alcohol sakal
लाइफस्टाइल

चाळीस वर्षापेक्षा कमी वय असेल तर चुकूनही मद्यपान करू नका

कमी वयाच्या लोकांनी मद्यपान केल्यास परिणाम भोगावे लागू शकतात, नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे.

सकाळ डिजिटल टीम

मद्यपान आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण तुम्हाला माहित आहे का की, एका विशिष्ट वयानंतर याचे सेवन केले तर ते फायदेशीर देखील ठरू शकते.मात्र या उलट कमी वयाच्या लोकांनी मद्यपान केल्यास त्याचे परिणामही भोगावे लागू शकतात. होय, नुकत्याच झालेल्या एका संशोधनात ही बाब समोर आली आहे. (alcohol is unhealthy if you are younger than 40 a research report said)

ग्लोबल बर्डन ऑफ डिसीज जगभरातील आजार आणि मृत्यूच्या कारणांचा डेटा तयार करतात आणि नुकत्याच त्यांच्या अभ्यासातून समोर आले आहे. लॅन्सेट या वैद्यकीय जर्नलमध्ये हा अभ्यास प्रकाशित झाला आहे.

चार वर्षांपूर्वीच्या एका अभ्यासात असे म्हटले आहे की, एखादी व्यक्ती अधूनमधून मद्यसेवन करतो, त्यामुळेही जास्त नुकसान होते. पण नुकत्याच समोर आलेल्या अभ्यासात असे म्हटले आहे की, दारूच्या सेवनामुळे वृद्धांपेक्षा तरुणांना जास्त नुकसान होते. ठराविक वयानंतर, जर मर्यादित प्रमाणात सेवन केले तर त्याचा फायदा होऊ शकतो. रेड वाईन मर्यादित प्रमाणात प्यायल्याने हृदयविकार, स्ट्रोक आणि मधुमेह यांसारख्या आजारांचा धोका कमी होऊ शकतो, असे या अभ्यासात म्हटले आहे.

युनिव्हर्सिटी ऑफ वॉशिंग्टन स्कूल ऑफ मेडिसिनच्या प्रोफेसरडॉ इमैनुएला गाकिडौ यांच्या मते, मद्यपान करताना वय खूप महत्त्वाचे असते. या अहवालानुसात 15 ते 39 वर्षे वयोगटातील मद्यपान करणाऱ्यांना अधिक नुकसान होण्याची शक्यता असते. तर 40 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या किंवा वृद्धांनी कमी प्रमाणात सेवन केल्यास त्यांना फायदा होऊ शकतो.

2020 मध्ये 204 देशांतील एकूण 1.34 अब्ज लोकांनी मद्यपान केल्याचे अभ्यासात पुढे म्हटले आहे. त्यापैकी 59% लोक 15 ते 39 वयोगटातील होते. आणि या सर्वांना दारूच्या सेवनामुळे कोणत्या ना कोणत्या आजाराला सामोरे जावे लागत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: ठाण्यात पोस्टल मतमोजणी सुरु; एकनाथ शिंदे आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वडाळ्यातून भाजपचे कालिदास कोळमकर ५६५६ मतांनी आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT