Anant-Radhika Haldi Ceremony:
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नापूर्वीच्या विधींना सुरुवात झाली आहे. संगीत सोहळ्यानंतर काल हळदी समारंभ पार पडला. हळदी समारंभाला अनेक बॉलीवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. या हळदी समारंभाचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत.
दरम्यान, अंबानी कुटुंबातील सदस्यांचे काही लुक्सही समोर आले आहेत. पण चर्चा सुरु आहे ती म्हणजे वरमाईची. निता अंबानी यांच्या हळदीच्या खास लुकने सर्वांचे लक्ष वेधून घेतलं होतं. मुलाच्या लग्नात नवरीमुलीपेक्षा वरमाईचीच चर्चा अधिक रंगल्याचे पाहायला मिळत आहेत.
गेल्या काही दिवसांपासून निता अंबानी यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतलं आहे. कधी साडी तर कधी लेहेंगा. त्यांचा प्रत्येक लुक त्यांच्या चाहत्यांच्या मनावर राज्य करताना दिसत आहे. अशातच काल अनंत राधिकाच्या हळदी समारंभाला चार चाँद लावले. या समारंभाला निता अंबानी यांनी शाही हैदराबादी सूट परिधान केला होता ज्यामध्ये त्यांचे सौंदर्य खुलून आलं होतं.
निता अंबानी यांनी परिधान केलेला हैदराबादी सूट प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राने डिझाईन केला होता. त्यांचा हा सूट अॅन्टीक गोल्डने सजवला होता ज्याला आयकॉनिक खडा दुपट्टाची जोड होती. अतिशय सुरेख नक्षी, अँटिक जरी वर्क, एव्हरग्रीन जरदोजी एम्ब्रॉयडरीने हा सुट सजवण्यात आला होता.
हा सूट करण्यासाठी काही खास कारागीर होते. किचकट चांदीची सोनेरी चटाई टेक्नीक बॉर्डर या सूटवर खास कारागिरांकडून करण्यात आली होती. सुटचे प्रत्येक काम हे विशेष आहे.
सेलिब्रिटी मेकअप आर्टिस्ट मिकी कॉन्ट्रॅक्टरने नीता अंबानींचा हळदी समारंभासाठी हा खास मेकअप केला होता. तर हेअर स्टायलिस्ट रितिका कदम यांनी अंबानी यांची सुंदर हेअर स्टाईल केली होती. या सूट खास निता अंबानी यांनी सुंदर चांदबली कानातले आणि मांग टिक्का केला होता ज्यामुळं त्यांच्या सौंदर्यात आणखी भर पडली होती.
अनंत व राधिकाच्या हळदी समारंभाला भाईजान सलमान खान, रणवीर सिंह, ओरी, अनन्या पांडे, सारा अली खान, मानुषी छिल्लर, जान्हवी कपूर, शिखर पहारिया, बोनी कपूर, वेदांग रैना यांच्या अनेक सेलिब्रिटी पोहोचले होते. अँटिलियामध्ये मोठ्या थाटामाटात अनंत व राधिकाचा हळदी समारंभ पार पडला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.