Akshaya Tritiya 2024 esakal
लाइफस्टाइल

Akshaya Tritiya 2024 : सुवर्ण नगरी जळगावच्या अस्सल सोन्याची भुरळ ब्रिटीशांनाही पडली होती!

सकाळ डिजिटल टीम

Akshaya Tritiya 2024 : आज अक्षय्य तृतीया आहे. आजच्या दिवशी बऱ्याच नव्या गोष्टींना सुरूवात होते. नवे कपडे, गोडाधोडाचे जेवण आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नवी सोनं खरेदी होय. तस जगभरात लोकांना सोन्याच भारी आकर्षण आहे. पण, भारतातील लोकांना सोनं म्हणजे जीव्हाळ्याचा विषय. कारण, घरात एकतरी सोन्याचा तुकडा असणारी अनेक घरे आहेत.

काही लोक तर प्रत्येक सणाला सोनं खरेदी करतात. तर काहीजण केवळ अक्षय्य तृतीयेलाच खरेदी करतात. कारण, त्या दिवशी सोने खरेदी करणं शुभ मानलं जातं. आजच्या दिवशी आपण महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या सोनेरी नगरीबद्दल जाणून घेऊयात. तिच नावं आहे जळगाव. (story of jalgaon city in marathi why jalgaon city is famous for gold) 

कारण, सोन्याच्या वैशिष्ट्यपूर्ण दागिन्यांमुळे जळगावची विशेष ओळख आहे. देशभरात प्रसिद्ध असलेल्या जळगावच्या सोने बाजारात लोक सकाळपासून गर्दी करतात.जळगावचा सुवर्ण बाजार देशभरात प्रसिद्ध आहे. येथील सोन्याची शुद्धता आणि व्यवहारातील विश्‍वासर्हाता यामुळे महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, दक्षिण भारतातून सातत्याने मोठ्या प्रमाणावर सोन्याचे चोखंदळ ग्राहक जळगावात येतात.

यामुळेच जळगावला सुवर्णनगरी देखील म्हटले जाते. या बाजारपेठेला तब्बल १६० वर्षांची परंपरा आहे. १८६४ मध्ये राजमल लखीचंद ज्वेलर्सने जळगावच्या सराफ बाजाराची मुहूर्तमेढ रोवली. पुढील काळात ती विस्तारत गेली. आजमितीस जळगाव शहरात सुमारे १५० सुवर्ण पेढ्या व सुवर्ण मॉल्स आहेत तर जिल्ह्याची आकडेवारी ५०० च्या वर आहे.

जळगावची सुवर्ण बाजारपेठ  देशभरात प्रसिध्द आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे येथील सोन्याची शुध्दता व गुणवत्ता. उपलब्ध माहितीनुसार, जळगावच्या सुवर्ण बाजारात रोज १०० किलो सोन्याची विक्री होते. आजमितीला जळगावमध्ये सोन्याच्या पेढीसर सुसज्ज शोरुम देखील सुरु झाले आहेत.

यात देशातील सर्वात मोठ्या ब्रॅण्डपैकी एक असलेल्या तनिष्कचा देखील समावेश आहे. जळगावात शोरूम संस्कृतीची मुहूर्तमेढ आर. सी. बाफना  या फर्मने रोवली, असे मानले जाते. जळगावमध्ये केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे तर शेजारच्या गुजरात, मध्यप्रदेश मधून देखील अनेक ग्राहक सोने खरेदीसाठी येतात.

सोन्याची शुद्धता हाच जळगावचा खरा दागिना आहे

ब्रिटिशांच्या काळापासून जळगावच्या सोन्याची महती दुरपर्यंत पसरलेली दिसते. जुन्या लोकांच्या मते ब्रिटिशांनी जळगावमधून देखील खूप सोनं लुटलं आहे, मात्र तशा नोंदी शासनदप्तरी आढळून येत नाही. खान्देश हा सधन आणि सुपीक प्रदेश म्हणून ओळखला जात असे.

येथील केळी व कापसामुळे येथील शेतकरी सधन होते. यामुळे येथील बाजारपेठे देखील मोठी होती. या शिवाय व्यापारी वाहतुकीच्या दृष्टीने हा मध्यवर्ती भाग म्हणून ओळखला जात असे. यामुळे येथे औद्योगिक विकास झपाट्याने झाला. लोकांच्या हातात पैसा खेळू लागला. याच काळात जळगावमध्ये सुवर्ण बाजारपेठे स्थिरावली आहे.

दागिने घडविण्याचे काम तब्बल सहा ते सात हजार कारागीर करतात. त्यात गुजराती, बंगाली व राजस्थानी कारागीरांचा समावेश आहे. सोने-चांदी आखणी करणारे दीड हजार कारागीर आहेत. या बाजाराच्या माध्यमातून जवळपास दहा हजार जणांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

जळगावचा सुवर्ण बाजार राज्यभरात प्रसिद्ध आहे. राज्यात प्रसिद्ध सोन्याचे विक्रेते जळगावात आहेत. जिल्ह्यातून परराज्यांत, मुंबई, पुणे व इतर भागांत नोकरी, व्यवसायानिमित्त गेलेली मंडळी दिवाळीला जळगावातून सोन्याची खरेदी करतात. शिवाय केळी, कापसाच्या भागांतील मंडळीदेखील चांगले उत्पादन आल्यास सोन्याची खरेदी करतात. मध्य प्रदेश, नजीकच्या विदर्भातील बुलडाणा, मराठवाड्यातील औरंगाबादमधील सोयगाव, सिल्लोड, जालना आदी भागांतील खरेदीदारही जळगावात सोने खरेदीसाठी येतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT