Ashadh Amavasya esakal
लाइफस्टाइल

Ashadh Amavasya : दीप अमावस्येला मुलांचे औक्षण करणं असतं शुभ, पण कणकेचे गोड दिवे कसे बनवायचे?

सकाळ डिजिटल टीम

Ashadh Amavasya Deep Poojan Vidhi :

आषाढ महिन्यातील अमावस्याला विशेष महत्त्व आहे. कारण या अमावस्येला दीप अमावस्या, गटारी अमावस्या आणि आषाढ अमावस्या म्हणूनही ओळखलं जातं. आषाढ अमावस्या दिवशी काही उपाय केल्याने आपल्या जीवनातील अनेक गोष्टी वरती प्रभाव पडतो. त्यामुळेच ज्योतिष शास्त्रात आषाढ अमावस्येला महत्त्वाचे स्थान आहे.

या दिवशी पितृदोष शांती आणि जीवनातील इतर समस्यांवरती समाधान मिळवण्यासाठी केलेले उपाय फायदेशीर ठरतात. या दिवशी दिव्यांची पूजा केली जाते. त्यादिवशी कणकेचे दिवे करण्याची सुद्धा प्रथा आहे. कणकेचे गोड दिवे बनवून ते प्रज्वलित करून त्याने लहान मुलांचे औक्षण केले जाते. यामुळे त्यांच्या जीवनातील अनेक वाईट गोष्टींची नायनाट होतो.

या दिव्यांचा त्यांच्या जीवनावरती सकारात्मक परिणाम होतो अशी मान्यता आहे. या दिवशी देवघरात घरातील सर्व दिवे घासून स्वच्छ करून त्यांचे ते प्रज्वलित करून त्यांची पूजा केली जाते. दिवे आपल्या जीवनात असलेला अंधार दूर करतात त्यामुळेच अमावस्या दिवशी केली जाणारी ही दिव्यांची पूजा फलदायी ठरते.

मुलांचे औक्षण का केले जाते?

प्रकाश अंधःकार दूर करून सारे काही उजळून टाकते असं मानलं जातं. त्याचप्रमाणे संकटांच्या अंधःकाराला चीरून सर्व संकंट दूर करून मुलांचे आयुष्यही नवी उमेद, शक्ती, ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना दिव्यांनी औक्षण केले जाते.

या अमावस्येची कथा काय आहे?

यमुनेच्या तीरावर जेव्हा गायी, गुरांचा मृत्यू होऊ लागला. तेव्हा यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी भगवान श्री कृष्णाने, त्याला हरवून त्यांच्यावर स्वार होत सर्व गोकुळ वासियांना भयमुक्त केले. त्यावेळी यशोदेसह सर्व सुवासिनींनी गोपाळ कृष्णाची दिव्यांनी आरती केली. आणि असंच तेज, धैर्य, शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशा प्रार्थना केली.

तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली. हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्याने त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्यांनी त्या रात्रीला दिव्यांची आवस असे म्हटले जाऊ लागले. (Ashadh Amavasya 2024)

कणकेचे गोड दिवे कसे बनवावे

साहित्य –

  • गव्हाचे पीठ एक कप,

  • रवा दोन टेबलस्पून,

  • अर्धी वाटी गूळ

  • चवीपुरतं मीठ, आणि तेल

कृती –

  • कढईत पाणी गरम करायला ठेवा आणि त्यामध्ये आपण घेतलेल्या प्रमाणात गुळ घाला. पाण्यात गूळ पुर्णपणे वितळवून घ्या. हे मिश्रण थंड करायला ठेवा.

  • दोन कप गव्हाचे पीठ घ्या, दोन चमचे रवा मिक्स करा. मीठ आणि दोन चमचे तेल घाला. या कोरड्या पिठात आपण तयार केलेले गुळाचे पाणी घाला. लागेल तसे पाणी वापरून हे घट्ट पीठ मळून घ्या.

  • त्यानंतर झाकून पंधरा मिनिटे ठेवा. आता या तयार पिठाचे छोटे गोळे करून त्याला दिव्यांचा आकार द्या. दिवे तयार झाल्यानंतर ते वाफेवर उकडून घ्या.

  • १० मिनिट गरम वाफेवर ठेवल्याने दिवे पटकन उकडले जातात. त्यानंतर दिव्यांमध्ये तूप आणि वाती घालून हे दिवे प्रज्वलित करा. आणि त्याने घरातील चिमुकल्यांना ओवाळा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA बाबत सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निकाल! कलम 6 A वैध असल्याचा कोर्टाचा निर्णय

Jalgaon Vidhan Sabha Election 2024 : जिल्ह्यात भाजप-शिवसेना ‘सारखेच भाऊ’! प्रत्येकी 5 जागा लढणार; NCP अजित पवार गटाला एकमेव जागा

ठरलं! परेश मोकाशींच्या 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' चित्रपटात 'हिटलर'च्या भूमिकेत झळकणार हा बडा अभिनेता; पोस्टर पाहिलंत?

Electric Royal Enfield : पैसे ठेवा तयार! मार्केटमध्ये येतीये रॉयल एनफील्डची पहिली इलेक्ट्रिक बाइक,खास फीचर्सचा टीझर पाहा

Smita Patil : ते सुपरहिट गाणं शूट केल्यानंतर स्मिता पाटील धाय मोकलून रडल्या ; काय घडलं नेमकं घ्या जाणून

SCROLL FOR NEXT