How to Remove Tan : उन्हाळ्याला नुकतीच सुरूवात झाली आहे. साधारणपणे मार्च महिन्यापासूनच उन्हाळ्याची चाहूल लागते. या दिवसांमध्ये आरोग्याची खास काळजी घेण्यावर लोकांचा भर असतो. परंतु, आरोग्यासोबतच त्वचेची देखील खास काळजी घेणे गरजेचे आहे. खास करून महिला त्वचेची काळजी घेण्यासाठी या दिवसांमध्ये चेहऱ्याला सनस्क्रिन लावतात.
सनस्क्रिन लावल्यामुळे त्वचेचे टॅनिंग रोखले जाते. परंतु, अनेकदा घाईगडबडीत बाहेर जाण्याच्या नादात हे सनस्क्रिन लावायचे विसरले जाते. उन्हामध्ये बाहेर जाताना चेहरा आणि हात व्यवस्थित झाकले गेले नाही की, मग टॅनिंगची समस्या मोठ्या प्रमाणात वाढते.
ही समस्या दूर करण्यासाठी मग, महागड्या क्रीम्सची मदत घेतली जाते. परंतु, आज आम्ही तुम्हाला हे टॅनिंग दूर करण्यासाठी एक प्रभावी उपाय सांगणार आहोत. हा उपाय आहे कोरफड जेलचा. या कोरफड जेलचा वापर करून तुम्ही फेसपॅक बनवू शकता आणि टॅनिंगच्या समस्येपासून आराम मिळवू शकता. कोणते आहेत हे फेसपॅक? चला तर मग जाणून घेऊयात.
कोरफड जेल आणि लिंबूपासून बनवला जाणारा हा फेसपॅक टॅनिंग घालवण्यासाठी अतिशय प्रभावी आहे. कोरफडमुळे चेहऱ्यावर छान चमक येते आणि लिंबामध्ये असलेले व्हिटॅमिन सी केवळ टॅनिंग दूर करत नाही, तर चेहऱ्यावरील ग्लो देखील वाढवते.
हा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये कोरफड जेल किंवा कोरफडचा गर घ्या. या जेलमध्ये आता लिंबाचा रस मिसळा. हा फेसपॅक आता तुमच्या चेहऱ्यावर, मानेजवळ आणि हातांवर लावा. कमीतकमी १०-१५ मिनिटे हा फेसपॅक ठेवा. त्यानंतर, चेहरा धुवून टाका. हातांवरील फेसपॅक काढण्यापूर्वी हलक्या हाताने ओलसर करा आणि १० मिनिटे मसाज करा. त्यानंतर, हात, मानेजवळील त्वचा स्वच्छ पाण्याने धुवा. (Aloevera gel and lemon face pack)
त्वचेवरील टॅनिंग काढून टाकण्यासाठी कोरफड जेल आणि गुलाबजलपासून बनवला जाणारा फेसपॅक अतिशय फायदेशीर आहे. हा फेसपॅक चेहऱ्यावर लावल्यामुळे टॅनिंग तर निघून जाईल शिवाय चेहरा उजळण्यास मदत होऊ शकेल.
हा फेसपॅक बनवण्यासाठी सर्वात आधी एका बाऊलमध्ये २ चमचे कोरफड जेल किंवा कोरफडचा गर घ्या. यामध्ये आता १-२ चमचे गुलाबजल मिसळा. त्यानंतर, हा फेसपॅक चेहऱ्यावर लावा. १०-१५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवा. अधिक चांगल्या परिणामांसाठी तुम्ही हा फेसपॅक आठवड्यातून २ वेळा चेहऱ्यावर लावू शकता. (Aloe gel and rose water face pack)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.