Nita Ambani Special Mehandi esakal
लाइफस्टाइल

Anant-Radhika Wedding : विवाह सोहळा पार पडला पण लक्षात राहीली ती निता अंबानींची खास मेहंदी, कारणही तसंच आहे

Nita Ambani Special Mehandi : कुटुंबाला घट्ट जोडण्यात निता अंबानी यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या या मेहंदीचे कौतुक होत आहे.

सकाळ डिजिटल टीम

Anant-Radhika Wedding :

जगभर कौतुक झालेला अनंत आणि राधिका यांचा विवाह सोहळा नुकताच पार पडला आहे. या विवाहाला कोणाची हजेरी नव्हती असे नाही. राजकीय मंडळी, चित्रपटसृष्टीतील मात्तबर मंडळी या सोहळ्याला हजर होते. कलाकारांनी हरेजी लावून लग्नसोहळ्याचा मनमुराद आनंद घेतला.

या विवाहसोहळ्यातील काही लुक्स, व्हिडिओ आता व्हायरल झाले आहेत. विवाह प्रसंगी मेहंदी काढणे आलेच. राधिका मर्चंटच्या सासुबाई निता अंबानी यांच्या मेहंदीचा एक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्याचे कारणही तसेच आहे. (Anant-Radhika Wedding)

नेहमी मेहंदीमध्ये अनेक प्रकारच्या डिझाईन्स वापरल्या जातात. कोयली,मोर,ढोल ताशे,पाने फुले यांनी हातभर काढलेली मेंहदी जास्त रंगते. पण, निता अंबानी यांनी काढलेली मेहंदी चर्चेत आहे. निता अंबानी यांनी काढलेली मेहंदी महाग असेल, परदेशातून आणली असेल. तर असं नाहीय. निता यांनी हातावर संपूर्ण अंबानी कुटुंबच रेखाटलं आहे. त्यामुळे ती चर्चेत आहे.

या मेहंदीला प्रेमाचा,आपुलकीचा स्पर्श देण्यासाठी निता यांनी हातावर संपूर्ण अंबानी कुटुंबच अवतरले होते. अंबानी कुटुंबातील सर्वांचीच हातावर नावे लिहिली होती. (Nita Ambani)

सुनबाई राधिका,श्लोका, मुले आकाश,अनंत, मुलगी ईशा आणि त्यांच्या मुलांची नावे त्यांनी या मेहंदीमध्ये रेखाटली होती. निता अंबानी त्यांच्या मुलांवर नातवंडांवर जिवापाड प्रेम करतात. त्यामुळेच, त्यांना हे कुटुंब नेहमीच जोडून ठेवायचे आहे. त्यामुळेच त्यांनी ही नावं हातावर रेखाटली आहेत.

तसं तर हातावरील मेहंदीवर आवडत्या व्यक्तीचे म्हणजे पतीचे किंवा पत्नीचे नाव लिहीले जाते. पण, निता अंबानी यांनी संपूर्ण कुटुंबातील सदस्यांची नावे मेहंदीमध्ये काढली आहेत.

कुटुंबाला घट्ट जोडण्यात निता अंबानी यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या या मेहंदीचे कौतुक होत आहे.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mayawati : 'बसप' इतर पक्षांसोबत मिळून निवडणूक का लढवत नाही? मायावतींनी सांगितले 'हे' कारण

Assembly Election: देशात 'चार सौ पार'ला फटका! आता महाराष्ट्रात भाजप ‘बटेंगे तो कटेंगे’मुळे बॅकफूटवर

Priyanka Gandhi: प्रियंका गांधींच्या नागपूरमधील रॅलीत मोठा राडा, काॅंग्रेस आणि भाजप कार्यकर्ते आमनेसामने आले अन्....

"Fake Narrative फार काळ टिकत नाही"; पंतप्रधान मोदींनी केलं विक्रांत मेस्सीच्या द साबरमती रिपोर्टचं कौतुक

Vikramgad Assembly constituency 2024 : स्थलांतरीत मजुरांमुळे मतदानाची टक्केवारी घटण्याची शक्यता, उमेदवारांपुढे आव्हान.

SCROLL FOR NEXT