Pitru Paksha 2024 Sakal
लाइफस्टाइल

Pitru Paksha 2024: पितृपक्षात चुकूनही खरेदी करू नका 'या' वस्तू, अन्यथा पित्र होतील नाराज

पुजा बोनकिले

Pitru Paksha 2024: हिंदू धर्मात पवित्र भावण महिन्याला जसे महत्व आहे,तसेच 15 दिवसांच्या पितृपक्षाला देखील महत्व आहे. या दिवसांमध्ये पितरांची आठवण रून त्यांचे श्राद्ध, तर्पण अर्पण केल्याने पितृदोषातून मुक्ती होते अशी मान्यता आहे. यंदा पितृ पक्ष 17 सप्टेंबरपासून म्हणजेच भाद्रपद पौर्णिमेपासून सुरू होत आहे. जर तुमचे पूर्वज प्रसन्न असतील तर घरात कोणतेही संकट किंवा आर्थिक समस्या येत नाहीत. या दिवसांमध्ये काही वस्तू अशा आहेत ज्या खरेदी करणे टाळले पाहिजे.

पितृपक्षात चुकूनही पुढील गोष्टी खेरदी करू नका

वाहन, प्रॉपर्टी, घर

वाहन, प्रॉपर्टी, घर यासारख्या गोष्टी पितृपक्षात खरेदी करणे टाळा. या दिवसात अशा गोष्टी खरेदी करणे शुभ मानले जात नाही.

कोणतेही दागिने खरेदी करू नका

पिृतपक्षात सोने, चांदी, लोखंड यासारख्या वस्तू खरेदी करणे टाळा. त्यामुळे पितर नाराज होऊ शकतात.

घराच्या छताचे काम

जर तुम्ही घर बांधत असाल तर पितृ पक्षाच्या दिवसात चुकूनही घराचे छत टाकू नका. असे करणे अशुभ मानले जाते. तसेच अशुभ परिणाम दिसू शकतात.

शुभ कार्य

पितृपक्षाच्या दिवसात खरेदी व्यतिरिक्त कोणतेही शुभ कार्य करणे टाळावे. जसे घराच्या बांधकामाला सुरूवात, मुंडन, साक्षगंध यामुळे तुमच्या पूर्वज नाराज येऊ शकतात आणि तुमच्या वंशावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.

पितृ पक्षाचे महत्व

आपल्या पिढ्यांमध्ये जर कोणची इच्छा अपुर्ण राहिली असेल तर त्याचा त्रास आताच्या पिढीला होऊ शकतो. हा पितृदोष दूर करण्यासाठी अनेक उपाय केले जातात. त्यापैकी एक म्हणजे पितरांची शांती करणे होय. पितरांसाठी हे उपाय १५ दिवस केले जातात अशी मान्यता आहे. त्यामुळेच या दिवसांमध्ये पितरांची शांती करण्याकडे लोकांचा जास्त कल असतो.

डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

state co-operative bank: राज्य सहकारी बँक कर्मचाऱ्यांना आजीवन पेन्शन मिळणार; 'एवढ्या' कर्मचाऱ्यांना होणार फायदा

SCROLL FOR NEXT