Akshaya Tritiya 2024 : अक्षय तृतीया (Akshaya Tritiya 2024) हा सण हिंदू धर्मामध्ये अतिशय महत्वाचा मानला जातो. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, हा दिवस अत्यंत शुभ आणि महत्वाचा आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार, अक्षय तृतीया हा सण दरवर्षी वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथीला साजरा केला जातो.
अक्षय म्हणजे ज्याचा कधी ही क्षय होत नाही किंवा ज्याचा कधी ही नाश होत नाही. या तिथीचा मुहूर्त अतिशय खास आणि महत्वपूर्ण मानला जातो. कारण, या तिथीला कोणतेही शुभ कार्य करण्यासाठी मुहूर्ताचा विचार करावा लागत नाही. हा संपूर्ण दिवसच शुभ असतो. आज अक्षय तृतीया आहे.
अक्षय तृतीयेच्या दिवशी दान आणि पूजा करण्याचे खास असे महत्व आहे. कारण, या दिवशी केलेल्या कृत्याचे शुभ फळ मिळते, अशी धार्मिक मान्यता आहे. या दिवशी सोन्याचे दागिने खरेदी केले जातात. तसेच, माता लक्ष्मीची पूजा केली जाते. आज अक्षय तृतीया आहे. त्यानिमित्ताने आपण शुभ मुहूर्त आणि या सणाचे महत्व काय? त्याबद्दल जाणून घेणार आहोत.
यंदा अक्षय तृतीया सर्वत्र १० मे (शुक्रवारी) ला साजरी केली जाणार आहे. वैदिक दिनदर्शिकेनुसार वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीया तिथी १० मे रोजी पहाटे ४ वाजून १७ मिनिटांनी सुरू होईल. ही तिथी ११ मे २०२४ (शनिवारी) ला पहाटे २ वाजून ५० मिनिटांनी ही तृतीया तिथी समाप्त होईल. (Akshaya Tritiya)
उदय तिथीच्या आधारे यंदा अक्षय्य तृतीया १० मे (शुक्रवारी) ला सर्वत्र साजरी केली जाईल. विशेष म्हणजे आजच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची खास पूजा केली जाते. या पुजेचा शुभ मुहूर्त हा १० मे ला पहाटे ५ वाजून ४८ मिनिटांनी सुरू होणार असून, हा मुहूर्त दुपारी १२ वाजून २३ मिनिटांपर्यंत असेल.
या कालावधीमध्ये तुम्ही अक्षय तृतीयेची पूजा करू शकता. तसेच, या दिवशी सोने खरेदी तुम्ही दिवसभरात कधी ही करू शकता. सोने खरेदीसाठी हा दिवस शुभ मानला जातो. (Akshaya Tritiya shubh muhurat 2024)
हिंदू धर्मामध्ये अक्षय तृतीयेचे विशेष असे महत्व आहे. याच दिवशी भगवान परशुराम यांची जयंती देखील साजरी केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार, त्रेता आणि सतयुगाची सुरूवात ही अक्षय तृतीयेला झाली, म्हणून या तृतीयेला कृतयुगादि तृतीया असे ही म्हटले जाते.
कोणतेही शुभ कार्य पूर्ण करण्यासाठी किंवा कोणत्याही शुभ कार्याची सुरूवात करण्यासाठी अक्षय तृतीयेची तिथी विशेष मानली जाते. कोणताही नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी, नोकरी किंवा नवीन घर आणि खरेदीसाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. (Significance of Akshaya Tritiya)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.