी लावा. जर तुमच्या रूमची उंची फक्त 8 फूट असेल तर तुम्हाला कमी उंचीवर एसी बसवावा लागेल. जेणेकरून तुमच्या रूममध्ये हवा व्यवस्थित पसरू शकेल.

एसी लावताना कोपरे लक्षात ठेवा

एअर कंडिशनर लावताना तुम्ही एसी कोणत्या अँगलमध्ये लावत आहात हेही लक्षात ठेवा. विशेषत: स्प्लिट एसी किंचित खाली झुकलेला ठेवावा, जेणेकरून एसीचे कंडेन्सेशन पाणी योग्य प्रकारे बाहेर पडू शकेल.

जर तुम्ही काटकोनातून एसी लावला नाही तर पाणी गळती होण्याची शक्यता असते. तसेच, काही परिस्थितींमध्ये एसी देखील खराब होऊ शकतो. तसेच, तुम्ही ज्या ठिकाणी एसी लावत आहात, तेथे फर्निचर किंवा पडदे नसावेत हेही लक्षात ठेवा. त्यामुळे हवेच्या अभिसरणात अडथळा निर्माण होतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कणकवली मतदारसंघात पहिल्‍या फेरीत भाजपचे नितेश राणे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT