Radhika Merchant  esakal
लाइफस्टाइल

Radhika Merchant : नवरी नटली..!अनंतसाठी राधिकाने केला सोळा श्रृंगार, ब्रायडल लेहेंग्यात महाराणी शोभतेय अंबानींची धाकटी सून

Anant Radhika Wedding : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट शुक्रवारी (१२ जुलै) मुंबईत विवाहबंधनात अडकले.

Monika Lonkar –Kumbhar

Radhika Merchant : भारताचे प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानींचा धाकटा मुलगा अनंत अंबानी अखेर राधिका मर्चंटसोबत विवाहबंधनात अडकला आहे. अनंत आणि राधिकाने काल रात्री सात फेरे घेत त्यांच्या वैवाहिक जीवनाला सुरूवात केली आहे. या लग्नातील राधिकाचा फर्स्ट लूक पाहण्यासाठी सर्वांनाच उत्सुकता अन् आतुरता होती.

अखेर राधिका मर्चंटचा फर्स्ट ब्रायडल लूक समोर आला असून त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. राधिकाने प्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला क्रीम-गोल्डन रंगाचा डिझायनर लेहेंगा परिधान केला आहे. तिचा ब्रायडल लूक नेमका कसा होता? चला तर मग जाणून घेऊयात.

राधिका मर्चंटचा फर्स्ट ब्रायडल लूक

राधिका मर्चंटचा हा डिझायनर ब्रायडल लेहेंगा सुप्रसिद्ध फॅशन डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाईन केला आहे. या क्रीम-गोल्डन रंगाच्या पानेतर लेहेंग्यात राधिका खूपच सुंदर दिसतोय.

हा एक प्रकारचा गुजराती ब्रायडल लेहेंगा आहे. राधिकाला तिच्या लग्नासाठी गुजराती वधूप्रमाणे सजायचे होते, त्यासाठी तिने या पानेतर ब्रायडल लेहेंग्याची निवड केली.

या लेहेंग्यावर आयव्हरी जरदोसी कटवर्कची नक्षीदार डिझाईन असून त्याला सेकंड ट्रेल असलेली सुंदर ब्रायडल ओढणी आणि एक टिश्यू शोल्डर दुपट्ट्याचा समावेश आहे. या घागऱ्यावर गोल्डन, लाल आणि क्रीम कलरचे बारीक हेव्ही हॅंडवर्क केले असून, त्यावर स्टोन्स, सिक्विन्स  आणि लाल रेशमी फॅब्रिकचे डिटेलिंग दिसत आहे.

या घागऱ्यावर तिने डायमंड ज्वेलरी कॅरी केली होती. तिने रत्नजडीत चोकरसह, लाँग डायमंड नेकपीस गळ्यात घातला होता. एखाद्या महाराणीसारखी राधिका या लूकमध्ये दिसत होती. या ब्रायडल लूकवर तिने ज्वेलरी सोबतच केलेला सुंदर ब्रायडल मेकअप आणि लाल रंगाची लिपस्टिक लूकला चारचाँद लावत होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT