फॅशनही फक्त कपड्यांपुरती मर्यादित नाही. कोणतीही फॅशन करण्यासाठी दागिने, चप्पल, केस हेदेखील तितकेच महत्त्वाचे आहेत. दागिने म्हटल्यावर समोर येतो तो पारंपरिक आवेश. परंतु, नव्या ट्रेंडने चित्र पालटले असून दागिने वेस्टर्न लपकसाठीही तितकेच महत्त्वाचे झाले आहेत. सध्या बाजारात आणि सोशल मीडियावर प्रचंड मागणी असणारे दागिने म्हणजे ‘ऑक्सिडाईज बोहो ज्वेलरी’.
काय आहेत वैशिष्ट्ये?
- ऑक्सिडाईज आणि बोहेमियन स्टाइल यांचे मिश्रण असलेली ही ज्वेलरी आहे.
- बोहेमियन शैली हिप्पी फॅशनशी संबंधित असलेली एक फॅशन आहे, ज्यामध्ये नैसर्गिक फॅब्रिक्स, रेट्रो नमुने, तटस्थ आणि उबदार शेड्स ७०च्या शैलीतील अॅक्सेंट आणि स्टेटमेंट अॅक्सेसिरीज आणि फ्लेअरचा समावेश असतो.
- बोहो प्रकारातील दागिने हे नेहमीपेक्षा मोठे, लक्षवेधी, रंगीतसंगीत आणि विविध आकारांचे असतात.
ऑक्सिडाईज दागिन्यांची बाजारात खूप चलती आहे. त्यामधील नोसरिंग, मोठे कानातले, झुमके आणि असे अनेक प्रकार आहेत. याच प्रकारामध्ये बोहो स्टाइलचे दागिने सध्या ट्रेंडमध्ये आहेत. ऑक्सिडाईज बोहो ज्वेलरीमधील गळ्यातले हे आकाराने खूप मोठे असतात. त्याची लांबी तसेच पेंडेटही आकाराने खूप मोठे असतात. अनेकदा काळ्या दोऱ्याचा वापर यामध्ये केला जातो. काळा मोठा लांब दोरा आणि चंदेरी पेंडेंट अशी त्याची रचना असते.
बोहोचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे आकार, डिझाईन आणि रंग यांची विविधता पाहायला मिळते. ऑक्सिडाईज बोहो दागिने हे संपूर्ण सिल्व्हर असले तरी रंगांचा अचूक समावेश केलेला असतो.
जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
अंगठ्या, गळ्यातले, कानातले, रिंग सेट, नोसरिंग, हातातील कडे, अॅंकलेट असे विविध प्रकार ऑक्सिडाईज बोहो ज्वेलरीमध्ये पाहायला मिळतात.
आकाराने हे दागिने मोठे असूनही वजनाला हलके असतात. त्यामुळे त्रास न होता कुठेही, कधीही आणि बराच वेळासाठी तुम्ही यांना वापरू शकता.
विशेष म्हणजे, हे दागिने फक्त पारंपरिक लुकसाठी मर्यादित नाहीत. उलट वेस्टर्न कपड्यांसोबत या दागिन्यांसह अधिक फॅशन करता येते.
देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.