Anant Ambani Fitness Trainer Sakal
लाइफस्टाइल

Anant Ambani Fitness Trainer: अनंत अंबानींचं १०८ किलो वजन कमी करणारा ट्रेनर आज झालाय करोडपती; जाणून घ्या कोण आहे विनोद चन्ना

अनेक वर्षे जिम ट्रेनर म्हणून काम करणारा विनोद आज करोडपती आहे.

वैष्णवी कारंजकर

भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी त्यांच्या संपत्ती आणि प्रसिद्धीसाठी जगभरात प्रसिद्ध आहेत. पण मुकेश अंबानी आणि त्यांची पत्नी नीता अंबानी गेल्या काही वर्षांपासून धाकटा मुलगा अनंत अंबानीच्या आजारपणामुळे काळजीत आहेत. अनंत अंबानीला दीर्घकालीन दम्याचा त्रास आहे. यामुळे त्याला जास्त प्रमाणात औषधे घ्यावी लागली. त्यामुळे त्याचं वजन खूप वाढलं आहे. अनंत अंबानीने २०१६ मध्ये त्याचं वजन १०८ किलोने कमी केलं होतं, तर यापूर्वी त्याचे वजन २०८ किलो होते, पण आता त्याचं वजन पुन्हा वाढलं आहे.

आज आम्ही तुम्हाला अनंत अंबानींच्या फिटनेस ट्रेनरबद्दल सांगणार आहोत, ज्याने अवघ्या १८ महिन्यांत १०८ किलो वजन कमी करून घेतलं. त्याचं नाव विनोद चन्ना. तो भारतातील सर्वाधिक मागणी असलेला सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर म्हणून ओळखला जातो. अनंत अंबानींचे पर्सनल ट्रेनर असल्यामुळे विनोद प्रथम प्रकाशझोतात आला. आज तो देशातील सर्वात महागडा सेलिब्रिटी फिटनेस ट्रेनर म्हणून ओळखला जातो.

फिटनेस ट्रेनर होण्यापूर्वी विनोद चन्ना यांनी आपला उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक नोकऱ्या केल्या. यामध्ये हाउसकीपिंग आणि सिक्युरिटी गार्डच्या नोकऱ्यांचाही समावेश आहे. विनोद जेव्हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करायचा. यावेळी त्याला आपल्या शरीराकडे लक्ष देण्याचे लक्षात आले. यानंतर त्याने जिम जॉईन करण्याचा निर्णय घेतला. अनेक वर्षे जिम ट्रेनर म्हणून काम करणारा विनोद आज करोडपती आहे.

विनोद चन्ना यांनी बिझनेस इनसाइडरला सांगितलं की, त्यांनी अनंत अंबानींच्या फिटनेससाठी एक उत्कृष्ट आहार आणि व्यायाम कार्यक्रम तयार केला आहे. पण अनंतला जंक फूडची आवड असल्याने त्याचा डाएट प्लॅन फॉलो करणं सोपं नव्हतं. विनोद, त्याचे संपूर्ण लक्ष अनंतचे वजन कमी करण्यावर होतं. त्यामुळेच त्यांनी अनंत अंबानींचा डाएट प्लॅन बदलला.

विनोद चन्ना पुढे म्हणाले, 'मी अनंतला रोज ५ ते ६ तास वर्कआउट करायला लावायचो. यामध्ये २१ किलोमीटर चालण्याचाही समावेश होता. यावेळी त्यांना योगा करायला लावत असे. वजन कमी करण्यासाठी कार्यात्मक प्रशिक्षण आणि कार्डिओ पण केलं. आहारात झिरो-सेव्हर, हाय प्रोटीन आणि लो-फॅट लो-कार्ब यांचा समावेश होता. याशिवाय हिरव्या भाज्या, कडधान्ये, अंकुरलेले धान्य आणि दुग्धजन्य पदार्थ जसं की चीज, दूध यांचा आहार चार्टमध्ये समावेश करण्यात आला आहे. या काळात त्यांना दररोज फक्त १२०० ते १४०० कॅलरीज वापरण्याची परवानगी होती.

नीता अंबानी, कुमार मंगलम बिर्ला, अनन्या बिर्ला यांसारख्या देशातील अनेक उद्योगपतींशिवाय, विनोद चन्ना हे बॉलिवूड सेलिब्रिटी जॉन अब्राहम, शिल्पा शेट्टी, विवेक ओबेरॉय, अर्जुन रामपाल आणि हर्षवर्धन राणे यांच्यासह अनेक सेलिब्रिटींचे वैयक्तिक प्रशिक्षक आहेत. विनोद चन्ना १२ सत्रांसाठी दीड ते दोन लाख रुपये घेतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : कमला हॅरिस की पुन्हा डोनाल्ड ट्रम्प? महासत्तेच्या अध्यक्षपदासाठी अमेरिकेत मतदान

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT