Kitchen Astro Tips esakal
लाइफस्टाइल

Kitchen Astro Tips: किचनमध्ये देवघर बनवणं योग्य आहे का? काय आहेत त्यांचे नियम

devghar in kitchen: देवघर स्वतंत्र खोलीत असावं की किचनमध्ये?

Pooja Karande-Kadam

Kitchen Astro Tips : ज्यावेळी आपल्यावर काही मोठं संकट कोसळतात तेव्हा घरातल्या एखाद्या शांत ठिकाणी बसून आपण मन मोकळं करतो. रडतो अगदी हक्कानं भांडतो ती जागा असते आपलं हक्काचं देवघर. हिंदू धर्मात घरात देवतांचा वास असण्याला महत्वाचे स्थान आहे.

त्यामुळेच घरात देवांसाठी मंदिर बांधले जाते. घराचे प्लॅन करण्याआधीच देवांचे स्थान निश्चित केले जाते. असे मानले जाते की, जर घरात मंदिर असेल तर सकारात्मक ऊर्जा राहते. त्यामुळे सर्वात पवित्र असलेल्या घरातील मंदिरासाठी लोक जागा निवडतात.

 सध्याच्या सिस्टीमनुसार घरात अनेकजण देवघर वेगळ्या रूममध्ये बांधतात. वेगळी रूम बनवणे तसे जागा कमी असल्याने शक्य होत नाही. तर, काहीजण हॉल, किचनमध्ये देवांचे स्थान बनवतात. देवांचे ते ठिकाण पवित्र मानून तिथे त्यांची स्थापना केली जाते. त्यांची रोज पूजा केली जाते.

खरं सांगायचं तर, वास्तूशास्त्रानुसार स्वयंपाकघर  हेच देवांचे पवित्र स्थान आहे. कारण, स्वयपाकघरातून आपल्याला आरोग्य, चव आणि सौंदर्य मिळवता येते. अशावेळी जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर वास्तुच्या काही नियमांची काळजी घेणे आवश्यक आहे. यासंदर्भात वास्तुतज्ज्ञ डॉ. शेफाली गर्ग यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत.

 स्वयंपाकघरातल्या मंदिराचा रंग कोणता असावा

जर तुम्ही किचनमध्ये मंदिर बांधत असाल किंवा ठेवत असाल तर त्याचा रंग लाल असावा हे लक्षात ठेवा. हिंदू धर्मात लाल रंग हा सर्वात पवित्र रंग मानला जातो. हा अग्नी तत्वाचा रंग आहे, त्यामुळे स्वयंपाकघराचा रंगही लाल असेल तर तो वास्तुनुसार चांगला मानला जातो. किचनमध्ये मंदिर असेल तर त्याचा रंग लाल ठेवा. लाल रंग ठेवायचा नसेल तर पांढरा, चांदी, पिवळा आणि तपकिरी रंगही शुभ आहे.

 स्वयंपाकघरातील मंदिराची दिशा

जर तुम्ही स्वयंपाकघरात मंदिर बांधत असाल तर त्याची दिशा नेहमी ईशान्येकडे ठेवावी. या दिशेमध्ये शुभ प्रभाव पडतो आणि यामुळे चांगली आणि सकारात्मक ऊर्जादेखील मिळते. वास्तूनुसार या दिशेला मंदिर बांधल्यास सौभाग्य आणि लाभ मिळतो.

स्वयंपाकघरात बांधलेल्या मंदिरात कोणते देव ठेवावेत?

स्वयंपाकघरात बांधलेल्या मंदिरात कधीही शिवाचे किंवा शिवलिंग किंवा फोटो ठेवू नका. लोक शिवजींचे पुजन जसेच्या तसे करू शकत नाहीत. अशावेळी भगवान श्रीकृष्ण, अन्नपूर्णा देवी, हनुमान जी आणि श्री गणेश जी यांची मूर्ती ठेवावी. स्वयंपाकघरात बसलेल्या लक्ष्मीमातेची मुर्ती आपण ठेवू शकता.

देवघरात या गोष्टी ठेऊ नका

अनेकदा आपण देवघर अगदी टापटीप सुंदर ठेवतो. पूजा – अर्चा सर्व काही अगदी व्यवस्थित करतो पण देवघराच्या वरती आपला खूप पसारा असतो , मोठी अडगळ करतो आपण जसे की सुकलेल्या फुलांच्या माळा. काडीपिटी इतर साहित्य पण हे सर्व चुकीचे आहे. देवघरावर अशा वस्तु ठेवू नयेत.

प्राचीन मूर्तींचे भग्न अवशेष देखील येथे ठेवू नये. जास्त फोटो , जास्त मूर्ती किंवा एका देवाचे डबल फोटो किंवा मूर्ती असू नयेत. जसे की अनेकदा गणपतीच्या आपल्याकडे अनेक मूर्ती असतात कारण अनेकजण आपल्याला गणपती भेट देखील देतात. तुम्ही सर्व मूर्ती देवघरात ठेवू नका काही मूर्ती तुम्ही वेगळ्या जागेवर ठेवा. 

किचनमध्ये मंदिर असेल तर या गोष्टी लक्षात ठेवा

  • सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वच्छता. स्वयंपाकघरात मंदिर आहे, त्यामुळे सिंकमध्ये खरकटी भांडी ठेवू नयेत.

  • शूज-चप्पल घालून स्वयंपाकघरात कधीही प्रवेश करू नका.

  • जो कोणी स्वयंपाकघरात अन्न शिजवतो, तो सर्वप्रथम देवाला अर्पण करतो. स्वयंपाकघरात सात्त्विक अन्न शिजवावे लागेल, हेही लक्षात ठेवा.

  • देवाच्या मंदिराच्या विरुद्ध दिशेला गॅस ठेवू नये, जेणेकरून देवाकडे पाठ फिरवून अन्न शिजवू नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

IPL Auction 2025 : १५७४ खेळाडूंची नोंदणी, पण २०४ जणांनाच लागणार लॉटरी! ६४१ कोटींचं बजेट; जाणून घ्या सर्व डिटेल्स

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

SCROLL FOR NEXT