Dating Tips: प्रेमाची कबुली देणे ही आयुष्याती खास क्षणांपैकी एक आहे. काही क्षणांना अविस्मरणीय बनविण्यासाठी वेगवेगळ्या पध्दती वापरतात. पण, प्रेमाची कबुली ही पहिल्या डेटपासून होते. पण, काही लोक आपल्या लाजाळू स्वभावामुळे(Shy nature) डेटवर जाण्याआधी नर्वस होतात. कधी कधी लाजाळूपणामुळे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत मनमोकळेपणाने बोलू शकत नाही आणि तुमची प्रेम कथा सुरू होण्याआधीच संपते. त्यामुळे पहिल्या डेटवर (Date)आपल्या पार्टनरसमोर पूर्ण विश्वासाने तुम्ही जायला पाहिजे, तरच तो दिवस अविस्मरणीय ठरू शकतो.
Dating Tips: जगामध्ये वेगवेगळ्या स्वभावचे लोक असतात. काही एकमदम बिनधास्त, बेधडक. आपले म्हणणे मांडण्यामध्ये त्यांना चांगले जमते. पण, काही लोक शांत आणि लाजाळू (Behavior) स्वभावाचे असातत. कित्येक लोकांचा स्वभाव खूप लाजाळू असतो. असे लोक आपल्या मनातील गोष्ट सांगण्यासाठी संकोच (Hesitation) करतात. पण हा लाजाळू स्वभाव कधी कधी तुमच्या व्यक्तीमत्वावर (Personality) भारी पडू शकतो.
लाजाळू स्वभावाचे लोक फक्त आनंदाने बोलण्यासाठी नव्हे तर कित्येकदा आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी देखील संकोच करतात. विशेषत: पहिल्यांदा डेटवर गेल्यावर आपल्या मनातील गोष्ट सांगताना कित्येक जण अपयशी ठरतात त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होतो. अशावेळी आपली लव्ह स्टोरी सुरू होण्याआधीच संपून जाते. जर तुमचा स्वभाही लाजाळू असेल तर आम्ही तुम्हाला काही डेटिंग टिप्स देऊ इच्छितो. ज्यांना फॉलो करून तुम्ही तुमची डेट एन्जॉय करू शकता.
आत्मविश्वास बाळगा
कित्येक लोकांचे मत आहे की, लाजणे ही वाईट वय असते पण, असे आजिबात नाही. सर्वात आधी स्वत:वर विश्वास ठेवा ज्यामुळे तुमचा आत्मविश्वास चांगला होईल आमि तुम्हाला संकोचही वाटणार नाही
भीती कशी पळवावी?
जर तुम्हाला पहिल्यांदा डेटवर जात असाल तर, तुम्ही नर्वस फिल होत असेल तर त्याचा परिणाम तुमच्या डेटवर होऊ शकतो. डेटवर जाण्याआधी आपल्या आतमधील भिती घालवून टाका आणि असा विचार आजिबात करू नका की तुमच्या पार्टनरला तुमचा स्वभावमुळए वाईट वाटू शकते.
व्यक्तिमत्वामध्ये विश्वास असू द्या
कित्येक लोक डेटवर जाण्याआधी आपला लूकबाबत खूप चिंतेत असतात आणि तुमची ही भावना डेटवर भारी पडू शकते. त्यामुळे काही झाले तरी तुमचा विश्वास कमी होऊ देऊ नका. तुमचा आत्मविश्वासच तुमचे व्यक्तीमत्व सुधारण्याचे काम करतो.
डोळ्यांमध्ये पाहून संवाद साधा
डेटवर आपल्या पार्टनसर सोबत नजर चूकवून बोलणे तुमच्या लाजाळू स्वभावाचा भाग आहे आणि कमी आत्मविश्वास दर्शवितो. तुम्हाला आपल्या जोडीदाराच्या डोळ्यांमध्ये पाहून कोणताही संकोच न बाळगता मनातील बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे. सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.