Anant Radhika 2nd Pre Wedding esakal
लाइफस्टाइल

Anant Radhika 2nd Pre Wedding : अंबानींच्या क्रूझ पार्टीत पाहुण्यांनी दाक्षिणात्य पदार्थांवर मारला ताव

Monika Lonkar –Kumbhar

Anant Radhika 2nd Pre Wedding : भारताचे सुप्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या कुटुंबात सध्या लगीनघाई सुरू आहे. त्यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा दुसरा प्रीवेडिंग सोहळा नुकताच संपन्न झाला. २९ मे पासून इटलीतील क्रूझवर सुरू झालेली ही प्रीवेडिंग पार्टी फ्रान्समध्ये जाऊन संपली. अनंत आणि राधिका जुलैमध्ये विवाहबंधनात अडकणार आहेत.

दरम्यान, या क्रूझ पार्टीला बॉलिवूड आणि हॉलिवूडसहीत अनेक कलाकारांनी हजेरी लावली होती. या पार्टीतील काही फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

या क्रूझ पार्टीमध्ये आलेल्या पाहुण्यांनी चक्क दाक्षिणात्य खाद्यपदार्थांवर ताव मारला आहे. या संदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली असून त्यात अस म्हटलय की, क्रूझवर सेलिब्रिटींना खास दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ देण्यात आले होते. या पदार्थांवर पाहुण्यांनी यथेच्छ ताव मारला.

पाहुण्यांनी दक्षिण भारतीय खाद्यपदार्थांवर मारला ताव

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये देश-विदेशातील अनेक बडे स्टार्स सहभागी झाले होते. या पार्टीचे जेवणही स्पेशल होते. अंबानी कुटुंबाला खास करून गुजराती आणि दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आवडतात. या पार्टीला पाहुण्यांसाठी खास बंगळुरूमधील प्रसिद्ध रामेश्वरम कॅफेमधून दाक्षिणात्य खाद्यपदार्थ देण्यात आले होते. याचे फोटो रामेश्वरम कॅफेच्या अधिकृत सोशल मीडिया हॅंडलवर शेअर करण्यात आले आहेत.

रामेश्वरम कॅफेने सोशल मीडियावर शेअर केली पोस्ट

या संदर्भात रामेश्वरम कॅफेने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम हॅंडलवर फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलय की, 'आणखी एक मैलाचा दगड, आणखी एक यश, स्पेनमधील @celebritycruises वर पार पडत असलेल्या जगातील सर्वोत्तम प्री-वेडिंग सेलिब्रेशनचा एक भाग बनताना आम्हाला अतिशय आनंद होतोय.

@therameshwaramcafe हे दक्षिणेतील एकमेव रेस्टॉरंट आहे, जे उत्कृष्ट दक्षिण भारतीय जेवण देते', अशा शब्दांमध्ये ही पोस्ट शेअर करण्यात आली होती. परंतु, काही वेळाने ही पोस्ट डिलीट करण्यात आली. परंतु, सोशल मीडियावर या पोस्टमध्ये शेअर करण्यात आलेले फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले आहेत.

दरम्यान अनंत-राधिकाच्या या प्री-वेडिंग सोहळ्यात जागतिक स्तरावरील गायकांनी देखील त्यांचा परफॉर्मन्स सादर केला आणि या सोहळ्याची रंगत वाढवली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोदींच्या काँग्रेसवरील टीकेपासून ते वर्षा उसगांवकरांनी केलेल्या मोठ्या खुलाशापर्यंत, वाचा आजच्या महत्त्वाच्या घडामोडी एका क्लिकवर

Nashik Crime : एमजी रोडच्या मोबाईल मार्केटमध्ये ‘ॲपल’ची बनावट ॲक्सेसरीज्‌; गुन्हे शाखेच्या युनिट एकचा छापा

Russell, Pooran, Hetmyer यांची श्रीलंकेविरूद्धच्या मालिकेतून माघार; तर १७ वर्षीय खेळाडूला संघात स्थान

Team India ला मोठा धक्का! Shivam Dube टी-20 मालिकेतून बाहेर, 'या' खेळाडूला मिळाली संधी

Mumbai Metro Line 3 ला मोदींकडून हिरवा कंदील; आधी मजुरांशी संवाद, नंतर विद्यार्थ्यांशी गप्पा, पाहा व्हिडिओ

SCROLL FOR NEXT