Ashadhi Ekadashi 2024  esakal
लाइफस्टाइल

Ashadhi Ekadashi 2024 : आषाढीच नाही तर पंढरपुरात वर्षभरात चारवेळा भरतात यात्रा, त्यांचं महत्त्व काय ? 

What is the importance of wari :. पश्चिम भारतातील पंढरपूर हे एक सर्वांत प्रमुख आध्यात्मिक केंद्र असून तेथे होणाऱ्या या विशेष उत्सवामुळे ते एक महत्त्वपूर्ण पर्यटनस्थानही आहे.

सकाळ डिजिटल टीम

What is the importance of wari :

वर्षभरात किती पंढरपुरच्या किती वाऱ्या असतात असं तुम्हाला विचारलं तर कितीजणांना याचं खरं उत्तर देता येईल. कारण, वारीशी संबंधित काही गोष्टी आपल्याला माहिती नाहीत. त्यामुळेच वर्षभरात आषाढी वारी आणि कार्तिकी वारी या दोनच वाऱ्या असतात असा अनेकांचा समज आहे. पण, तसं नाही.

वर्षभरात साधारण चार वेळा वारी केली जाते. जशी आषाढी आणि कार्तिक वारी असते. तशी, चैत्र आणि माघ वारीही असते. आज आपण वारी स्पेशल स्टोरीजमध्ये या चार वाऱ्यांबद्दल माहिती घेणार आहोत.  (Ashadhi Wari)

पंढरपूर हे असे एकमेव तीर्थक्षेत्र आहे, जेथे वर्षातून चार वेळा यात्रा भरते. चैत्र यात्रा, आषाढी यात्रा, कार्तिकी यात्रा आणि माघी यात्रा. साधुसंतांच्या आगमनाचा हा देवदुर्लभ सोहळा अतिशय अवर्णनीय असतो. पश्चिम भारतातील पंढरपूर हे एक सर्वांत प्रमुख आध्यात्मिक केंद्र असून तेथे होणाऱ्या या विशेष उत्सवामुळे ते एक महत्त्वपूर्ण पर्यटनस्थानही आहे.

चैत्र यात्रा

भारतीय सनातन हिंदू संस्कृतीनुसार चैत्र महिना हा नववर्षाचा आरंभ आहे. चैत्र शुद्ध एकादशीस 'कामदा एकादशी' म्हणतात. वराह पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये कामदा एकादशीचे माहात्म्य सांगितले गेले आहे. चैत्र शुद्ध एकादशीस पंढरपुरात श्रीविठ्ठलाच्या दर्शनासाठी मोठी यात्रा होते. चंद्रभागा स्नान, विठ्ठलाचे दर्शन, क्षेत्र प्रदक्षिणा, आणि भजनात तल्लीन होऊन भाविक मंडळी स्वतःला कृतार्थ करतात.

आषाढी यात्रा

आषाढ महिन्यात महायात्रा असते. आषाढ शुद्ध ५ च्या सुमारास नित्योपचार बंद होतात. एकादशीच्या किमान दहा दिवस आधी 'श्रीं'चे दर्शन अहोरात्र चालू होते. 'आषाढ शुद्ध एकादशीस' श्री विठ्ठलाचा रथ प्रदक्षिणेसाठी निघतो. पौर्णिमेला गोपाळपूर येथे गोपालकाला होतो. रात्री पांडुरंगाची पालखी निघते. दुसऱ्या दिवशी महाद्वारकाला होतो.

आषाढ शुद्ध एकादशीस 'शयन' अथवा 'देवशयनी', 'पद्मा' किंवा 'विष्णुशयनी' एकादशी असे म्हणतात. या एकादशीचे माहात्म्य भविष्योत्तर पुराणामध्ये श्रीकृष्ण आणि युधिष्ठिर महाराजांच्या संवादामध्ये वर्णिले आहे. या एकादशीचे अधिष्ठाता भगवान श्रीकृष्ण (श्री विठ्ठल) आहेत. भगवंत या दिवशी शयन करतात. या एकादशीपासूनच 'चातुर्मासाचे' व्रत आरंभ होते.

या वेळेपासून ते उठेपर्यन्त, चार महिने त्यांच्या गुणांचे श्रवण, कीर्तन करून वैष्णव या व्रताचे पालन करतात. भगवान श्रीकृष्णांना (श्रीविठ्ठलास) प्रसन्न करण्यासाठी वैष्णव ही एकादशी करतात, तसेच शुद्ध भक्ती मिळविण्यासाठी ते भगवंताकडे प्रार्थना करतात. ज्यावेळी सूर्य कर्क राशीमध्ये प्रवेश करतो, त्यावेळी भगवान मधुसूदन झोपी जातात आणि ज्यावेळी सूर्य तुळ राशीमध्ये प्रवेश करतो, तेव्हा ते झोपेतून उठतात.

कार्तिक वारी

कार्तिक शुद्ध एकादशीलाही पंढरपुरात मोठी यात्रा होते. कार्तिक शुद्ध एकादशीस 'उत्थान' एकादशीही म्हणतात. या दिवशी शयनी एकादशीला झोपी गेलेले भगवंत उठतात. स्कन्द पुराणामध्ये ब्रह्मदेव आणि नारदमुनी यांच्या संवादामध्ये उत्थान एकादशीचे माहात्म्य सांगितले आहे. भगवंताच्या प्रसन्नतेसाठी व्रताचे पालन करावे व शुद्ध भक्ती मिळावी म्हणून प्रार्थना करावी.

या एकादशीनंतर संत आणि चातुर्मासात थांबलेले लोक आपआपल्या गावी परत जातात. या यात्रेनंतर चातुर्मास पूर्ण होतो. या यात्रेत नदीच्या वाळवंटात ठिकठिकाणी कीर्तन करणारी मंडळी जमतात. हा उत्सव अत्यंत प्रेक्षणीय असतो. संध्याकाळपासून संपूर्ण वाळवंट भाविकांनी फुलून जाते. बाळवंटात ठिकठिकाणी वेगवेगळ्या दिंड्या, दिंडीप्रमुखांसह कीर्तने आणि प्रवचने करतात. एकादशीच्या दिवशी रात्रभर जागरही केला जातो.  

माघी यात्रा

पंढरपुरात ही क्रमांक चारची महत्त्वपूर्ण यात्रा आहे. ही यात्रा माघ शुद्ध एकादशीस भरते. माघ शुद्ध एकादशीस 'जया एकादशी' म्हणतात. या एकादशीचे माहात्म्य भविष्योत्तर पुराणामध्ये भगवान श्रीकृष्ण आणि महाराज युधिष्ठीर यांच्या संवादामध्ये दिले आहे. सर्व पापांचे हरण करणारी, भक्ती प्रदान करणारी ही उत्तम तिथी आहे.

या यात्रेला कर्नाटक, आंध्रप्रदेश व महाराष्ट्रातून दिंड्या येतात. आंध्रमधील भट्टीपोल्लू नामक गावातील प्राचीन विठ्ठलमंदिरातही अशीच यात्रा भरत असते. तेलुगू भाषेत प्रवचने केली जातात.

मध्यप्रदेश, गुजरात, राजस्थान या प्रांतांमधूनही पंढरपूर यात्रेस येणाऱ्या भक्तांची संख्या मोठी आहे. यात्रेदरम्यान हिंदी, गुजराती, कन्नड, तेलुगू भाषेत प्रवचने होतात. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र भारतातील विविध प्रांतांतील भाविकांना भागवत धर्माच्या माध्यमातून एकत्र आणणारे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. एवढेच नव्हे, तर धर्मसंस्कृतीचे हे प्रतीक आहे.

(संबंधित माहिती लोकनाथ स्वामी लिखीत भुवैकुंठ पंढरपूर या पुस्तकातून घेतली आहे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT