Ashadhi Wari 2024 esakal
लाइफस्टाइल

Ashadhi Wari 2024 : विठ्ठलाला चोविसांवेगळा असा का म्हणतात, भगवान विष्णूंच्या अवतारांशी आहे या शब्दाचा थेट संबंध

Lord Vishnu Avtaar : विष्णूचे दशावतार आपल्याला परिचित आहेत, श्री विठ्ठलाला कोणी पंढरीनाथ म्हणतं, तर कोणी विठू माऊली

सकाळ डिजिटल टीम

Ashadhi Wari 2024 :

वारकरी सांप्रदायात अनन्यसाधारण महत्त्व असलेली आषाढी एकादशी आज आहे. त्या दिवशी पंढरपुरात वारकऱ्यांची मांदियाळी जमते. अनेक दिवस विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी चालणारे वारकरी देवांच्या दर्शनाने धन्य होतात. विठ्ठलाची अनेक रूपे अन् अनेक नावे आहेत.

श्री विठ्ठलाला कोणी पंढरीनाथ म्हणतं, तर कोणी विठु माऊली. पंढरीनाथ, पांडुरंग, पंढरीराया, विठाई, विठोबा, विठुमाऊली, विठ्ठल गुरूराव, पांडुरंग, हरि अशी नावे भगवंताला दिली आहेत. संतांनीही त्यांच्या अभंगातून विठ्ठलाला अनेक नावे दिली आहेत. त्यापैकी एक आहे ‘विठु सावळा चोविसावेगळा’ विठ्ठलाला चोविसावेगळा असे का म्हटले जाते. असा प्रश्न नक्कीच पडतो. (Ashadhi Wari 2024)

विठ्ठलाला लावलेल्या 'चोविसांवेगळा' या विशेषणाचा अर्थ तरी काय आहे, हे आपण शोधायला हवे. संत जेव्हा विठ्ठलाला चोविसांवेगळा म्हणतात, तेव्हा त्यांच्या म्हणण्याचा भाव असा असतो की, आमचा हा विठ्ठल विष्णूच्या चोवीसही अवतारांहून वेगळा आहे.

चोवीस ही विष्णूच्या अवतारगणनेची परिसीमा आहे. पुराणांनी विष्णूचे जे अवतार गणले आहेत, त्यांची जास्तीत जास्त संख्या आहे चोवीस. विष्णूचे दशावतार आपल्याला परिचित आहेत. दशावतारांची मत्स्य, कच्छ, वराह, वामन, नृसिंह, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध अन् कल्की ही नावे थोड्याफार भेदाने अनेक ठिकाणी आलेली आहेत.

गेली कित्येक शतके भारतीय जनमानसात ती स्थिरावलीही आहेत. परंतु विष्णूचे चोवीस अवतार आपल्याला फारसे परिचित नाहीत. भागवताच्या दुसऱ्या स्कंधात (अ.७) हे चोवीस अवतार वर्णिलेले आहेत. त्यांत क्रम जरी राखला नसला, तरी प्रसिद्ध दशावतारांचा समावेश करून, शिवाय सुयज्ञ, कपिल, दत्त, धन्वंतरी, सनक, सनातन, सनंदन, सनत्कुमार, नर, नारायण, वेनपुत्र, ऋषभ, हयग्रीव आणि हंस हे अधिक चौदा अवतार भागवतकारांनी नोंदवले आहेत.

भागवत हा मराठी संतांचा सर्वाधिक प्रिय ग्रंथ. 'गीता भागवत करावे श्रवण' हा त्यांचा प्रिय आचारधर्म आहे. कारण गीतेत भगवंताचे तत्त्वरूप दर्शन आहे, तर भागवतात लीलारूप दर्शन आहे. अर्थातच भागवताने गणलेले विष्णूचे चोवीस अवतार संतांच्या दृष्टीपुढे आहेतच. त्यांचा विठ्ठल ह्या चोविसांत नाही-या चोविसांपैकी एकाशीही एकरूप नाही. तो चोविसांवेगळा आहे, या म्हणण्याचा अर्थ हा असा आहे.

विठ्ठलाचा शोध विष्णूच्या अवतारांत घेता येणार नाही, असेच संतांना सुचवावयाचे आहे. विठ्ठल हा चोविसांवेगळा आहे, म्हणजे तो विष्णूच्या चोवीसही अवतारांपैकी नाही अन् तो 'सहस्त्रनामांसी गहन' आहे अथवा 'सहस्त्रांमाजी न दिसे' म्हणजे विष्णुसहस्त्रनामांत त्याच्या नावाचा आढळ होणार नाही.

(संबंधित माहिती रा.चि.ढेरे लिखीत सुप्रसिद्ध पुसतक श्री विठ्ठल एक महासमन्वय या पूस्तकातून घेण्यात आली आहे)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assembly Elections Results: राज्यात सत्ता स्थापनेसाठी बंडखोर ठरणार किंग मेकर! महाविकास आघाडीची रणनीती ठरली, काल मुंबईत काय घडलं?

AUS vs IND 1st Test: बुमराहने जिंकला टॉस! नितीश रेड्डी अन् हर्षित राणाचे भारताकडून पदार्पण; पाहा 'प्लेइंग-11'

Sakal Podcast: दहावी-बारावीच्या परीक्षांचं अंतिम वेळापत्रक जाहीर ते पुढचा मुख्यमंत्री देशमुखांच्या घरातलाच?

दहावी-बारावी बोर्डाचे ठरलं वेळापत्रक! यंदा परीक्षेचे सीसीटीव्हीत होणार रेकॉर्डिंग; निकालापर्यंत फुटेज साठविण्याचे केंद्रांना बंधन; केंद्रांवरील सुविधांची १५ डिसेंबरपर्यंत पडताळणी

Panchang 22 November: आजच्या दिवशी शुं शुक्राय नम:’ या मंत्राचा किमान १०८ जप करावा

SCROLL FOR NEXT