Top Off-Road SUV Cars : भारतात आजही अनेक ठिकाणी चांगल्या रस्त्यांची सोय नाही. भारताचा बराच भाग हा डोंगराळ असल्याने आणि पावसाचं प्रमाण जास्त असल्याने चागल्या रस्त्यांची अवस्थाही लवकरच खराब होते.
अशा रस्त्यांवर प्रवास करायचा तो ही कारने म्हणजे मोठी चिंता असते. अशावेळी ऑफ रोड कार या रस्त्यांवर जम धरतात. Automobile News in Marathi Best Off Road SUV in India
तर भारतात काही कार शौंकिन असेही आहेत ज्यांना या डोंगराळ भागात किंवा दूर्गम भागात ऑफ रोड ड्रायव्हिंग Driving करायला आवडते. या सर्वांसाठी ऑफ रोड कार हा एक उत्तम पर्याय आहेत. तसंच ऑफ रोड गाड्यांचा ग्राऊंड क्लियरन्स जास्त असल्याने त्या कोणत्याही प्रकारच्या भौगोलिक परिस्थितीत चांगला परफॉर्मन्स देतात.
भारतात सध्या कोणत्या ऑफ रोड कार Car जास्त ट्रेंडमध्ये आहेत. यातील बजेट आणि चांगले फिचर्स असलेल्या कार कोणच्या हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
१. महिंद्रा थार Mahindra Thar- महिंद्राने Thar 2wd एक नवं मॉडेल नुकतच लाँच केलं आहे. ही कार हार्ड टॉप व्हर्जनमध्ये लाँच करण्यात आली आहे. या नव्या मॉडलमध्ये इलेक्ट्रॉनिक ब्रेक लॉकिंग डिफरेंशियल, रोल-ओव्हर मिटिगेशनसह ESP आणि हिल होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोल हे खास फिचर्स देण्यात आले आहेत.
थारचं हे नवं मॉडल SUV AX Opt आणि LX या दोन वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. पेट्रोल इंजिंन आणि डिझेल असे दोन्ही पर्याय यात उपलब्ध आहेत. थारची एक्स शोरुम किंमत ही १३.५३ लाख रुपयांपासून १४.२८ लाख इतकी आहे.
२. महिंद्रा स्कॉर्पिओ Mahindra Scorpio clasic- महिंद्राने जुन्या स्कॉर्पिओमध्ये बदल करत नवं क्सालिक मॉडेल लॉन्च केलंय. ही कार ऑफ रोडिंगसाठी एक उत्तम पर्याय आहे.स्कॉर्पिओ क्लासिक Classic S आणि Classic S11 या दोन वेरियंटमध्ये उपलब्ध आहे. या दोन्हीमध्ये ७ आणि ९ सीटचा पर्याय आहे. या मॉडलमध्ये ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स पार्किंग कॅमेरा, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम आणि अँड्रॉइड ऑटो सपोर्ट असे काही खास फिचर्स आहेत.
याच्या डिझेल मॉडलची क्षमता 2.2L mHawk टर्बोचार्ज्ड इतकी आहे. त्याचसोबत ड्यूल फ्रंट एअरबॅग, पॅनिक ब्रेक इंडिकेशन, सीट बेल्ट रिमाइंडर लँप, स्पीड अलर्ट आणि ऑटो डोर लॉक हे देखील काही फिचर आहेत Mahindra Scorpio clasic fetuares. महिंद्रा स्कॉर्पिओ क्लासिकची किंमत ११.९९ लाखांपासून सुरु होते.
हे देखिल वाचा-
3. महिंद्रा स्कॉर्पिओ एन Mahindra Scorpio N - थार प्रमाणेच महिंद्राची स्कॉर्पिओ एन ही ऑफ रोडिंगसाठी एक तडफदार कार असल्याच म्हणता येईल. या SUV च्या 4×4 व्हील ड्राइव्ह वेरियंटची सुरुवातीची किंमत रु 15.45 लाख आहे. तर टॉप-एंड वेरियंट (Z8L) डिझेलची किंमत 21.45 लाख रुपये आहे.
स्कॉर्पिओ क्लासिकपेक्षा काही अधिक चांगले फिचर्स स्कॉर्पिओ एनमध्ये पाहायला मिळतात. यात 8-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम,ड्युअल-झोन ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल, १२ स्पीकर सोनी 3D सराउंड साउंड सिस्टम ही काही खास वैशिष्ट्य आहेत.
४. एमजी हेक्टर MG Hector- ऑफ रोड ड्रायव्हिंगसाठी MG Hector next Gen हा एक नवा पर्याय उपलब्ध आहे. या नेक्स्ट जेन कारमध्ये अनेक अत्याधुनिक फिरर्च देण्यात आले आहेत. त्यामुळे ती इतर बजेट ऑफ रोडिंगपेक्षा वेगळी ठरते. यात ११ अडवान्स्ड ड्रायव्हर असिस्टण्स सिस्टम्स असून ट्रॅफिक जॅम असिस्ट आणि ऑटो टर्न इंडिकेटर्स आहेत.
या SUVमध्ये आतापर्यंचं सर्वात मोठं म्हणजेच 14-इंच इंफोटेनमेंट सिस्टीम (14 inch infotainment system) देण्यात आलं आहे.तसचं यात ७५ हून अधिक कनेक्टेड वैशिष्ट्यांसह १०० वॉईस कमांड्स आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने ६ एअर बॅग्स, ३६० डिग्री कॅमेरा, सर्व सीटस्ला ३-पॉइण्ट सीट बेल्ट त्याचप्रमाणे हिल असिस्ट कंट्रोल, ऑल फोर-व्हील डिस्क ब्रेक्स आणि इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोग्राम असे काही सेफ्टी फिचर्स आहेत.
5. फोर्स गुरखा Force Gurkha- फोर्स गुरखा हा ऑफ रोडिंग ड्रायव्हिंग शौकिनांसाठी एक मस्त पर्याय आहे. 205mm ग्राउंड क्लीयरन्स असलेली ही SUV अॅडव्हेंचर ड्रायव्हिंगसाठी देखील चांगला पर्याय आहे. गुरखाची किंमत १४ लाखांपासून सुरू होते.
Force Gurkhaच्या सेकेंड जेनमध्ये जबरदस्त स्टायलिंग आणि डिझाइन देण्यात आल्याने ती खूपच आकर्षक दिसते. यात अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टिम , इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रीब्यूशन , ड्युअल एअरबॅग, पार्किंग सेन्सर असे सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत.
यासोबतच ऑफरोडिंग SUV मध्ये जीप कंपास, महिंद्रा बोलेरो Mahindra Bolero, टाटा सफारी, Toyota Fortuner आणि Range Rover by Land Rover हे पर्यायदेखील आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.