लाइफस्टाइल

वारंवार बाळाला नजर लागते? ज्योतिषांनी सांगितलेले 'हे' ४ उपाय ट्राय करा

बाळांवर वाईट नजरेचा किंवा नकारात्मक उर्जेचा प्रभाव असल्याचे मानले जाते.

सकाळ डिजिटल टीम

मागील कित्येक दिवसांपासून नजर काढण्याची परंपरा देशभरात चालली आली आहे. अनेक ठिकाणी याला दृष्ट काढणे असंही म्हणतात. कुणीही व्यक्तीला त्यांच्या चांगुलपणामुळे किंवा त्याच्या यशामुळे दृष्ट लागू शकते. प्रमोशनपासून ते घर, दुकान, नोकरी अशा अनेक गोष्टींना वाईट नजर लागते असे म्हटंले जाते.

लहान मुलांची दररोज दृष्ट काढावी लागते. दृष्ट नाही काढली तर मुले आजारी पडतात, असं मानलं जाते. बऱ्याचवेळा त्यांचं खाणंपिणं बंद होतं आणि चिडचिड होते. काहीवेळी अशी बाळ दूध पिणं बंद करतात. त्यावेळी त्यांना दृष्ट लागली असे म्हटलं जातं. त्यांच्यावर वाईट नजरेचा किंवा नकारात्मक उर्जेचा प्रभाव असल्याचे मानले जाते. ज्योतिष शास्त्रामध्ये नजरेच्या या दृष्टीबाबत अनेक उपाय सांगण्यात आले आहेत.

अनेकांचा नजर किंवा दृष्ट काढण्यावर विश्वास नसतो. पण जेव्हा एखाद बाळ विनाकारण खाणं-पिणं बंद करतं आणि ते चिडचिड सुरु करतं. अशावेळी याकडं लक्ष देणं आवश्यक असतं. आपल्या घरातील वरिष्ठ व्यक्ती अशावेळी नजर काढण्याचा सल्ला देतात. ज्योतिषशास्त्राच्या काही उपायांनी मुलाला नजर लागल्यानंतर काही दोष दूर होऊ शकतात.

मुलांची चिडचिड दूर होईल

जर तुमचे लहान बाळ चिडचिड आणि सतत रडत असेल तर यासाठी तुम्ही तांब्याच्या भांड्यात पाणी आणि फुले ठेवा. यानंतर हा तांब्या मुलाच्या डोक्यापासून पायापर्यंत 11 वेळा हे उतरून घेवून नंतर हे पाणी एका भांड्यात ठेवा. यामुळे दृष्ट लागली असेल तर त्याचा परिणाम कमी होईल.

लाल-मिरचीच्या मदतीन नजर उतरवली जाते

लाल मिरच्यांसोबत काही घटक एकत्र करत मुलांची दृष्ट काढण्याची परंपरा जुनी आहे. ज्योतिष शास्त्रात याचं वर्णन एक निश्चित उपाय म्हणून केलं आहे. बाळावरून तीन वेळा या लाल मिरची उतरून जाळून टाकाव्या. हे हळूहळू प्रभाव दाखवू लागेल.

मुलाच्या विकासात अडथळा

जर मुलाची वाढ थांबली असेल तर अशावेळी मुलाकडून सातवेळा तुरटी आणि मोहरी उतरवून आगीत जाळून टाकली जाते. यामुळे मुलाच्या विकासावरील वाईट नजरेचा प्रभाव दूर होतो.

बाळ दूध पीत नसेल

जर तुमचे बाळ दूध पीत नसेल किंवा सातत्यानं रडत आणि चिडचिड करत असेल, तर त्यासाठी एखाद्या शनिवारी कच्चे दूध ७ वेळा बाळावरून उतरवून श्वावाला पाजावे. यामुळे बाळ दूध पिण्यास सुरुवात करतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात मतमोजणीला प्रत्यक्ष साडे आठ वाजता सुरुवात होणार

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: दहिसर मतदान केंद्रात निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार

Maharashtra Assemble Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

SCROLL FOR NEXT