Anant Radhika Wedding  esakal
लाइफस्टाइल

Anant Radhika Wedding : अनंत पेक्षा राधिका आहे मोठी, पत्नी वयाने मोठी असण्याबाबत शास्त्र काय म्हणत?

सकाळ डिजिटल टीम

Anant Radhika Wedding :

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू आहे. 12 जुलै 2024 रोजी अनंत आणि राधिकाच्या लग्नाची शहनाई वाजणार आहे. प्रिवेडींग सोहळ्यामुळे ते गेली काही दिवस चर्चेत आहेत. अनंत अंबानी आणि राधिकाच्या वयात किती अंतर आहे, त्या दोघांपैकी कोण मोठे आहे याबद्दल आज माहिती घेऊयात.  

राधिका मर्चंटचा जन्म 18 डिसेंबर 1994 रोजी झाला. ती सध्या 29 वर्षांची आहे. आणि या वर्षी तिच्या वाढदिवसाला ती 30 वर्षांची होणार आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा सर्वात लहान मुलगा म्हणजेच अनंतचा जन्म 10 एप्रिल 1995 रोजी झाला. मुंबईत जन्मलेला अनंत याच वर्षी 29 वर्षांचा झाला. अशा परिस्थितीत राधिका आणि अंबानी यांच्या धाकट्या मुलामध्ये जवळपास चार महिन्यांचे अंतर असल्याचे स्पष्ट झाले आहे.

आता हा मुद्दा उपस्थित होतो की, हिंदू धर्मात वयाने लहान असलेल्या मुलीशी लग्न केलं जातं. पण, अनंतहून राधिका चार महिन्यांनी मोठी आहे. त्यामुळे यांच्या जोडीबदद्ल शास्त्र काय सांगत याची माहिती घेऊयात.

आपल्या समाजात शतकानुशतके परंपरा आहे की पती पत्नीपेक्षा मोठा असावा. साधारणपणे, हा नियम कांदे पोहेचा कार्यक्रम करून ठरवलेल्या विवाहांमध्ये प्रभावीपणे लागू केला जातो. मुलापेक्षा वयाने मोठ्या असलेल्या मुलीला सून म्हणून स्वीकारायला कुटुंब तयार नसते. यामुळे कितीतरी चांगल्या मुलींना नकार द्यावा लागतो.

प्रसिद्ध जोडप्यांमध्ये आहे पत्नी मोठी

अनेक प्रसिद्ध जोडप्यांनी जोडीदाराच्या वयाचा नाहीतर जोडीदाराच्या प्रेमाचा विचार केला आहे.या यादीत मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकरचे नाव सर्वात वर येते. सचिनची पत्नी अंजली तेंडुलकर त्याच्यापेक्षा चार वर्षांनी मोठी आहे.

माजी क्रिकेटपटू नवज्योत सिंग सिद्धू यांची पत्नी नवज्योत कौर सिद्धूही त्यांच्यापेक्षा काही महिन्यांनी मोठ्या आहेत. इतकेच नाहीतर, देसी गर्ल प्रियांका चोप्राही निक जोनसपेक्षा काही वर्षांनी मोठी आहे.

लग्नाच्या वयाबाबत शास्त्र काय म्हणतं

लग्नाच्या वयाबद्दल शास्त्रात स्पष्टपणे काहीही लिहिलेले नाही. शास्त्रामध्ये विवाह ही विश्वाची देखभाल करण्यासाठी सर्वात महत्वाची संस्था असल्याचे वर्णन केले आहे. ज्या जोडप्यामध्ये पत्नी पतीपेक्षा मोठी आहे त्या कुटुंबाचे कुटुंब अधिक सुरक्षित असते. त्याच्या कुटुंबात सुख-समृद्धी दिसून येते. पण, हा त्यांचा वैयक्तिक अनुभव असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. धार्मिक ग्रंथ यात काहीही सांगत नाहीत.

ज्या जोडप्यांच्या वयात फार अंतर नसते, जी जोडपी समान वयाची असतात  ती एकमेकांच्या विचारांशी समरूप असतात. त्यामुळे जोडीदाराचे विचार ही आपल्यासारखेच आहेत ही भावना त्यांच्या मनात जागृत होते.

लग्नाच्या वयाबाबत विज्ञान काय सांगत?

खरे तर या प्रश्नाचे उत्तर विज्ञानात दडलेले आहे. आपल्या समाजात विवाह ही वंश वाढवण्याची कायदेशीर संस्था मानली जाते. अशा परिस्थितीत, विज्ञानानुसार, स्त्रिया पुरुषांपेक्षा लवकर माता बनण्याची क्षमता गमावतात. आई होण्यासाठी स्त्रीचे सर्वोत्तम वय 20 ते 30 वर्षे असते. 35 वर्षांनंतर आई होण्याची शक्यता झपाट्याने कमी होऊ लागते.

तर पुरुषांमध्ये ही स्थिती 50 वर्षे टिकू शकते. त्यामुळेच आपला समाज मुलापेक्षा कमी वयाची मुलगी शोधतो. शास्त्रानूसार, जर अधिक वयाची मुलीशी लग्न केले तर त्याचे सकारात्मक परिणाम आपल्या जीवनात होतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tirupati Balaji Prasad Video: तिरुपती बालाजीच्या प्रसादात आता आढळले किडे, पाहा धक्कादायक व्हिडिओ

रहस्यामुळे खिळवून ठेवणारा थरारपट

Fastest double century : पाकिस्तानच्या Usman Khan ने झळकावले वेगवान द्विशतक, नावावर केला मोठा विक्रम

Pune Sexual Assault Case: पुणे पुन्हा हादरले! घरात घुसून नराधमाने केला महिलेवर अत्याचार

Whatsapp Username Feature : मोबाईल नंबर नसतानाही व्हॉट्सॲपवर करता येणार चॅटिंग; काय आहे युजरनेमचं भन्नाट फीचर?

SCROLL FOR NEXT