Anant Radhika Wedding esakal
लाइफस्टाइल

Anant Radhika Wedding : अनंत-राधिकाच्या लग्नात २५०० पेक्षा जास्त पदार्थांची मेजवानी, जगप्रसिद्ध शेफ बनवणार आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ

Anant Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट आज विवाहबंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नात पाहुण्यांना २५०० पेक्षा अधिक खाद्यपदार्थांची मेजवानी असणार आहे.

Monika Lonkar –Kumbhar

Anant Radhika Wedding : जगप्रसिद्ध उद्योजक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आज राधिका मर्चंटसोबत लग्नबंधनात अडकणार आहे. त्यांच्या लग्नाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा पहायला मिळत आहे. अनंत-राधिकाच्या लग्नापूर्वी अनेक सोहळे पार पडले या सोहळ्यांना हॉलिवूड, बॉलिवूडसहीत अनेक क्षेत्रांमधील दिग्गज लोकांनी हजेरी लावली होती.

आज अनंत-राधिकाच्या लग्नाला जगभरातील सेलिब्रिटींची उपस्थिती असणार आहे. या शाही विवाहसोहळ्याला पाहुण्यांच्या स्वागतासाठी अनेक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ उपलब्ध असणार आहेत. विशेष म्हणजे जगभरातील १० प्रसिद्ध शेफ या लग्नात सहभागी होऊन खास प्रकारचे खाद्यपदार्थ बनवणार आहेत.

अनंत-राधिकाच्या लग्नात २५०० पेक्षा अधिक पदार्थ

अनंत-राधिकाचे लग्न मुंबईतील वांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्समधील जिओ वर्ल्ड सेंटरमध्ये पार पडणार आहे. या लग्नात येणाऱ्या पाहुण्यांना २५०० हून अधिक भारतीय आणि आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थांची मेजवानी मिळणार आहे.

हे खाद्यपदार्थ बनवण्याची जबाबदारी देशभरातील सुप्रसिद्ध खाद्यपदार्थ विक्रेत्यांना देण्यात आली आहे. यासोबतच जगभरातील नावाजलेल्या १० पेक्षा अधिक शेफला या शाही लग्नासाठी खास आमंत्रित करण्यात आले आहेत. हे शेफ आंतरराष्ट्रीय खाद्यपदार्थ पाहुण्यांसाठी बनवणार आहेत.

बनारसची खास स्पेशल चाट बनवली जाणार

अंबानी कुटुंबातील सर्व सदस्यांचे बनारसवर असलेले प्रेम जगजाहीर आहे. यापूर्वी अंबानी कुटुंबातील अनेक सदस्य बनारसमधील खास चाटवर ताव मारताना दिसले आहेत. त्यामुळे, आजच्या शाही लग्नात देखील बनारसचे स्पेशल चाट पाहुण्यांना चाखायला मिळणार आहेत.

यासोबतच पाहुण्यांना खास बनारसची मिठाई आणि पानही खायला मिळणार आहे. पान, चाटसोबतच लग्नात उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांना मद्रास फिल्टर कॉफीचा ही आनंद घेता येणार आहे. मागील काही दिवसांपूर्वीच नीता अंबानी बनारसच्या रस्त्यांवर बनारसी चाटचा आस्वाद घेताना दिसल्या होत्या.

१०० हून अधिक नारळाचे पदार्थ पाहुण्यांना सर्व्ह केले जाणार

अनंत-राधिकाच्या शाही लग्नात अनेक परदेशी पाहुणेही येणार आहेत. त्यामुळे, या परदेशी पाहुण्यांची पसंती लक्षात घेऊन इंडोनेशियाची केटरिंग कंपनी कोकोनटला विशेष ऑर्डर देण्यात आली आहे. ही कंपनी १०० हून अधिक नारळावर आधारित खाद्यपदार्थ बनवणार आहे.

या व्यतिरिक्त इंदूरचा गराडू चाट, केशर क्रीम वडा आणि मुंगलेट हे खास पदार्थ पाहुण्यांना दिले जाणार आहेत. थोडक्यात काय तर पारंपारिक भारतीय खाद्यपदार्थांसोबतच अनेक परदेशी खाद्यपदार्थांचा समावेश या लग्नाच्या मेन्यूमध्ये करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT