Red Dot bag Sakal
लाइफस्टाइल

स्वच्छतेसाठीचा ‘रेड डॉट’ जागर

स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असलेली ‘मासिक पाळी’ आणि त्यातून महिलांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींचा आजही गांभीर्याने विचार केला जात नसल्याचे दिसते.

अनिता माने

स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असलेली ‘मासिक पाळी’ आणि त्यातून महिलांच्या दैनंदिन जीवनात येणाऱ्या अडचणींचा आजही गांभीर्याने विचार केला जात नसल्याचे दिसते. याबाबत जनजागृती करून अनावश्यक बाबी बंद करण्यासाठी प्रबोधन करत संस्था कार्यरत आहेत. मासिक पाळीत त्रास कमी व्हावा म्हणून अरुणाचलम मुरुगनंतम यांनी महिलांसाठी सॅनिटरी नॅपकिनची निर्मिती करणारे पहिले मशिन तयार केले.

त्यांना समाजातील काही व्यक्तींच्या विरोधाचा कटू सामना करावा लागला होता. आपण कधीही नवीन सुरू करायचे ठरवले, तर प्रत्येक जण त्याचे स्वागतच करेल असे नाही. कधी-कधी विरोध देखील सोसावा लागतो. त्यामुळे मी दोन्हीसाठीची मानसिकता ठेवली होती. आरोग्याशी निगडित समस्येकडे दुर्लक्षित विषयाकडे लक्ष देत ‘रेड डॉट’ या संकल्पनेचा भाग होऊन समाजप्रबोधन करण्याचा निर्णय मी घेतला.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत ‘रेड डॉट बॅग’ ही मासिक पाळीमध्ये वापरण्यात आलेल्या पॅडची विल्हेवाट लावण्यासाठी डिस्पोजेबल स्वरूपात वापरली जाते. सफाई कर्मचाऱ्यांना आपण कचरा देतो. त्या कचऱ्यात वापरलेले सॅनिटरी पॅडसुद्धा असतात. या कचऱ्यामुळे पसरणाऱ्या रोगराईचा आपण विचार करत नाही. मात्र, आता सॅनिटरी पॅडच्या कचऱ्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचे काय होते, याबाबतही विचार सुरू झाला आहे.

मला व्हिजन क्लिन या हाऊसकिपिंग एजन्सीच्या निशा पाटील यांच्याकडून ‘रेड डॉट बॅग’ या संकल्पनेबद्दल समजले तेव्हा मी लगेच निर्णय घेतला, की आपल्याला याबाबत समाजप्रबोधन करता येईल. तर मग यापासूनच सुरुवात करूयात आणि मी या उद्योगामध्ये पहिले पाऊल ठेवले.

‘प्रॉब्लेम’ वर सोल्युशन

सॅनेटरी पॅड हा बायोमेडिकल प्रकारचा कचराच असल्याने त्यांची विल्हेवाट योग्य पद्धतीने गरजेचे असते. त्यामुळे त्याच्या वर्गीकरणासाठी रेड डॉट बॅग हा पर्याय योग्य आहे. त्याचा सफाई कामगारांना उपयोग होत आहे. कोरोनामध्ये आम्ही ‘रेड डॉट’बाबत प्रबोधन आणि प्रसार सुरू केला. कारण प्रबोधन केल्याशिवाय या उत्पादनांची विक्री होणार नाही हे आमच्या लक्षात आले.

समस्येवरील उपाय

सॅनिटरी पॅड्सचा सफाई कर्मचारी, सामाजिक आरोग्य व पर्यावरण या सगळ्यांवर विपरीत परिणाम होतो. आपण ‘रेड डॉट बॅग’ बाजारामध्ये उपलब्ध करून दिल्या, तर त्यांचा पर्यावरणपूरक वापर होईल आणि सफाई कामगाराच्या आरोग्यावरही परिणाम देखील होणार नाही, हे लक्षात घेऊन मी ‘रेड डॉट बॅग’चा व्यवसाय सुरू केला आणि समाजातील एका समस्येवर उपायच ठरला व्यवसाय.

माहिलांना या उत्पादनाचे महत्त्व पटवून देणे हे आवाहन होते. मात्र, पर्यावरणासाठी आणि आपल्या आरोग्यासाठी ते उपयुक्त आहे, हे सांगितल्यानंतर हळूहळू प्रतिसाद मिळू लागला. मी सोसायटी आणि शाळांमध्येही प्रबोधनात्मक उपक्रम घेण्यास सुरुवात केली.

प्रतिसाद आणि प्रोत्साहन

सुरुवातीच्या काळात व्यवसाय सुरू केल्यानंतर मला खूप प्रश्‍न विचारण्यात आले. ‘का करतेस? याला कोण प्रतिसाद देणार, काही दुसरं कर?’ मात्र, माझे पती आणि मुलगा नेहमीच माझ्यासोबत होते. दोघांनीही मला प्रोत्साहन दिले आणि वेळोवेळी मदतही केली. त्यामुळेच मी आता महाराष्ट्राबाहेर मध्य प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ, गुजरात या राज्यापर्यंतचा पल्ला गाठू शकले. मध्यंतरीच ‘एक वाण स्वच्छतेचा जागर करणारे’ म्हणून मी संक्रातीचे वाण ‘रेड डॉट बॅग’ हा उपक्रम राबविला.

सातत्य आणि चिकाटी

आपण जे काही करतो त्यामध्ये सातत्य असणे नेहमी महत्त्वाचे ठरते. काही गोष्टी अर्थार्जनाच्याही पुढे असतात. यामध्ये प्रबोधनाचे, समाजासाठी काम करण्याचे समाधान मिळते. स्वच्छतेकडून समृद्धीकडे जाण्याचा हाच खरा मार्ग आहे असे मला वाटते. समाजासाठी आपण उपयोगी पडत आहोत हाच विचार मला आनंद देतो आणि अधिकाधिक काम करण्यासाठी नेहमीच प्रोत्साहन देतो.

Being Woman

For Woman

Red dot bag

Let''s do the Social Tag

(शब्दांकन - सुचिता गायकवाड)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आमच्या विचारधारा वेगळ्या होत्या पण... बाळासाहेबांचं नाव घेण्यावरून प्रियांका गांधींचं नरेंद्र मोदींना प्रत्युत्तर

"जितकं तू बोलतोस तितका चांगला माणूस तू अजिबात नाहीस" ; जवान फेम अभिनेत्री नयनताराचा धनुषवर खळबळजनक आरोप

Ranji Trophy 2024-25: Ayush Badoni चं दमदार द्विशतक; दिल्लीला आघाडीही मिळाली, पण सामना राहिला ड्रॉ

Vastu Tips: कामधेनूची मूर्ती ऑफिसमध्ये कोणत्या दिशेला ठेवावी? वाचा वास्तूशास्त्र काय सांगतं

Farmer : हिरव्या मिरचीने आणले डोळ्यांत पाणी...तोडणी बारा तर विक्रीसाठी पंचवीस रुपये; पीकांच्या लागवडीचाही खर्च निघेना

SCROLL FOR NEXT