लाइफस्टाइल

Air Pollution : घसा खवखवतोय, डोकेदुखी जाणवते? 'असे' राहा हेल्दी

वायू प्रदुषणामुळे काही लोकांना वारंवार जळजळ होते आणि खोकला येतो.

सकाळ डिजिटल टीम

Health Tips During Air Pollution : दिवाळीच्या आगमनावेळी भारतामध्ये कित्येक भागांमध्ये हवेची गुणवत्ता (Air Qulity) खराब होत आहे. अशा वेळी कोरोना सारख्या महामारीसोबतच आपल्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. वाढत्या वायू प्रदुषणामुळे आधीच कोरोनामुळे असलेल्या समस्यांना आणखी वाढल्या आहेत. दिवाळी येण्यापूर्वीच राजधानी दिल्ली आणि आसपासची शहर वायू प्रदुषणाच्या विळख्यात अडकणार आहे. दिवाळीच्या आदल्या दिवशीच्या सकाळीची स्थिती तर खूप गंभीर असू शकते. दिवाळी येण्या अगोदर दिल्लीतील एक्यूआई(AQI)म्हणजेच एअर क्वालिटी इंडेक्स "खूप खराब'' (Very Poor) होता. पण तो आणखी धोकादायक (Hazardous) पातळीवर पोहचला आहे. ५ नोव्हेंबरच्या सकाळी राजधानी दिल्लीमधील सर्व परिसरांमध्ये एक्युआईचे आकड्यांवरून स्थिती चिंताजनक असल्याचे समजते.

वायू प्रदुषण (Air pollution)आपल्या शरीरावरील अवयवांवर आणि काही प्रक्रियांना नुकसान पोहचवते आहे. हे सीओपीडी म्हणजेच क्रॉनिक ऑब्सट्रक्टिव पल्मोनरी डिजीज (Chronic Obstructive Pulmonary Disease), ब्रोन्कियल अस्थमा (bronchial asthma),अॅलर्जी, थकवा, चिंता, डोकेदुखी, डोळे, घसा आणि नाकामध्ये जळजळ वाढवू शकते. त्यासोबत त्यामुळे नर्वस (nervous)सिस्टिम म्हणजे मज्जासंस्था प्रणाली आणि हृदय प्रणालीला (cardiovascular systems)देखील संभाव्य नुकसान पोहचू शकते.

अशा समस्यांपासून वाचण्यासाठी काही सुरक्षित आणि स्वस्थ समस्यांचा काही सोपे उपाय (how to Stay healthy in Air Pollution)

फटाक्यांपासून दूर राहा

फटाके फोडू नका. फटाके फोडल्यानंतर दुसऱ्या दिवाशी जमा झालेला कचरा जाळू नये. त्यामधून कित्येक प्रकाराचे हानिकारक रसायने असतात जे आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतात. फटाक्यांमध्ये कॉपर, कॅडमियम, सल्फर, अल्यूमिनीयम आणि बेरियम असतेय त्याशिवाय चमक निर्माण करण्यासाठी त्यामध्ये वायब्रंट रंग देखईल वापरतात. त्यामधून असे कण पदार्थ (particulate matter)आणि धातू (जसे की नायट्रोजन ऑक्साईड आणि सल्फर डाईऑक्साईड) बाहेर पडतात, ज्यामुळे तासन् तास ते वातावरणामध्ये फिरत राहतात. ते आपल्या डोळ्यांना आणि फुफ्फुसांना त्रासदायक ठरू शकतात. श्वास घ्यायला त्रास होत, श्वास गुदमरतो.

घरामध्ये व्हेंटीलेशन होईल याची काळजी घ्या

जर घरामध्ये योग्य प्रकारे व्हेंटीलेशन( हवा खेळती राहणे)होत नसेल तर घरात धुर जमा होतो आणि बाहेर पडायला खूप वेळ लागतो. धूरामधील ही स्थिर हवेमध्ये श्वास घेतल्यास श्वास कोंडतो आणि अस्वस्थता जाणवते. त्यामुळे घरातील सर्व खिडक्या आणि दरवाजे खोला म्हणजे घरामध्ये साचलेला धूर बाहेर पडेल. व्हेंटीलेशन तुमच्या घरातील वातावरण आरोग्यदायी ठेवतेय.

मेणबत्ती

घरामध्ये नॉर्मल मेणबत्ती ऐवजी मधमाश्यांच्या पोळ्यापासून बनवलेल नैसर्गिक मेणाच्या मेणबत्या (Beeswax candles)वापरा. त्यामुळे धोकादायकाा धुर कमी करतो आणि तुमच्या घरामध्ये प्रकाश निर्माण करतो. ही हवामध्ये उपलब्ध विषारी सुंयगांचा (toxic compounds)होणारा परिणाम नष्ट करतो. हवा शुध्द करण्यासाठी आणि प्रदुषणाला आपल्या शरीरामध्ये प्रवेश करण्यापासून रोखण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे.

हाऊसप्लांस्ट देखील फायदेशीर

काही हाऊसप्लांट म्हणजे घरामध्ये ठेवले जाणारे रोपं देखील घरामध्ये ताजी आणि प्रदुषणविरहीत हवा खेळती राहते. अमोनिया (ammonia), फॉर्मलाडेहाइड (formaldehyde)आणि बेंजीन (benzene)पासून सुटका मिळवून देण्यासाठी खूप प्रभावी ठरतात. त्यामुळे या रोपांच्या स्वरुपात तुम्हाला एअर फिल्टर मिळतात, जे नैसर्गिक, सुंदर आणि आरोग्यादायी असतात.

मास्क वापरा

जर तुम्हाला प्रदुषण आणि कोरोना व्हायरसपासून वाचण्याची इच्छा आहे तर घरातून बाहेर पडताना चांगल्या क्वालिटीचा मास्क वापरा. N95, N99, किंवा N100 असे मास्क देखील वापरू शकता जे सुक्ष्म कणा वगळ्यासाठी कार्यक्षम असतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Results: लाडकी बहीण पावली! महायुतीला 'एक हे तो सेफ हे'ची जोड अन् झटक्यातच मविआचा हिरमोड

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Karad South Assembly Election 2024 Results : कराड दक्षिणमध्ये पृथ्वीराज चव्हाणांना मोठा धक्का; अतुल भोसलेंनी घेतली 'इतक्या' मतांनी आघाडी

Sanjay Raut : हा जनतेचा कौल नसून, लावून घेतलेला निकाल; संजय राऊतांचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT