सध्या ब्रेकअप करण्याचं प्रमाण वाढलय. जो तो छोट्या छोट्या गोष्टीवरुन ब्रेकअप करतात. त्यानंतर मात्र पश्चाताप करतात. तुमच्यावर अशी वेळ येऊ नये यासाठी ब्रेकअप करण्यापुर्वी तुम्ही योग्य निर्णय घेत आहात का, याचा विचार करा. अशा काही गोष्टी आहेत ज्यांचा तुम्ही विचार करू शकता जेणेकरून असा मोठा निर्णय घेताना तुम्हाला योग्य निर्णय घेत असल्याची खात्री वाटेल. ब्रेकअप करण्यापूर्वी तुम्ही खालील प्रश्ने स्वतःला विचारा. (Questions to ask yourself before you end a relationship)
मला माझ्या पार्टनरसोबत भविष्य दिसते का?
भविष्याबद्दल अति विचार करणे चांगले नाही, परंतु जेव्हा तुम्ही योग्य व्यक्तीसोबत असाल, तेव्हा अ तुम्हाला भविष्याबद्दल विचार करण्याची भीती वाटणार नाही.
मी माझ्या पार्टनरसोबत आनंदी आहे का?
तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत खरोखर आनंदी आहात का हे स्वतःला विचारा. त्यांच्याशिवाय आयुष्याची कल्पना करा आणि जर तुम्हाला वाटत असेल की तुम्ही त्यांच्याशिवाय आनंदी राहू शकता तर तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत बोलण्याची आवश्यकता आहे.
माझा पार्टनर माझ्या गरजा पूर्ण करत आहे का?
अपेक्षा आणि गरजा हा नात्याचा खुप मोठा पैलु आहे. तुमचा पार्टनर तुमच्या गरजा पूर्ण करत आहे की नाही याचा बारकाईने विचार करा.
आमचं अजूनही एकमेकांवर प्रेम आहे का?
प्रेम अशी भावना आहे जी सहज समजत नाही म्हणून तुमच्यामध्ये जर प्रेम शिल्लक असेल तर तुम्ही ब्रेकअपकडे पाऊल उचलण्यापूर्वी स्वतःला विचारले पाहिजे. जर तुमच्यात अजूनही प्रेम जीवंत असेल, तर नात्यासाठी ही अजूनही एक आशा आहे.
मला ब्रेकअप केल्यानंतर पश्चात्ताप होईल का?
आयुष्यात असे काही निर्णय घ्यावे लागतात की नंतर पश्चात्ताप होतो. मात्र वेळ निघून गेलेली असते. त्यामुळे ब्रेकअप करण्यापुर्वी तुम्हाला त्यानंतर कोणताही पश्चात्ताप होणार नाही. याची खात्री करा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.