लाइफस्टाइल

Apple Sider Vinegar : वजन कमी करण्यासाठी Apple Sider Vinegar फायद्याचे आहे का?

भूक कमी करण्यासाठी हा प्रभावी उपाय असल्याचे दिसून आले आहे

Pooja Karande-Kadam

Apple Sider Vinegar :

वजन कमी करण्यासाठी, आपण अनेकदा पाहतो की लोक वेगवेगळ्या प्रकारचे वजन कमी करणारे पेय वापरतात. यामध्ये ग्रीन टी, हर्बल टी आणि ब्लॅक कॉफी इत्यादी डिटॉक्स पेयांचा समावेश आहे. हे खरे आहे की ते वजन कमी करण्यास मदत करतात.

पण आम्ही तुम्हाला सांगतो की, वजन कमी करण्यासाठी या पेयांचे सेवन करण्यापेक्षा कमी कॅलरी वापरणे अधिक महत्त्वाचे आहे. वजन कमी करण्यासाठी दैनंदिन कॅलरीच्या नियमित सेवनापेक्षा 200-300 कमी कॅलरी वापरणे आवश्यक आहे. कॅलरीची कमतरता असल्याने वजन कमी करण्यातच मदत होते.

कॅलरीची संख्या कमी असताना तुम्ही हे वजन कमी करणारी पेये सेवन केल्यास, ते तुम्हाला जलद वजन कमी करण्यास मदत करेल. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी ऍपल सायडर व्हिनेगरचे सेवन करतात. हे जलद वजन कमी करण्यासाठी अनेक प्रकारे मदत करते.

बरेच लोक हा प्रश्न विचारतात, ऍपल सायडर व्हिनेगर वजन कमी करण्यास कशी मदत करते आणि जलद वजन कमी करण्यासाठी ते कसे सेवन करावे? या लेखात आम्ही तुम्हाला याबद्दल सविस्तर सांगत आहोत.

वजन कमी करण्यासाठी ऍपल सायडर व्हिनेगरचे फायदे

वजन कमी करण्याच्या बाबतीत, कमी कॅलरी वापरणे फार महत्वाचे आहे. ऍपल सायडर व्हिनेगर तुम्हाला यामध्ये मदत करते. हे प्यायल्याने तुमची भूक नियंत्रित राहते. काही छोट्या अभ्यासातून असेही समोर आले आहे की सफरचंद सायडर व्हिनेगर प्यायल्याने भूक कमी होण्यास मदत होते.

भूक कमी करण्यासाठी हे प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. भूक कमी झाल्याने आपल्याकडून कमी जेवण खाल्ले जाते. याची सवय झाली की आपण कमी कॅलरीज खातो अन् त्याचा वजन कमी होण्यास फायदा होतो.

अभ्यासात असेही आढळून आले आहेकी सफरचंद सायडर व्हिनेगर प्यायल्याने शरीरातील चरबी कमी होण्यास आणि चयापचय वाढण्यास मदत होते. पोटाची चरबी कमी करण्यासाठी देखील याचे सेवन करणे खूप उपयुक्त ठरू शकते.

वजन कमी करण्यासाठी ऍपल सायडर व्हिनेगर कसे वापरावे

  1. वजन कमी करण्यासाठी तुम्ही ऍपल सायडर व्हिनेगरचे अनेक प्रकारे सेवन करू शकता. ते तुमच्या आहारात अनेक प्रकारे समाविष्ट केले जाऊ शकते जसे की,

  2. सॅलडमध्ये ऍपल सायडर व्हिनेगर वापरले जाऊ शकते.

  3. याचा वापर तुम्ही भाज्यांमध्ये आणि लोणचे बनवण्यासाठीही करू शकता.

  4. तुम्ही सकाळी कोमट पाण्यात 1-2 चमचे (15-30 मिली) ऍपल सायडर व्हिनेगर घेऊ शकता.

  5. तुम्ही जेवणाच्या 30 मिनिटांपूर्वी देखील ते घेऊ शकता. मात्र त्याचे जास्त प्रमाणात सेवन करणे टाळा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vote Jihad: भाजपच्या ‘वोट जिहाद’ प्रचाराला शरद पवारांचं जोरदार प्रत्युत्तर; म्हणाले, भाजपला पुण्यात विशिष्ट समाज...

Beed VBA: बीडमधील अपक्ष उमेदवाराला काळं फासून मारहाण! वंचितच्या पदाधिकाऱ्यांचं कृत्य; भाजपला पाठिंबा दिल्यानं आक्रमक

हिवाळ्यात कंबरदुखीपासून आराम मिळवायचा आहे? उपाशी पोटी या पदार्थाचा करा सेवन

Maharashtra Election: उमेदवारांचा प्रचार नागरिकांच्या जीवावर! काँग्रेसच्या प्रचार रॅलीत फटाके फोडल्यानं ९ वर्षाचा मुलगा गंभीर जखमी

तिलक-संजूची शतकं, अल्लू अर्जूनसारखी स्टाईल, जर्सी नंबरचं सिक्रेट अन् कॅप्टन रोहितला स्पेशल मेसेज; BCCI चा खास Video

SCROLL FOR NEXT