जर तुम्हाला स्वादिष्ट कढी आणि भात मिळाला तर तुमचा दिवस नक्कीच चांगला जाईल. लोक सहसा हिवाळ्यात आणि उन्हाळ्याच्या संध्याकाळी जेवणात कढी मोठ्या आवडीने पितात.
सर्वांच्या घरात कढीसोबत भजे, पकोड्यांचा आस्वाद घेतला जातो. पण अनेक लोक दह्याची कढी बनवतांना साध्या चुका करताता. ज्यामुळे चव खराब होते.
जास्त मसाले वापरणे
कढीचा चव वाढवण्यासाठी अनेक लोका खुप जास्त मसाले टाकतात. यामुळे कढी जास्त तिखट होते. यामुळे कढी बनवताना मेथी दाणा, हिरवी मिरची,कढीपत्ता याचा वापर करावा.
जास्त तेल वापरणे
दह्याची कढी बनवताना एक ते दोन चमचे तेल वापरावे. यापेक्षा जास्त तेल वापरू नका. कारण तेल जास्त टाकले तर फोडणी दिल्यावर ते तरंगते.
दही न फेटणे
अनेक लोक दही न फेटता कढी करतात. यामुळे कढी गुळगुळित होत नाही. कढी बनवण्यापुर्वी दही चांगले फेटावे आणि नंतरच बेसणमध्ये मिक्स करून फोडणी द्यावे.
जास्त बेसण वापरणे
दह्याची कढी बनवतांना जास्त बेसण वापरू नका. कारण यामुळे कढी घट्ट होते. कढी पातळ बनवायची असेल तर बेसण जास्त टाकू नका. कढी चांगली उकाळावी.
दह्याची कढी बनवण्याची पद्धत
सर्वात आधा दही फेटून घ्यावे. नंतर त्यात थोडे बेसण मिक्स करावे. नंतर गॅसवर पॅन ठेऊन तेल गरम करावे. नंतर त्यात जिरं, मोहरी, मेथी दाणा, कढीपत्ता, आलं-लसूण पेस्ट, हिंग , मिरचीचे बारिक तुकडे टाकावे. नंतर दही आणि बेसणाचे मिश्रण टाकावे. नंतर गरजेनुसार पाणी मिक्स करावे. चांगली उकळी येईपर्यंत चमचाने ढवळत राहावे. नंतर शेवटी चवीनुसार मीठ टाकावे. नंतर गॅस बंद करावा. तुमची दह्याची स्वादिष्ट कढी तयार आहे.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.