Anant and radhika Wedding esakal
लाइफस्टाइल

Anant and radhika Wedding : बाबो! अनंत राधिकाच्या लग्नात होणार इतका खर्च, लग्न दणक्यात पडणार पार

अनंत आणि राधिका यांचा विवाह सोहळा शुक्रवार, १२ जुलै रोजी होणार आहे

सकाळ डिजिटल टीम

Anant and radhika Wedding :

उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चेंट यांचे प्री-वेडिंग फंक्शन जामनगर येथे मार्च महिन्यात पार पडले. तेव्हापासून त्यांच्या लग्नाची उत्सुकता लागली आहे. या दोघांचे लग्न मुंबईमध्ये होणार आहे. लग्नाची तारीख, खर्च या सर्वांबाबतीत काही माहिती समोर आली आहे.

अनंत अंबानी आणि राधिका यांचा लग्न सोहळा मुंबईत १२ जुलै रोजी बीकेसी येथील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये पार पडणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका हे पारंपारिक हिंदू वैदिक पद्धतीने लग्न करणार आहेत.

अनंत आणि राधिका यांचा विवाह सोहळा शुक्रवार, १२ जुलै रोजी होणार आहे. त्यानंतर शनिवार, १३ जुलै रोजी हा शुभ आशीर्वादाचा कार्यक्रम पार पडणार आहे. तर रविवार, १४ जुलै रोजी मंगल उत्सव सोहळा असणार आहे.

मुकेश आणि नीता अंबानी यांचा धाकटा मुलगा अनंत आणि राधिकाच्या १ ते ३ मार्च या कालावधीत झालेल्या या प्री-वेडिंग सेलिब्रेशनमध्ये देशभरातील आणि जगभरातील नामांकित व्यक्ती सहभागी झाल्या होत्या. या तीन दिवसांच्या कार्यक्रमावर अंदाजे १,२६० कोटी रुपये खर्च करण्यात आले होते.

या लग्नाला किती खर्च येईल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, आता लग्नाचा खर्चही हा आकडा पार करेल, असे मानले जात आहे. अनंत-राधिकाच्या लग्नात तब्बल १२०० ते १५०० कोटी खर्च करण्यात येतील असा अंदाज वर्तवला जात आहे.

तीन दिवसांच्या कार्यक्रमावर एकूण अंदाजे खर्च १,२६० कोटी रुपये होणार आहे. यातील मोठा हिस्सा केटरिंगमध्ये गेला. साधारण, २०० कोटी रुपये फक्त केटरिंगसाठी खर्च केले आहेत.

मुकेश अंबानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. त्यांची संपत्ती ११६अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त आहे. लग्नासाठी १५०० कोटी रुपये खर्च होऊ शकतो असा अंदाज आहे. भारतात होणारं हे सर्वा महागडं लग्न असेल,अशी चर्चा रंगली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Patil: पवारांची साथ मिळूनही हर्षवर्धन पाटलांसाठी निवडणूक सोप्पी नाही? घरातूनच बसला धक्का

Pune News : नव्या पाहुण्यासाठी हवा सरकारी दवाखाना; खासगीपेक्षा अधिक पसंती, अडीच वर्षांत ६९ हजार प्रसूती

Sakal Podcast: अमेरिकेत ट्रम्प येणार की हॅरिस? ते अर्जुन तेंडुलकर CSK च्या जर्सीत दिसणार?

आपापल्या उमेदवारांसाठी ‘हे’ १७ बडे नेते सोलापुरात! पंतप्रधान मोदी, राहुल गांधी, शरद पवार, योगी, रेवंथ रेड्डी, सिद्धरामय्या, उद्धव व राज ठाकरे, ओवैसी यांच्या प्रचारसभा, वाचा...

कौटुंबिक वारसा जपताना...

SCROLL FOR NEXT