हृदयविकार म्हटले की आहारातून लगेच तेल, तुप वर्ज्य केले जाते. अनेक चुकीच्या गोष्टी आपण प्रथम उचलतो.
-डॉ. अरुणा फिरोदिया
साखर, मीठ आणि तेल यांच्याशिवाय बरेचसे अन्नपदार्थ चविष्ट बनत नाहीत. वेगवेगळ्या तज्ज्ञांच्या मतांनुसार माणसांच्या मनात गोंधळ उडतो. हृदयविकार म्हटले की आहारातून लगेच तेल, तुप वर्ज्य केले जाते. अनेक चुकीच्या गोष्टी आपण प्रथम उचलतो. मात्र, यामागील सत्य आपण जाणून घेतले पाहिजे.
तेल - आपल्या शरीराला अँटीॲसिडची गरज असते. त्यामध्ये फॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स (पीयुएफए) आणि मोनो अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स (एमयुएफए) याचा समावेश आहे. वनस्पती तेलात पीयुएफए असते. तर तुपात आणि ऑलिव्ह ऑईलमध्ये ते नसते. शेंगतेल, सूर्यफुल, करडई, राईसब्रॅन या सर्व तेलांत पीयुएफए असते. यापैकी कोणतेही तेल दररोजच्या आहारात समाविष्ट करू शकतो. शेंगदाणा तेलात एमयुएफए मुबलक प्रमाणात असते, त्यामुळे ते अधिक पोषक असते. तुप आणि लोण्यात सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स असतात. सॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स साययुक्त व टोन्ड दुधात असतात. जास्त आचेवरील भारतीय स्वयंपाकासाठी राईसब्रॅन, वनस्पती तेल किंवा शेगदाणा तेल वापरणे अधिक श्रेयस्कर ठरते. या तेलाचा धूम्रबिंदू (स्मोकपॉइंट) जास्त असतो. ऑलिव्ह ऑईल हृदयाच्या आरोग्यासाठी चांगले आहे.
आहारात एमयुएफए-पीयुएफए-एलएफए याचे १-१-१ प्रमाण शरीरास उत्तम असते. पेशींच्या पुनर्निमितीसाठी आणि संप्रेरकांना संतुलित करण्यासाठी फॅट हा महत्त्वाचा घटक असतो. ज्या व्यक्तीचे वजन ५०-६० किलो आहे, त्यांना दररोज किमान १५ मिलि. तर ६० ते ८० किलो वजन असणाऱ्याना २०-३० मिलि. तेलाची गरज असते. मांसाहारी लोकांना लोणी किंवा तुपाची फारशी गरज नसते. १०० ग्रॅम चिकनमधून ३.८ ग्रॅम सॅच्युरेटेड फॅट शरीराला मिळते. तर माशांमध्ये एमयुएफए असतात. तेलाचे सेवन कमी केले तर अ, ड, ई, क या जीवनसत्वाची शरीरात कमतरता होऊ शकते. अ जीवनसत्व कमी असेल तर त्वचा कोरडी पडते. ड ३ कमी असेल तर प्रतिकार क्षमता कमी होते आणि आरटीओपोरोसिस होते. तळलेल्या पदार्थांमधील फॅटमधून ५० ते ६० कॅलरीज शरीरात जातात.
यासाठी जंकफूड आणि आईसक्रीमचे सेवन कमी करावे. गोड पदार्थ व आईसक्रीममध्ये हायड्रोजेनेटेड फॅट व ट्रान्सफॅट असतात. ओमेगा ३ आणि ओमेगा ६ ही आवश्यक फॅटीॲसिड्स शरीरासाठी महत्त्वाची असतात. ती वृद्ध होण्याच्या प्रक्रियेचा वेग कमी करतात. त्वचा कोमल राखण्यास मदत करतात. या आरोग्यदायी फॅटस्चे सेवन केल्यास महिलांच्या शरीरावर कमी सुरकुत्या पडतात आणि कांती निरोगी राहते. शरीराच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण फॅटीॲसिड्स करतात.
तिळतेल - शेगदाणा तेल-ॲलिव्ह ऑईलचे हे तेल मिश्रण सर्वांसाठी उत्तम. शाकाहारी लोकांनी दर महिन्याला वेगळे तेल वापरावे. एकच तेल वापरण्यापेक्षा दोन तेलांचे मिश्रण वापरावे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.