Astro Tips For Diwali  esakal
लाइफस्टाइल

Astro Tips For Diwali : दिवाळीला घरात पाल दिसल्यावर एवढंच करा, थोड्याच दिवसात नशिब पालटतंय की नाही बघाच!

या दिवशी एक घुबड आणि मांजर पाहणे देखील शुभ मानले जाते

Pooja Karande-Kadam

Astro Tips For Diwali

दोनच दिवसात सगळ्यांना आवडणाऱ्या दिवाळीला सुरूवात होणार आहे. धनत्रयोदशीपासून दिवाळी साजरी केली जाते. या दिवशी माता लक्ष्मीची पूजा केली जाते. लक्ष्मीमातेची पूजा करून तिचा आशिर्वाद सदैव आपल्यासोबत राहूदेत अशी प्रार्थनाही केली जाते. पण काही लोक असे असतात की एकीकडे देवीची पूजा करतात अन् दुसरीकडे लोकांना अपमान करतात, दारात आलेल्या गरीबांना हाकलून देतात.

तर,काही लोक घरात आलेले मांजर,पाल यांनाही हुसकवून लावतात. पण खरंतर या प्राण्यांमध्येच माता लक्ष्मीचा वास असतो. दिवाळीच्या दिवशी तुमच्या घरात पूजा सुरू असताना अचानक पाल दिसली. तर तिला कधीच हुसकवू नका. कारण, तिच तुमचं नशिब पालटणारी ठरू शकते.

ज्योतिषी स्वामी कन्हैया महाराज म्हणाले की, दिवाळीच्या पूजेदरम्यान घरात पाल दिसली तर समजून जा की माता लक्ष्मी तुमच्या घरी येणार आहे. याशिवाय घरातील आर्थिक संकटही दूर होणार आहे. दिवाळीच्या दिवशी पाल दिसणे हे शुभाचे प्रतीक आहे.

धार्मिक मान्यतांनुसार, पालीचा थेट संबंध धनाची देवी लक्ष्मीशी असतो. दिवाळीला घरात पालीचे आगमन हे लक्ष्मीच्या आगमनाचे प्रतीक आहे. हे शुभ संकेत दर्शवते.

दिवाळीच्या दिवशी घरामध्ये पाल दिसली तर देवी लक्ष्मीचे ध्यान करून घरात सुख,शांती आणि समृद्धीची कामना करावी.त्यामुळे देवी लक्ष्मी भक्तांच्या मनोकामनाही ऐकते. पाहणे देखील खूप शुभ आहे.

पाली व्यतिरिक्त या दिवशी एक घुबड आणि मांजर पाहणे देखील शुभ मानले जाते. मांजर जर तुमचा रस्ता ओलांडत असेल तर त्याचा प्रभाव अशुभ असतो, पण दिवाळीच्या काळ्या रात्री मांजर दिसली तर समजून घ्या. की तुमच्या आयुष्यातील आर्थिक समस्या दूर होऊ लागतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT