Anant-Radhika Wedding sakal
लाइफस्टाइल

Anant-Radhika Wedding : राधिकाचा विषयच लय भारी! लग्नामध्ये परिधान केले बहिणीचे दागिने...

लग्नाच्या दिवशी घातलेले दागिने तिची बहीण अंजली मर्चंटचे होते.

सकाळ डिजिटल टीम

अखेर 12 जुलै रोजी अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचे लग्न झाले. हा विवाहसोहळा अतिशय भव्यदिव्य होता, ज्यामध्ये बॉलिवूडपासून ते आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींपर्यंत सर्वजण उपस्थित होते. राधिकाचा वेडिंग लूक चांगलाच व्हायरल झाला. तिचा लाल आणि पांढरा ब्राइडल आउटफिट लोकप्रिय डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाइन केला होता. राधिकाने तिच्या लेहेंग्यासह लेयरचे दागिने परिधान केले होते, ज्यामुळे बरीच चर्चाही झाली होती.

बहिणीचे दागिने घातले होते

आता असे म्हटले जात आहे की राधिकाने तिच्या लग्नाच्या दिवशी घातलेले दागिने तिची बहीण अंजली मर्चंटचे होते. अंजलीने ते तिच्या लग्नात परिधान केले होते. रिपोर्टनुसार, राधिकाने पोल्की कुंदन चोकर घातला होता जो तिची बहीण अंजलीचा आहे. 2020 मध्ये झालेल्या लग्नात अंजलीने हाच नेकपीस घातला होता. एवढेच नाही तर राधिकाचा मांगटिका, हातफूल आणि कानातलेही अंजलीचे होते.

राधिकाने यापूर्वीही चोकर परिधान केले आहे

राधिकाने चोकर नेकलेस परिधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही, अशीही बातमी आहे. याआधी 2018 मध्ये राधिकाने ईशा अंबानीच्या रिसेप्शनमध्ये याच मांगटीकासह हेच दागिने परिधान केले होते.

निर्माती आणि स्टायलिस्ट रिया कपूरने यापूर्वी सांगितले होते की राधिकाने तिची आई, आजी आणि बहिणीचे दागिने घातले आहेत. प्रत्येकाने आपल्या लग्नात ते दागिने घातले आहेत.

लग्नात गुजराती स्टाइलचा लेहेंगा घातल्यानंतर, राधिकाने विदाईच्या वेळी मनीष मल्होत्राचा बनारसी डिझाइनचा लेहेंगा घातला. राधिकाचे दोन्ही लूक सोशल मीडियावर लोकप्रिय झाले आहेत.

Georai Crime : बुधप्रमुखांचा अर्ज भरण्यास गेलेल्या एकावर लोखंडी रॉड आणि कोयत्याने तिघांकडून मारहाण, बीडच्या गेवराईतील घटना

Bharat Global Developers : बोनस आणि स्टॉक स्प्लिटचा डबल धमाका, कोणता आहे हा शेअर ?

Belrise Industries IPO Launch : बेलराईज इंडस्ट्रीज आणणार 2150 कोटीचा आयपीओ, डिटेल्स जाणून घ्या...

Udgir Assembly Elecion Result : पंचवीस टेबल, २६ राऊंडमध्ये होणार मतमोजणी; बारा वाजेपर्यंत ट्रेंड हाती येणार

Ramchandra Ingawale : राजकारणाचा नुसता चिखल झालाय; भूगावमधील १०९ वर्षीय रामचंद्र इंगवलेंची व्यथा

SCROLL FOR NEXT