लाइफस्टाइल

Health : महिलांनो मखाना खाण्याचे आरोग्यदायी फायदे; जरुर वाचा...

सगळ्यांना आवडणारे आणि अधिक प्रमाणात खाल्ले जाणारे मखाना हे अनेकांचे आवडचे स्नॅक आहे.

सकाळ डिजिटल टीम

सगळ्यांना आवडणारे आणि अधिक प्रमाणात खाल्ले जाणारे मखाना हे अनेकांचे आवडचे स्नॅक आहे.

आरोग्यदायी स्नॅक्सचा विचार केला जातो तेव्हा नजरेसमोर येतात ते मखानाचे नाव. सगळ्यांना आवडणारे आणि अधिक प्रमाणात खाल्ले जाणारे मखाना हे अनेकांचे आवडचे स्नॅक आहे. यामध्ये १ किंवा २ नाही तर अनेक पौष्टिक घटक आढळतात. जे आरोग्यासाठी उत्तम काम करतात. तसेच मखाने हे विशेषतः महिलांच्या आरोग्यावर चांगला परिणाम करते त्यामुळे बऱ्याचवेळा महिलांनी हे नियमित खावे असा सल्ला दिला जातो. याचे आरोग्यासाठी कोणते फायदे आहेत आणि ते खाण्याच्या विविध पद्धतींबद्दल आज आपण जाणून घेणारा आहोत..

  • मखाना हे एक असे स्नॅक्स आहे ज्यामध्ये कोरेलेस्ट्रॉलचे प्रमाण खूपच कमी असते. यामध्ये फॅट आणि सोडियमचे प्रमाणही कमी असते. याशिवाय माखन हे ग्लुटेन फ्री असतात. यात प्रथिनांचे आणि कार्बोहायड्रेट्चे प्रमाण अधिक असते. जर मखाना योग्य प्रकारे आणि योग्य वेळी खाल्ले तर वजन कमी करण्यासाठी त्याचा चांगला फायदा होतो.

  • मखाणामध्ये गॅलिक अॅसिड आणि क्लोरोजेनिक अॅसिड यांसारखे अँटी-ऑक्सिडंट आढळतात. हे अँटी-ऑक्सिडंट्स हृदयाचे आरोग्य चांगले ठेवण्याचे काम करतात. त्याचबरोबर हृदयाच्या रुग्णांसोबत मधुमेहाचे रुग्णही मखानाचे सेवन करू शकतात.

  • अनेक अँटी-ऑक्सिडंट्समुळे मखना हे वृद्धत्वविरोधी चांगले अन्न आहे. त्यांचे सेवन केल्याने महिलांच्या त्वचेला पोषणही मिळते आणि त्वचा दीर्घकाळ तरूण आणि सुंदर दिसते.

  • तुम्हाला तुमच्या वजन वाढीची काळजी वाटत असेल तर मखानाचा नाश्ता हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. हे प्रथिनांनी युक्त असल्याने शरीराला पोषण देते. एक मूठभर मखाणा खाल्ल्यानंतर शरीराला पुरेशी ऊर्जा मिळते. यामुळे वारंवार भूक लागण्याचे प्रमाण कमी होते. परिणानी वजन वाढीवर नियंत्रण राहते. यामुळे तुमच्या कॅलरीजचे प्रमाण कमी होते. वजन कमी करण्यासाठी मखाना खाण्याचा एक चांगला मार्ग म्हणजे रात्रभर भिजवून दुसर्‍या दिवशी सकाळी सूप किंवा सॅलडमध्ये एकत्र करुन खाणे. मखाना तुम्ही भाजूनही खाऊ शकता. कुरकुरीत राहण्यासाठी ते बॉक्समध्ये ठेवू शकता.

  • महिलांच्या पचनक्रियेसाठीही मखाना अतिशय योग्य पर्याय आहे. यात मोठ्या प्रमाणावर फायबर असते, जे पचन सुरळीत करण्यासाठी आणि आतड्याची हालचाल करण्यास मदत करते. यात असणाऱ्या लोहाच्या प्रमाणामुळे हे गर्भवती महिलांनाही खाण्याचा सल्ला दिला जातो.

  • शरीरातील विषारी द्रव्ये साफ करण्यासाठीही मखाना खाल्ल्या जातात. मखानामध्ये आढळणारे डिटॉक्सिफायिंग घटक शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकतात आणि पोट स्वच्छ ठेवण्याचे काम करतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vinod Tawde: ''अप्पा मला वाचवा!'' विनोद तावडेंनी खरंच 'तो' मेसेज केला का?

Latest Marathi News Updates : अनिल देशमुख हल्ला प्रकरणाचं AI रिक्रिएशन; विशेष पोलिस महानिरिक्षकांची माहिती

IND vs AUS Viral Video: सर्फराजची कॅचवरून विराट कोहलीने उडवली खिल्ली; ऋषभ पंत तर हसून लोटपोट झाला

Assembly Election 2024 : एसटी बस निवडणूक कर्तव्यावर... प्रवासी स्टॅण्डवर, सातारा जिल्ह्यातील प्रवाशांचा खोळंबा

Pune Crime : प्रेमसंबंधास नकार; समाज माध्यमावर अश्लील छायाचित्रे टाकून मित्राकडून तरुणीची बदनामी

SCROLL FOR NEXT