Ashadhi Ekadashi 2023  esakal
लाइफस्टाइल

Ashadhi Ekadashi 2023 : औरंगजेबाच्या भितीने पुजाऱ्यांनी केला गनिमी कावा, विठ्ठलाची मूर्ती लपवली अन् पूजा सुरू ठेवली!

मुघलांच्या हल्ल्यावेळी विठू माऊलीला मंदिर सोडून जावे लागले

Pooja Karande-Kadam

Ashadhi Ekadashi 2023 : सर्वसामान्य कष्टकऱ्यांचा देव म्हणून ओळख असलेला एकमेव भगवंत म्हणजे विठोबा. अर्थात कडेवर हात ठेऊन जगाचे कल्याण करण्यासाठी उभी ठाकलेली विठू माऊली. देशभरातच नव्हे तर जगभरात विठोबाचे भक्त आहेत. विठू माऊली म्हणजे आपल्या हक्काचा देव. केवळ तो एकमेव देव आहे ज्याच्या पायाला हात लाऊन नतमस्तक होँण्याचा मान वारकऱ्यांना मिळतो.

संत ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराजांच्या काळात पंढरपूर क्षेत्राचा इतिहास सर्वत्र गायला जात असे. ज्ञानेश्वरांच्या काळानंतर महाराष्ट्रावर अनेक परकीय सम्राटांचे हल्ले झाले.  शके १२४० च्या काळात देवगिरीच्या राजाचे राज्य संपले. जोपर्यंत देवगिरीकरांची राजवट भरभराटीस होती, तोपर्यंत महाराष्ट्रात स्वास्थ्य होते.

त्यानंतर १४ व्या शतकात महाराष्ट्राच्या राजकीय स्थितीत बराच फरक पडला. मुघलांचे राज्य सुरू झाले त्याबरोबर त्यांची भाषा, रिवाज धर्म यांची सक्ती होऊ लागली. "जबरदस्ती हे मुघलांच्या राज्यकारभाराचे सूत्र होते.” त्यामुळे मराठी भाषेचा संघर्ष फारशी आणि उर्दू भाषेबरोबर सुरू झाला. मराठी भाषेवर तुर्की, उर्दू भाषेतील शब्दांचे अतिक्रमण झाले. मुघलांच्या बरोबर हिंदूंनी संघर्ष करून आपले अस्तित्व टिकवून ठेवले.

अशा जगाचे कल्याण करणाऱ्या विठू माऊलीच्या मंदिरावरही आभाळ कोपलं होतं. मुगल साम्राज्यात श्रीविठ्ठल मंदिर आणि मूर्ती उद्ध्वस्त होण्याचे अनेक प्रसंग निर्माण झाले. परंतु श्रीविठ्ठल कृपेने ते सारे नष्ट झाले. विशेषतः हिंदू समाजावर राज्य करणारा बादशहा औरंगजेबाच्या कारकीर्दीत भाविक जनतेत नेहमी घबराट होई

विठ्ठलाची मुर्ती लपवण्यात आली

पंढरपूरच्या जवळील मंगळवेढ्यानजीक भीमा नदीच्या काठावरील ब्रह्मपुरी येथे औरंगजेबाचा लष्करी तळ पडला. पंढरपूरच्या कुल मंदिरावर त्याचा हल्ला होणार हे पंढरपुरकरांनी जाणले आणि आता विठ्ठलमूर्तीचे रक्षण करणे महत्त्वाचे आहे हे लक्षात घेऊन बडवे समाजातील प्रमुख मंडळींनी पुढाकार घेऊन प्रल्हादबुवाच्या प्रमुखत्वाखाली सर्व गावकऱ्यांची बैठक घेतल अफजलखानाच्या संकटकाळी प्रल्हादबुवांनी धैर्याने विठ्ठलमूर्तींचे रक्षण केले ते लक्षात घेऊन सर्वानी पुनःश्च ही जबाबदारी प्रल्हादबुवांवर सोपविली.

बैठक संपली. रात्रीच्या नीरव अंधारात सारेजण आपापल्या घरी गेले. नित्यनेमाप्रमाणे रात्रीच्या शेजारतीस प्रल्हादबुवा मंदिरात आले. 'विठ्ठला! साऱ्या प्राणीमात्राचा तू रक्षणकर्ता, अन् आज तुझे रक्षण करण्याचे कार्य माझ्या सारख्या पामरावर आलेले आहे. कालाय तस्मै नमः! माझ्या हातून तूच तुझे रक्षण करून घे' असे म्हणत प्रल्हादबुवांनी विठ्ठलाकडे साश्रू नयनांनी करुणा भाकली.

उदास अशा विमनस्क अवस्थेतच ते मंदिरातून घरी आले. विठ्ठलमूर्ती रक्षणाच्या चिंतेने त्यांना रात्रभर डोळा लागला नाही. पण पहाटेपूर्वी त्यांचा निर्णय झाला होता. पहाटे ते एका नव्या आत्मविश्वासाने नित्य कर्मास लागले.

प्रल्हादबुवांनी सदोबा वे, गोपाळराव बडवे, नरहर बडवे, धोंडू नाना बडवे, तुळशीराम बड आदींच्या सहकार्यान विठ्ठलमूर्ती जागेवरून हलविली आणि बैलगाडीत घालून पंढरपूरच्याच जवळ दोन कोसावरील देगाव येथे नेली. गावाबाहेरच गाडी थांबवून प्रल्हादबुवा व दोघेजण गावात पाटलाच्या वाड्यावर गेले.

वाड्याच्या बाहेर बसलेल्या रामोशाने चौकशी करून मग पाटलास उठविले. प्रल्हादबुवा व पाटील यांच्यात हळू आवाजात बोलणे झाले अन् गावाच्या बाहेरील बाजूनेच बैलगाडी पाटलाच्या शेतावरील वस्तीवर नेण्यात आली. पाटलाच्या ताब्यात मूर्ती देऊन उदासमनाने प्रल्हादबुवा आपल्या सहकाऱ्यांसह पहाटेपूर्वी पंढरपुरात परतले.

देगावच्या पाटलांनी विठ्ठलमूर्ती रक्षणाचे कार्य स्वीकारून मोठीच जोखीम अंगावर घेतली होती. विठ्ठलमूर्ती आपल्याकडे आहे हे आपल्याकडील नोकर- चाकरांना देखील त्याने कळू दिले नव्हते. कधी बळदात, कधी कडब्याच्या गंजीत तर कधी विहिरीच्या कपारीत ठेवून मोठ्या दक्षतेने त्याने मूर्तीचे रक्षण केले. अवघ्या महाराष्ट्राच्या जीवाचा जीव बडव्यांचे नीजधन असलेल्या मूर्तीचे रक्षण पाटलाने तळहातावरील फोडाइतके काळजीने व हुशारीने व पुरेशा सावधानतेने केले.

विठ्ठलाची मूर्ती परत देताना देगावच्या पाटलांनी पुढे भविष्यात काही त्रास उद्भवू नये म्हणून पंढरपुरातील प्रमुख व्यक्तींचे एक संमती पत्र व मूर्ती मिळाल्याची पोच पावती प्रल्हादबुवांकडे मागितली होती.

त्यानुसार पंढरपुरातील प्रमुख मंडळीच्या सहीचे एक पत्र पाटलास देण्यात आले व विठ्ठलमूर्ती ताब्यात परत मिळाल्याची पावती प्रल्हादबुवा, गोपाळराव, नरहरी, सदोबा आदी बडव्यांनी लिहून दिली. या दोन ऐतिहासिक दस्लेवजांना भारत इतिहास संशोधन मंडळाच्या पत्रिकेतून प्रसिद्धी देण्यात आलेली आहे.

इ. स. १७०७ नंतर राजर्षी शाहूमहाराजांची कारकीर्द सुरू झाल्यानंतर मात्र श्रीविठ्ठलांना हलविण्यात आल्याची नोंद नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT