car parking tips Esakal
लाइफस्टाइल

बाहेरगावी जाताना खूप दिवस Car Parking करून ठेवताय, मग ही काळजी घ्यायला विसरू नका

Kirti Wadkar

Car Parking Tips: अनेकजण मे महिना किंवा दिवाळीच्या सुट्टीत गावी जातात किंवा अनेक दिवसांसाठी फिरायला जातात. तर काहीजण काही कामानिमित्ताने काही महिन्यांसाठी परदेश दौऱ्यावर Foreign Tour जात असतात. Automobile News How to protect your car while not in use

अशावेळी अनेकजण त्यांची चारचाकी Four Wheeler घरीच ठेवून जातात. अनेक दिवस कार एकाच ठिकाणी पार्क राहिल्याने अनेकदा अशी कार Car Care पुन्हा सुरू करताना काही समस्या निर्माण होतात.

अनेक दिवस एकाच जागी गाडी पार्क राहिल्याने काहीवेळा गाडीमध्ये मोठा बिघाड होवू शकतो. यासाठी आधीच खबरदारी घेणं गरजेचं आहे. मोठ्या सुट्टीवर घराबाहेर जाताना काही खास गोष्टींची काळजी घेतल्यास परतल्यानंतरही गाडी सुस्थितीमध्ये राहिल.

१. टायरमध्ये जास्त हवा भरावी- जास्त दिवस गाडी एकाच ठिकाणी उभी राहिल्याने गाडीच्या टायरमध्ये फ्लॅट स्पॉट येतात. यासाठीच बाहेर जाण्यापूर्वी गाडीच्या टायरमध्ये थोडी जास्त हवा भरल्यास ही समस्या दूर होवू शकते.

टायरमध्ये हवा कमी असल्यास आणि गाडी अनेक दिवस एकाच ठिकाणी पार्क असल्यास चाकांवर दबाव पडतो. यामुळे जेव्हा तुम्ही अनेक दिवसांनी गाडी चालवण्यासाठी सुरुवात करता तेव्हा गाडी रस्त्यावर योग्यरित्या धावणार नाही.

२. कार धुवून पार्क करा- अनेकदा कारवर रस्त्यावरील पाणी किंवा चिखल उडलेला असतो. अशा स्थितीत कार अनेक दिवस पार्क करून ठेवल्यास गंज लागण्याची शक्यता असते. यासाठी गाडी स्वच्छ धूवुन पार्क करून ठेवावी.

अनेक ठिकाणी बिल्डिंग किंवा घरांसाठी खास राखिव पार्किंग नसते अशावेळी गाडी रस्त्याशेजारी पार्क करावी लागते. अशा ठिकाणी किंवा धुळीच्या ठिकाणी जर तुम्ही गाडी पार्क करून जाणार असाल तर ती धुतल्यानंतर थोडावेळ उन्हामुळे पूर्णपणे वाळेल याची काळजी घ्या. त्यानंतर गाडीवर कव्हर टाकायला विसरू नका. यामुळे तुम्ही परतल्यावरही गाडी चांगली राहिल.

हे देखिल वाचा-

३. गाडी आतूनही स्वच्छ ठेवा- गाडी पार्क करून अनेक दिवसांसाठी तुम्ही बाहेर जात असाल तर गाडी आतूनही स्वच्छ करणं विसरू नका. खास करून गाडीमध्ये सीट खाली किंवा केबिनमध्ये तसचं डिकीमध्ये खाण्याच्या वस्तू किंवा खाऊन पडलेला कचरा नाही याची दक्षता घ्या. अन्यथा गाडीमध्ये उंदीर किंवा मुंग्या येऊन घर करू शकतात.

अनेकदा उंदीर गाडीतील वायरिंग कुरतडण्याची शक्यता असते. यामुळे मोठा फटका बसू शकतो. यासाठी गाडी आतून पूर्णपणे स्वच्छ करा.

४. योग्य ठिकाणी गाडी पार्क करा- अनेक दिवसांसाठी कार पार्क करून जाताना ती योग्य ठिकाणी पार्क करणं अत्यंत गरजेचं आहे. अनेकजण झाडाखाली गाडी पार्क करून जातात. मात्र यामुळे झाडाची पानं, फांद्या तसचं पक्षांची विष्ठा गाडीवर सतत पडत राहिल्यानी गाडी घाण होते. शिवाय कालांतराने गाडीवरील त्याचे डाग कायम राहू शकतात.

शिवाय जास्त उतारावर गाडी अनेक दिवसांसाठी पार्क करणं टाळावं. यामुळे टायरवर त्याचा परिणाम होवू शकतो. तसचं पावसाच्या काळात गटार किंवा एखाद्या नाल्याशेजारी गाडी पार्क करून जाऊ नका.

५. अर्धा इंच काच उघडी ठेवा- जर तुम्ही एखाद्या उन्हाच्या ठिकाणी किंवा उघड्या ठिकाणी गाडी पार्क करून जात असाल तर गाडीच्या खिडकीची कार किमान अर्धा इंच तरी उघडी ठेवा. यामुळे उन्हात गाडी तापल्यानंतरही गाडीच गरम गॅस तयार होणार नाही आणि कोणताही धोका निर्माण होणार नाही.

अशा प्रकारे काही गोष्टींची काळजी घेऊन जर तुम्ही अनेक दिवसांसाठी कार एकाच ठिकाणी पार्क केली तरी ती सुरक्षित राहिल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election: ''काय झाडी.. काय डोंगर... किती हे खोके?'' पुण्यात नाकाबंदीदरम्यान सापडले पाच कोटी

Karad Assembly Election 2024 : कऱ्हाडला सोनू, नकटा रावळ्यासह बुक्कीत टेंगुळवरही रंगताहेत चर्चा

Sarfaraz Khan: सर्फराज खानला पुत्ररत्न! गोड बातमी सोशल मीडियात व्हायरल

Australia दौऱ्यासाठी भारत A संघाची घोषणा, ऋतुराजच्या हाती कर्णधारपदाची धुरा, इर्श्वरनला दिली मोठी संधी

Melie Kerr: लहानपणी ज्यांच्याबरोबर वर्ल्ड कप जिंकण्याचं स्वप्न होतं, ज्यावर निबंध लिहिला.... जेव्हा अगदी तसंच घडतं

SCROLL FOR NEXT