आनंद महिंद्रा हे कायम त्यांच्या ट्विटर पोस्टमुळे चर्चेत असतात. तसेच ते नेहमी प्रेरणा देणारे ट्विट करत असतात. आनंद महिंद्रांनी(Anand Mahindra) सोमवारी दुपारी ट्विट केलं असून त्यात त्याचा फिटनेस फंडा (Fitness) शेअऱ केला आहे.
महिंद्रा म्हणतात की मी फिटनेस गुरू नाही. दर आठवड्याला माझा फिटनेस कार्डिओ-व्हस्क्युलर (पोहणे/ellipticals) मसल टोन व वजनांसह व्यायाम) (muscle tone working out with weights) )आणि स्ट्रेचिंग (योग) यावर आधारित ठेवतो. तर, दिनचर्येचा सर्वात महत्वाचा भाग म्हणजे दररोज सकाळी 20 मिनिटे ध्यान करतो. यानंतर त्यांनी लोकांना तुमच्या फिटनेस टीप्स द्या असे म्हटले आहे. साहजिकच त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. आनंद महिद्रांनी जो फिटनेस फंडा सांगितलाय तो केल्यास त्यांच्यासारखंच आरोग्यपूर्ण (Healthy) आणि यशस्वी होता येईल.
कार्डिओ-व्हस्क्युलर केल्याने होणारे फायदे (Cardio-Vascular Benefits)
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी काही व्यायाम करून तुमच्या शरीरातील चरबी कमी करू शकता. काही कार्डिओ व्यायाम तुमचे वजन जलद कमी करू शकतात. व्यायामशाळेशिवाय आणि ट्रेनरच्या मदतीशिवाय तुम्ही कार्डिओ व्हस्क्युलर cardio-vascular (swimming / ellipticals) करू शकता. यात आनंद महिंद्रा करतात ते पोहणे, ट्रेडमिलवर धावणे, चालणे(ellipticals), याबरोबर जीना चढ- उतार करणे, धावणे, दोरीच्या उड्या मारमे अशाप्रकारचे काही व्यायामप्रकार केल्याने तुमची कॅलरी जाळून वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. तसेच तुम्ही तंदुरूस्त राहण्यास मदत होते.
वजनासह व्यायाम केल्याने फायदे (Muscle Tone Benefits)
स्नायूंच्या टोनिंगमुळे शरीरातील चरबी आणि वजन कमी होते. तग धरण्याची क्षमता वाढून रोग होण्याची शक्यता कमी होते तुमचे मानसिक आरोग्य सुधारते. तसेच कामात अधिक सतर्कता येते. हा व्यायाम केल्याने तुमचे जीवन अधिक आनंददायी होऊ शकते. तुम्ही सुरूवातीला कमी वजनाचे डंबेल्स घेऊन हा प्रकार करायला सुरूवात करू शकता. सुरूवातीला एक्सपर्टची मदत घेऊन केल्यास नक्कीच फायदा होतो.
Body Stretching केल्याचे फायदे
तुमचा दिवस चांगला जावा आणि थकवा दूर व्हावा यासाठी एक चांगला मार्ग बॉडी स्ट्रेचेस. ते केल्याने तुमचे शरीर स्थिर होण्यास मदत होईल. तसेच स्ट्रेचिंगमुळे तुमचे स्नायू लवचिक राहतात. लवचिकता असल्यामुळे सांध्यातील हालचालीं अधिक चांगल्या पद्धतीने कार्य करतात. तसेच मॉर्निंग स्ट्रेचमुळे तुमच्या सांधे आणि स्नायूंमधील वेदना कमी होण्यास मदत होते.
ध्यान करण्याचे फायदे (Meditation Benefits)
नियमित ध्यान केल्याने मेंदूतील वैचारिक व भावनिक केंद्रे शांत राहतात. या शांततेत झालेले मेंदूचे कार्य हे उच्चप्रणालीचे असते. प्राणायाम व ध्यानाने मेंदूला गती मिळते व मेंदूत सूक्ष्म बदल होऊ लागतात. ध्यान केल्यामुळे रक्तातील स्ट्रेस हॉर्मोन 'कॉर्टिसोल' आणि 'कॅटेकोलोमीन'चे प्रमाण कमी होते.नियमित ध्यान केल्यास आपल्या मेंदूतील 'अमिगडाला' नावाचा भाग शांत होतो. हा भाग म्हणजे चिंता, भीती, काळजी यांचं केंद्र आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.