Foods to avoid during fasting sakal
लाइफस्टाइल

Fasting Rules: उपवासाच्या वेळी हे तीन पदार्थ खाणे टाळा!

Aishwarya Musale

Fasting Rules: " श्रावणमासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहिकडे "असं म्हणत श्रावणाचं आगमन होतं आणि त्यासोबत येतात ते श्रावणातले सण. आषाढी एकादशी पासून सुरू झालेली सणांची गाडी थेट नवरात्र आणि त्याच्यानंतरही चालू राहते. आणि या सगळ्या सोबत सुरू होते उपवासांची मालिका.

उपवास हा जितका श्रद्धेचा प्रश्न आहे, तितकाच तो आरोग्याचा प्रश्न देखील आहे. कारण, उपवास म्हटल्यावर येते ती साबुदाण्याची खिचडी, चहा कॉफी, साबुदाण्याचे वडे, बटाट्याचा चिवडा, रताळी आणि बरचं काही. अर्थात हे पदार्थ चवदार चविष्ट वाटत असले तरीही यातील काही पदार्थ तुमचे आरोग्य बिघडवू शकतात. बघूया कोणते आहेत ते पदार्थ!

चहा आणि कॉफी -

उपवास म्हटलं तर कमीत कमी चहा तरी लागतो बाबा!! कारण  चहाने भूक मरते असं आपल्याला कोणीतरी वर्षानुवर्षे सांगितलेलं असतं. त्यामुळे आलं घातलेला चहा आणि उपवास हे एक भन्नाट कॉम्बिनेशन असतं. उपवासाच्या दिवशी अति प्रमाणात चहाचे सेवन केल्याने डीहायड्रेशनची समस्या उद्भवू शकते. थोडक्यात सांगायचं तर चहा आत, आणि शरीरातील पाणी बाहेर!

चहा आणि कॉफीमुळे लघवीला होऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते. ज्यामुळे डोकेदुखी, चक्कर येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. श्रावणात श्रावणी सोमवार, श्रावणी शुक्रवार यासारखे साप्ताहिक उपवास येत असल्याने चहा पिण्याचे प्रमाण आपसूकच वाढते.  चहा मधील टॅनिन हा घटक शरीराची लोह शोषण्याची क्षमता कमी करतो.

ज्यामुळे स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता किंवा ॲनिमियासारख्या घातक समस्या उद्भवू शकतात. याशिवाय अतिप्रमाणात कॉफीचे सेवन केल्याने शरीरातील झोपेचे हार्मोन मेलॅटोनिन कमी होते. त्यामुळे निद्रानाश आणि चिडचिड होऊ शकते. त्यामुळे उपवासाच्या वेळी चहा किंवा कॉफीला पर्याय म्हणून नारळाचे पाणी, फळांचा ज्यूस, सरबत यासारखे पदार्थ निवडावे.

तळलेले पदार्थ - 

उपवासाला बटाट्याचे वेफर, साबुदाणा वडे यासारख्या तळलेल्या पदार्थांची रेलचेल असते. उपवासाला बटाटा किंवा साबुदाणा खाण्यामागचे महत्त्वाचे कारण हे शरीराला कर्बोदकाचा (कार्बोहायड्रेट्स )  पुरवठा करणे असले तरीही हे पदार्थ तळून खाल्ल्याने पोटाच्या समस्या उद्भवू शकतात.

पावसाळ्यात आपली पचनशक्ती मंद झाल्याने, असे तळलेले पदार्थ अति प्रमाणात खाल्ल्याने त्यांचे योग्य पद्धतीने पचन होत नाही. उपवासाच्या दिवशी शरीरातील जठराग्नी (ऍसिड ) उसळल्याने अशावेळी तेलकट पदार्थ खाण्याने ऍसिडिटी होण्याचे प्रमाण अजूनच वाढते. त्यामुळे बटाट्याचे तळलेले पदार्थ खाण्याऐवजी उकडलेले पदार्थ खाणे फायद्याचे ठरते. 

आंबट फळे -

उपवासाच्या दिवशी संत्रे, लिंबू, मोसंबी यासारखी आंबट फळे खाणे टाळा. कारण या फळांमुळे ऍसिडिटी समस्या उद्भवू शकते.

आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की उपवासाच्या वेळी नेमकं खायचं काय? तुम्ही उपवासाच्या वेळी ताजी फळे, उकडलेले बटाटे, रताळी, सरबत, फळांचे ज्यूस, जास्त तिखट नसलेली साधी साबुदाण्याची खिचडी हे पदार्थ खाऊ शकता. डायबिटीस, हृदयविकार आणि किडनीचे आजार असलेल्या लोकांनी उपवास करणे शक्यतो टाळावे. कारण प्रत्येक वेळी प्रश्न श्रद्धेचा नाही, स्वास्थ्याचा देखील आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'हा जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार', IND vs BAN सामन्याविरोधात हिंदू संघटना आक्रमक, मालिका रद्द होणार?

Aaditya Thackeray : महायुती गद्दारांचा चेहरा घेऊन विधानसभा लढणार का?

Raj Thackeray: डॉ. अजित रानडेंना कुलगुरु पदावरुन हटवल्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट; राज्यासह केंद्र सरकारला सुनावले खडेबोल

Sanjay Gaikwad: संजय गायकवाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल; वडेट्टीवारांचा जोरदार हल्ला

दोन टप्प्यात निवडणुका कुठे होणार? सुरत आणि गुवाहाटीला का? शिंदेंच्या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची खोचक टीका

SCROLL FOR NEXT