April Fool 2024  esakal
लाइफस्टाइल

April Fool's Day 2024 : 'त्या दिवशी माझं घर जळत होतं अन् लोकांना वाटलं मी त्यांना एप्रिल फुल करतेय' वाचा अभिनेत्री तनाजची आपबिती

मुंबईतील घरी शांत झोपेत असताना तिला हा अनुभव आला

सकाळ डिजिटल टीम

April Fool's Day 2024 :

एक एप्रिल दिवशी एकमेकांना मुर्ख बनवण्याचा दिवस साजरा केला जातो. अनेकांना या दिवशी काही खोट्या गोष्टी खऱ्या वाटतात. अन् खऱ्या गोष्टी खोट्या वाटतात. अनेकांना हा दिवस मजेचा, एकमेकांना मुर्खात काढण्याचा दिवस वाटतो. पण, एका अभिनेत्रीला मात्र एप्रिल फुल डेचा भयानक अनुभव आला आहे.

काही चित्रपटात सहाय्यक अभिनेत्रीची भुमिका साकारणारी तनाज इरानी या अभिनेत्रीला तुम्ही ओळखत असाल. जिने ऐश्वर्या अनिल कपूर, करिना यांसारख्या बड्या स्टार्ससोबत काम केले आहे. आज एप्रिल फुल दिवस आहे. एप्रिल फुलचा एक वाईट अनुभव अभिनेत्री तनाजला आला आहे.

काही वर्षांपूर्वी मुंबईतील घरी शांत झोपेत असताना तिला हा अनुभव आला. मुलाखतीदरम्यान तनाज म्हणाली होती, 'मी आणि पती बख्तयार रूममध्ये झोपलो होतो. मुलांची काळजी घेण्यासाठी असलेल्या मावशींचा आवाज आम्हाला आला. मी त्याच क्षणी उठले आणि बख्तयारला सुद्धा उठवलं. जेव्हा तो बाहेर जाऊन बघून आला तेव्हा त्यालाही घाम फुटला होता.

कारण, आमच्या घराला आगीने वेढलं होतं. घराला लागलेली आग पाहून तो आणि मी दोघेही घाबरलो होतो. काही वेळ काय करावं तेच कळत नव्हतं, आजूबाजूचे लोक गोळा झाले त्यांनीही आग विझवण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलही वेळेवर पोहोचले होते. सुमारे ४५ मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात आली.

पण जेव्हा मी हे त्या रात्री माझ्या कुटुंबीयांना आणि मित्रांना सांगितले तेव्हा कोणीही आमच्यावर विश्वास ठेवला नाही. प्रत्येकाला वाटले की आम्ही त्यांना एप्रिल फूल बनवत आहोत. तानाज सध्या फिल्मी जगापासून दूर आहे. तनाज आणि बख्त्यार यांचे २००७ साली लग्न झाले.

तनाजने तिच्या अभिनय कारकिर्दीत अनेक मोठ्या स्टार्ससोबत काम केले आहे. चित्रपटातील तिची व्यक्तिरेखा नेहमीच कथेभोवती फिरत असे. तनाजच्या चित्रपटांबद्दल बोलायचे झाले तर तनाजने 'हद कर दी आपने', 'मैं प्रेम की दीवानी हूं', 'कुछ ना कहो' आणि '36 चायना टाउन' सारख्या चित्रपटांमध्ये अनेक दमदार भूमिका साकारल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

आजचे राशिभविष्य - 15 नोव्हेंबर 2024

SCROLL FOR NEXT