Aastad-Kale 
लाइफस्टाइल

सेलिब्रिटी वीकएण्ड : ज्ञानसमृद्ध बनण्याचा आनंद

आस्ताद काळे, अभिनेता

आठवडाभर काम केल्यावर ज्या दिवशी सुट्टी असते, तो पूर्ण दिवस हा माझा असतो. सुट्टीच्या दिवशी उशिरा उठणं, आरामात आवरणं, असं माझं साधारण रुटीन असतं. त्यानंतर जर घरातली काही आवराआवर करायची असेल तर ती करतो. तो दिवस आराम करून घालवण्याकडे जरी माझा कल असला, तरी मी माझ्या फिटनेसकडे लक्ष द्यायला अजिबात विसरत नाही. माझ्याकडे व्यायामासाठी लागणारी काही साधनं आहेत, त्याचा वापर करून मी घरीच तासभर व्यायाम करतो.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

मला कुकिंगची खूप आवड आहे. जवळजवळ सगळेच पदार्थ उत्तम बनवता येतात, त्यामुळे सुट्टीच्या दिवशी मी तेही करतो. मला संगीताची प्रचंड आवड आहे. मी ‘सिंगिंग स्टार’ या रिॲलिटी शोमधून स्पर्धक म्हणून तुम्हा सर्वांसमोर आलो आहेच. त्यामुळे दिवसातला थोडा वेळ गाण्याचा रियाज मी करतो. आमच्या घरी कुत्र्याची दोन पिलं आहेत. त्यांच्यासोबत खेळायला लागलं, की वेळ कसा जातो, कळतंच नाही. याशिवाय मला वाचन करायला भरपूर आवडतं. त्यामुळे ज्या दिवशी मी घरी असतो तेव्हा माझा काही वेळ हा वाचन करण्यात जातो. मला जवळपास सगळ्या प्रकारची पुस्तकं वाचयला आवडतात. सध्या शूटिंगमुळे वाचन थोडंसं मागं पडलं आहे. पण, ती कसर मी काहीतरी चांगलं, आपल्या ज्ञानात भर पडेल असं बघून भरून काढतो. घरी असल्यावर एखादी सीरिज बघणं, चित्रपट बघणं हे सुरू असतंच; पण यासोबतच काही महिन्यांपूर्वी मला ‘क्युरिऑसिटी स्ट्रीम’ नावाचं एक भांडार सापडलं आहे. ‘क्युरिऑसिटी स्ट्रीम’वर ऐतिहासिक, विज्ञान, निसर्ग, वन्यजीवन अशा विविध विषयांवर हजारोंनी डॉक्युमेंटरीज् आणि इन्फॉर्मेशनल व्हिडीओज् आहेत. हे सगळं त्यांनी ॲनिमेशन आणि ग्राफिक्स वापरून फार छान पद्धतीनं रंजक केलं आहे, जे मी हल्ली बघतो. सोबत ‘अंडरकव्हर’ आणि ‘धिस इज’  या सीरिज मी फॉलो करतो आहे.

सुट्टीच्या दिवशी मी पूर्ण वेळ घरीच असतो. तसं असल्यामुळे संध्याकाळच्या वेळी बाहेर फिरायला जाणं, मित्र-मैत्रिणींना भेटणं, हे मी करत नाही. त्या दिवशी मला घरी राहायला खूप आवडतं. कारण मला असं वाटतं, की जर तुम्ही आठवड्यातले पाच-सहा दिवस काम करत आहात, तर एक दिवस तरी तुमच्या शरीराला आणि मनाला तुम्ही सगळ्यातूनच आराम दिला पाहिजे; त्यामुळे तुम्ही बाकीचे दिवस छान फ्रेश राहू शकता. अशाप्रकारे सगळा दिवस घालवल्यावर दुसऱ्या दिवसापासून पुन्हा एकदा काम करायला मी अगदी आनंदानं तयार असतो.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT